एक्स्प्लोर

Argentina vs Egypt FIFA World Cup 2026 : अर्जेंटिनाचा विजय की रेफरीची कृपा? मेस्सीच्या विजयानंतर फुटबॉल जगतात खळबळबळ, इजिप्तचा संताप, फिफावर केले नको नको ते आरोप

Argentina vs Egypt FIFA World Cup 2026 Round of 16 News : गतविजेते अर्जेंटिनाने 2026 फिफा वर्ल्ड कपच्या राउंड ऑफ 16 सामन्यात इजिप्तचा 3-2 असा पराभव करत क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली आहे.

Argentina vs Egypt FIFA World Cup 2026 Round of 16 News : गतविजेते अर्जेंटिनाने 2026 फिफा वर्ल्ड कपच्या राउंड ऑफ 16 सामन्यात इजिप्तचा 3-2 असा पराभव करत क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली आहे. मात्र, लिओनेल मेस्सीच्या संघाचा हा रोमांचक विजय आता मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या पराभवानंतर इजिप्तचे मुख्य प्रशिक्षक होसाम हसन यांचा राग अनावर झाला असून, त्यांनी रेफरी आणि फिफावर गंभीर आरोप केले आहेत. संपूर्ण सामन्यात सर्व निर्णय अर्जेंटिनाच्या बाजूने देण्यात आले, आमची हक्काची पेनल्टी नाकारण्यात आली आणि एक कायदेशीर गोलही रद्द करण्यात आला, असा संताप हसन यांनी व्यक्त केला आहे.

इजिप्तच्या कोचचा फिफावर हल्लाबोल

अटलांटा येथे झालेल्या या सामन्यात आपल्या संघासोबत घोर अन्याय झाल्याचे होसाम हसन यांनी म्हटले आहे. फिफा आणि सामन्याचे रेफरी हे केवळ गतविजेत्या अर्जेंटिनाच्या बाजूने निर्णय घेत होते, असा थेट आरोप त्यांनी केला. सामन्याच्या स्टॉपेज टाईममध्ये अर्जेंटिनाच्या एन्झो फर्नांडिसने विजयी गोल केला, ज्यानंतर इजिप्तच्या बेंचवरील खेळाडू आणि स्टाफचा संयम सुटला. मैदानावर झालेल्या प्रचंड गोंधळानंतर रेफरीने होसाम हसन यांच्या सपोर्ट स्टाफमधील एका सदस्याला रेड कार्ड दाखवून मैदानाबाहेर काढले.

सामन्यानंतर पत्रकारांशी बोलताना हसन म्हणाले की, "आम्ही हा सामना जिंकण्यास पूर्णपणे पात्र होतो. आम्ही अभिमानाने स्पर्धेतून बाहेर पडत आहोत, कारण मैदानावर ना फेअर प्ले होता ना एकमेकांबद्दल आदर. फिफा केवळ फेअर प्लेच्या घोषणा देते, पण प्रत्यक्षात मैदानावर तसे काहीच दिसत नाही. रेफरींच्या चुका झाल्या नसत्या, तर सामन्याचा निकाल काही वेगळाच लागला असता."

"मी आता वर्ल्ड कपचे सामने पाहणार नाही..."

विजयानंतर स्टॉपेज टाईममध्ये होसाम हसन आणि रेफरी यांच्यात बरीच वादावादी झाली. त्याबद्दल बोलताना हसन म्हणाले, "मी रेफरीला स्पष्ट सांगितले की हे चुकीचे आहे. त्यांच्या मनात काहीतरी खोट आहे किंवा ते काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. ठीक आहे, आता मी घरी जात आहे आणि या वर्ल्ड कपचे उर्वरित सामने पाहणार नाही. आमच्यासोबत जे घडले ते अत्यंत चुकीचे होते."

