(Source: ECI/ABP News/ABP Majha)
AUS vs SL : ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका सामन्यात दिसला अनोखा नजारा, अंपायर घेत होता कॅच, फोटो व्हायरल, चाहते म्हणाले, 'हे तुमचं काम नाही'
Kumar Dharmasena : ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका सामन्यात अॅलेक्स कॅरीने त्याच्या खेळीदरम्यान एक स्केअर लेगच्या दिशेने खेचलेला शॉट चक्क अंपायर धर्मसेना झेल घेत असल्याचं दिसून आलं.
AUS vs SL 3rd ODI : ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात सुरु असलेल्या 5 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना नुकताच पार पडला. हा सामना कोलंबोच्या श्रीलंकेच्या आर प्रेमदासा स्टेडियममध्ये खेळवला गेला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी घेतली. ऑस्ट्रेलियाने कर्णधार फिंच (62) आणि ट्रॅविस हेड (70*) यांच्या शानदार खेळीच्या जोरावर 50 षटकात 291 धावा केल्या. पण श्रीलंकेकडून पाथुम निसांकाच्या 137 धावांच्या शतकी खेळीवर श्रीलंकेने सामना जिंकला, पण या अटीतटीच्या सामन्यात एक हटके किस्सा घडला. सामन्यात अंपायर असणाऱ्या कुमार धर्मसेना यांनी चक्क ऑस्ट्रेलियाच्या एका खेळाडूचा झेल घ्यायची अॅक्शन केली होती, ज्यानंतर धर्मसेना यांचा हा किस्सा तुफान व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर VIDEO व्हायरल
तर या सामन्यात ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरु असताना अॅलेक्स कॅरीने त्याच्या खेळीदरम्यान एक शॉट थेट स्केअर लेगच्या दिशेने खेचला. हा शॉट अंपायर धर्मसेना यांच्याकडे जात असताना त्यांनी थेट झेल पकडण्याची अॅक्शन केली. अर्थात त्यांनी चेंडू पकडला नाही, पण त्यांनी केलेली ही अॅक्शन चांगलीच व्हायरल झाली असून हा सर्व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने शेअर केला VIDEO
तर या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असताना फॅन्सपासून ते काही क्रिकेटर्सनी देखील यावर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. ऑस्ट्रेलिया क्रिकेटने त्यांच्या अधिकृत ट्वीटरवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "कॅच! अंपायर कुमार धर्मसेनांना वाटत आहे त्यांना अॅक्शनमध्ये यायचं आहे. पण बरं झालं त्यांनी असं केलं नाही."
हे देखील वाचा-