एक्स्प्लोर

T20 World Cup 2022 : 'हे' पाच भारतीय खेळाडू पहिल्यांदाच खेळणार टी20 विश्वचषक, वाचा कोण-कोण आहे यादीत

Team India : भारत-ऑस्ट्रेलिया टी20 मालिकेपूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने प्रेस कॉन्फरन्स घेतली. यावेळी त्याने भारताकडून सलामीवीरांची जोडी कशी असेल? याबाबत माहिती दिली.

Team India for ICC T20 World Cup : ऑस्ट्रेलियाच्या भूमीत 16 ऑक्टोबरपासून टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) सुरु होणार आहे. यासाठी बीसीसीआयनं भारतीय संघ देखील जाहीर केला आहे. रोहित शर्मा कर्णधार तर केएल राहुल उपकर्णधार असणार आहे. जाडेजा आणि बुमराह हे दिग्गज दुखापतीमुळे संघात नसले तरी बरेच कर्तबगार युवा खेळाडू संघात असल्याने भारताला विजयाची आशा आहे. या खेळाडूंवरही खास जबाबदारी असणार असून विशेष म्हणजे 5 असे खेळाडू आहेत. जे पहिल्यांदाच टी20 विश्वचषक खेळणार आहेत.

1. युजवेंद्र चहल : या यादीत पहिलं नाव आहे, भारताचा स्टार स्पिनर युजवेंद्र चहलचं. भारतासाठी टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या चहलला अजूनपर्यंत संधी मिळालेली नाही. 2016 पासून तो या प्रतिक्षेत असून आता फायनली तो विश्वचषक खेळणार आहे.

2.अक्षर पटेल : अष्टपैलू अक्षर पटेल यालाही एक फिरकीपटू अष्टपैलू म्हणून रवींद्र जाडेजाच्या जागी संधी मिळाली आहे. त्यानेही अलीकडच्या काही सामन्यात कमाल कामगिरी केल्याने त्याच्याकडूनही बऱ्याच अपेक्षा संघाला असणार आहेत.

3. हर्षल पटेल: आयपीएलमध्ये चमकदार गोलंदाजीच्या जोरावर टीम इंडियात आलेल्या मध्यमगती वेगवान गोलंदाज हर्षलकडे डेथ ओव्हर्स तसंच मिडल ओव्हरसमध्ये गोलंदाजी करण्याची महत्त्वाची जबाबदारी असणार आहे.

4. अर्शदीप सिंह: एक लेफ्ट हँडर वेगवान गोलंदाज म्हणून युवा अर्शदीपला संघात घेतलं आहे. डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी भारताची कमकुवत बाजू असून ही मजबूत करण्याचं महत्त्वाचं काम अर्शदीपकडे असणार आहे.

5. दीपक हुडा: युवा खेळाडू दीपक हुडानेही काही काळापूर्वीच आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं असून आतापर्यंत कमाल कामगिरी केली आहे. त्यामुळे तो विश्वचषकात सिलेक्ट झाला असून त्याला अंतिम 11 मध्ये संधी मिळाल्यास त्याच्याकडून संघाला बऱ्याच अपेक्षा असतील.

T20 World Cup साठी भारतीय संघ जाहीर

टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघाचा विचार करता रवींद्र जाडेजा दुखापतग्रस्त झाल्यामुळे अक्षर पटेलला संधी देण्यात आली. त्याशिवाय बुमराहसह हर्षल पटेलही दुखापतीतून सावरल्यामुळे ते दोघेही संघात परतले होते. पण बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त झाल्याने तो स्पर्धेला मुकणार आहे. दुसरीकडे अर्शदीपला एक लेफ्ट हँड पेसर म्हणून संघात जागा दिली आहे. तर नेमकी टीम इंडिया कशी आहे ते पाहूया...

टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ 

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवीचंद्रन आश्विन, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, जसप्रीत बुमराह (दुखापतीमुळे माघार), हर्षल पटेल, अर्शदीप सिंह, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल.