नेमका वाद काय? 'या' दोन निर्णयांवरून भडकला वाद

एक म्हणजे पेनल्टी नाकारली. अर्जेंटिनाच्या डी-बॉक्समध्ये ज्युलियन अल्वारेझने इजिप्तचा कर्णधार मोहम्मद सालाहला पाडले होते. इजिप्तच्या खेळाडूंनी पेनल्टीची जोरदार मागणी केली, परंतु रेफरीने ती फेटाळून लावली. दुसर म्हणजे कायदेशीर गोल रद्द केला. सामन्याच्या 60 व्या मिनिटाला इजिप्तच्या मोस्तफा जिकोने गोल केला होता. परंतु, काउंटर-अटॅकच्या सुरुवातीला इजिप्तच्या खेळाडूने अर्जेंटिनाचा सेंटर-बॅक लिसँड्रो मार्टिनेझविरुद्ध फाऊल केल्याचे सांगत रेफरीने हा गोल रद्द केला. हसन यांच्या मते, हा गोल पूर्णपणे वैध होता.

अर्जेंटिनाचे जबरदस्त पुनरागमन आणि मेस्सीची जादू

या वादग्रस्त निर्णयानंतरही मोस्तफा जिकोने काही मिनिटांतच इजिप्तसाठी दुसरा गोल केला. यामुळे सामन्याच्या शेवटच्या 20 मिनिटांचा खेळ शिल्लक असताना इजिप्तचा संघ 2-0 अशा मजबूत स्थितीत होता. अर्जेंटिनाचा पराभव स्पष्ट दिसत होता, पण त्यानंतर मेस्सीच्या संघाने चकित करणारे पुनरागमन केले. लिओनेल मेस्सीच्या उत्कृष्ट क्रॉसवर ख्रिस्टियन रोमेरोने शानदार हेडर करत अर्जेंटिाचा पहिला गोल केला आणि आघाडी 1-2 अशी कमी केली. यानंतर कर्णधार लिओनेल मेस्सीने स्वतः गोल करत अर्जेंटिनाला 2-2 अशी बरोबरी साधून दिली. सामन्याच्या अगदी शेवटच्या मिनिटांत एन्झो फर्नांडिसने तिसरा गोल करत अर्जेंटिनाला 3-2 असा थरारक विजय मिळवून दिला.

हे ही वाचा -

Ind vs Eng 3rd T20 : चूक तीच, जखमही तीच... वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा अपयशी; जोफ्रा आर्चरच्या तिसऱ्या षटकात नेमकं काय घडलं?, टीम इंडियाच्या नावावर लाजीरवाणा विक्रम!

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई इंडियन्सचा नवा कॅप्टन जवळपास ठरला! इंग्लंडमधील बैठकीत शिक्कामोर्तब होणार, पण माहेला जयवर्धनेसह कोणाकोणाची एका झटक्यात उचलबांगडी होणार?
मुंबई इंडियन्सचा नवा कॅप्टन जवळपास ठरला! इंग्लंडमधील बैठकीत शिक्कामोर्तब होणार, पण माहेला जयवर्धनेसह कोणाकोणाची एका झटक्यात उचलबांगडी होणार?
Gold Rate : गुड न्यूज, सोने आणि चांदीच्या दरात घसरण कायम, 22 कॅरेट सोन्याचे दर 1 लाख 30 हजारांच्या खाली आले, जाणून लेटेस्ट दर
सोने आणि चांदीच्या दरात घसरण कायम, 22 कॅरेट सोन्याचे दर 1 लाख 30 हजारांच्या खाली आले, जाणून लेटेस्ट दर
पतीकडून मारहाण, लेक माहेरला आली; मुलीला मारहाण करणाऱ्या जावयालाच सासऱ्याने संपवलं; कुऱ्हाडीने मारलं
पतीकडून मारहाण, लेक माहेरला आली; मुलीला मारहाण करणाऱ्या जावयाला सासऱ्याने संपवलं; कुऱ्हाडीने मारलं
Solapur News : आमदार असो वा खासदार-मंत्री, प्रोटोकॉलनुसारच पांडुरंगाचे दर्शन मिळणार; व्हीआयपी दर्शनाचा प्रयत्न केल्यास थेट गुन्हा दाखल होणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
आमदार असो वा खासदार-मंत्री, प्रोटोकॉलनुसारच पांडुरंगाचे दर्शन मिळणार; व्हीआयपी दर्शनाचा प्रयत्न केल्यास थेट गुन्हा दाखल होणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई इंडियन्सचा नवा कॅप्टन जवळपास ठरला! इंग्लंडमधील बैठकीत शिक्कामोर्तब होणार, पण माहेला जयवर्धनेसह कोणाकोणाची एका झटक्यात उचलबांगडी होणार?
मुंबई इंडियन्सचा नवा कॅप्टन जवळपास ठरला! इंग्लंडमधील बैठकीत शिक्कामोर्तब होणार, पण माहेला जयवर्धनेसह कोणाकोणाची एका झटक्यात उचलबांगडी होणार?
Gold Rate : गुड न्यूज, सोने आणि चांदीच्या दरात घसरण कायम, 22 कॅरेट सोन्याचे दर 1 लाख 30 हजारांच्या खाली आले, जाणून लेटेस्ट दर
सोने आणि चांदीच्या दरात घसरण कायम, 22 कॅरेट सोन्याचे दर 1 लाख 30 हजारांच्या खाली आले, जाणून लेटेस्ट दर
पतीकडून मारहाण, लेक माहेरला आली; मुलीला मारहाण करणाऱ्या जावयालाच सासऱ्याने संपवलं; कुऱ्हाडीने मारलं
पतीकडून मारहाण, लेक माहेरला आली; मुलीला मारहाण करणाऱ्या जावयाला सासऱ्याने संपवलं; कुऱ्हाडीने मारलं
Solapur News : आमदार असो वा खासदार-मंत्री, प्रोटोकॉलनुसारच पांडुरंगाचे दर्शन मिळणार; व्हीआयपी दर्शनाचा प्रयत्न केल्यास थेट गुन्हा दाखल होणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
आमदार असो वा खासदार-मंत्री, प्रोटोकॉलनुसारच पांडुरंगाचे दर्शन मिळणार; व्हीआयपी दर्शनाचा प्रयत्न केल्यास थेट गुन्हा दाखल होणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Virar News: विरारच्या अर्नाळा समुद्रकिनारी चार अल्पवयीन मुलं बुडाली; दोघांना वाचवण्यात यश, दोघांचा शोध सुरू
विरारच्या अर्नाळा समुद्रकिनारी चार अल्पवयीन मुलं बुडाली; दोघांना वाचवण्यात यश, दोघांचा शोध सुरू
सचिन अहिरांना 'रायगड' बंगला नाकारला, फ्लॅट दिला; मंत्री नसलेले रविंद्र चव्हाण दीड वर्षांपासून बंगल्यात
सचिन अहिरांना 'रायगड' बंगला नाकारला, फ्लॅट दिला; मंत्री नसलेले रविंद्र चव्हाण दीड वर्षांपासून बंगल्यात
सुनेत्रावहिनी अन् पार्थ पवारांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न; अमोल मिटकरींचा दावा, मुख्यमंत्री भेटीनंतर वाद
सुनेत्रावहिनी अन् पार्थ पवारांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न; अमोल मिटकरींचा दावा, मुख्यमंत्री भेटीनंतर वाद
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज तब्बल 19 वा दिवस; तब्बल 9 किलो वजन घटलं, थकलेला देह पाहून हळहळ, प्रकृती खालावल्याने जीव धोक्यात
सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज तब्बल 19 वा दिवस; तब्बल 9 किलो वजन घटलं, थकलेला देह पाहून हळहळ, प्रकृती खालावल्याने जीव धोक्यात
Embed widget