राखीव खेळाडू

मोहम्मद शमी, दीपक चाहर, रवी बिश्नोई आणि श्रेयस अय्यर

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने मुलाच्या वडिलांना संपवले, येरवड्यातील भयंकर घटना
पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने मुलाच्या वडिलांना संपवले, येरवड्यातील भयंकर घटना
Rohit Sharma, Rarshid Khan : सेनापती लढले अन् सोनेरी इतिहास रचला! रोहित शर्मा अन् राशिद खानचा एकाच दिवसात ऑस्ट्रेलियावर वर्मी घाव
सेनापती लढले अन् सोनेरी इतिहास रचला! रोहित शर्मा अन् राशिद खानचा एकाच दिवसात ऑस्ट्रेलियावर वर्मी घाव
मोठी बातमी : शपथेवेळी बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण, नागेश पाटील आष्टीकरांची शपथ संसदेत थांबवली!
मोठी बातमी : शपथेवेळी बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण, नागेश पाटील आष्टीकरांची शपथ संसदेत थांबवली!
लोकसभा अध्यक्षपदासाठी एनडीएला पाठिंबा, पण एका अटीवर; राहुल गांधींनी ठेवली मोदींसमोर अट
लोकसभा अध्यक्षपदासाठी एनडीएला पाठिंबा, पण एका अटीवर; राहुल गांधींनी ठेवली मोदींसमोर अट
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : कंगनाची मागणी हास्यास्पद;निकमांवर भाजपचा शिक्का; संजय राऊत काय काय म्हणाले ?ABP Majha Headlines :  11 AM : 25 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPune NCP Protest : ड्रग्ज प्रकरणाविरोधात पुण्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आक्रमकTOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 25 June 2024 : 10 AM :  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने मुलाच्या वडिलांना संपवले, येरवड्यातील भयंकर घटना
पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने मुलाच्या वडिलांना संपवले, येरवड्यातील भयंकर घटना
Rohit Sharma, Rarshid Khan : सेनापती लढले अन् सोनेरी इतिहास रचला! रोहित शर्मा अन् राशिद खानचा एकाच दिवसात ऑस्ट्रेलियावर वर्मी घाव
सेनापती लढले अन् सोनेरी इतिहास रचला! रोहित शर्मा अन् राशिद खानचा एकाच दिवसात ऑस्ट्रेलियावर वर्मी घाव
मोठी बातमी : शपथेवेळी बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण, नागेश पाटील आष्टीकरांची शपथ संसदेत थांबवली!
मोठी बातमी : शपथेवेळी बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण, नागेश पाटील आष्टीकरांची शपथ संसदेत थांबवली!
लोकसभा अध्यक्षपदासाठी एनडीएला पाठिंबा, पण एका अटीवर; राहुल गांधींनी ठेवली मोदींसमोर अट
लोकसभा अध्यक्षपदासाठी एनडीएला पाठिंबा, पण एका अटीवर; राहुल गांधींनी ठेवली मोदींसमोर अट
Rashid Khan : वन मॅन आर्मी! राशिद खान एकाचवेळी बंगाली टायगर्स आणि कांगारुंचा कर्दनकाळ; अफगाण पठाणनं करून दाखवलं
वन मॅन आर्मी! राशिद खान एकाचवेळी बंगाली टायगर्स आणि कांगारुंचा कर्दनकाळ; अफगाण पठाणनं करून दाखवलं
Vidhan Parishad Election 2024: दिल्लीत फडणवीस-बावनकुळेंची नड्डांसोबत खलबतं, विधानपरिषदेच्या उमेदवारांबाबत चर्चा, मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच
दिल्लीत फडणवीस-बावनकुळेंची नड्डांसोबत खलबतं, विधानपरिषदेच्या उमेदवारांबाबत चर्चा, मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच
Maratha Kunbi Records: बोगस कुणबी दाखले रद्द करण्यासाठी हालचाली, हाकेंच्या सहकाऱ्याने अर्ज दाखल केला, कुणबी नोंदीची झाडाझडती होणार
मोठी बातमी: बोगस कुणबी दाखले रद्द करण्यासाठी हालचाली, हाकेंच्या सहकाऱ्याने अर्ज दाखल केला, कुणबी नोंदीची झाडाझडती होणार
Mumbai Accident: मुंबईत कोस्टल रोडच्या कामासाठी जाणारा ट्रक काळ बनून आला, दोरी तुटून लोखंड डोक्यात पडलं, फुटपाथवरुन चालणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू
कोस्टल रोडच्या कामासाठी जाणारा ट्रक काळ बनून आला, दोरी तुटून लोखंड डोक्यात पडलं, फुटपाथवरुन चालणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू
Embed widget