Ind vs NZ: भारत अन् न्यूझीलंडमध्ये आज रंगणार तिसरा कसोटी सामना; वानखेडेची खेळपट्टी कशी असेल?, पाहा A टू Z माहिती
Ind vs NZ 3rd Test: तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडने 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.
Ind vs NZ 3rd Test: भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात आज तिसरा कसोटी सामना रंगणार आहे. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडने 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे तिसरा कसोटी सामना जिंकून भारताला क्लीन स्वीप देण्याचा प्रयत्न करेल.
India players train hard ahead of their #WTC25 contest against New Zealand in Mumbai 👊 pic.twitter.com/vrMGK8UDOf
— ICC (@ICC) October 30, 2024
बंगळुरू आणि त्यानंतर पुण्यात पराभव पत्करावा लागल्याने भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका गमावला आहे. तब्बल 12 वर्षांनंतर एका संघाने भारताला त्यांच्याच भूमीवर कसोटी मालिकेत पराभूत केले आहे. किवी संघाने शानदार कामगिरी करत दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा 113 धावांनी पराभव केला. न्यूझीलंडने 69 वर्षांनंतर प्रथमच भारतात कसोटी मालिका जिंकली. पुण्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत भारतीय फलंदाजांची कामगिरी अत्यंत लाजिरवाणी होती. रोहित शर्मा, विराट कोहली, ऋषभ पंत, शुबमन गिल यांसारखे बलाढ्य फलंदाज सपशेल फ्लॉप होत होते.
तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारत आणि न्यूझीलंडचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन:
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल/सरफराज खान, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप/मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.
न्यूझीलंड: टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन्स, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टीम साऊदी, एजाज पटेल, विल्यम ओरुके.
खेळपट्टी कशी असेल?
वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी नेहमीप्रमाणे फिरकी गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरेल. तसेच चेंडू उसळी घेण्याची शक्यता आहे. टीम इंडियाकडून वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्याची शक्यता आहे. जसप्रीत बुमराहच्या जागी हर्षित राणाला संधी मिळू शकते.
वानखेडेवर भारत आणि न्यूझीलंड किती वेळा भिडले?
वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघ आणि न्यूझीलंड यांच्यात आतापर्यंत 3 कसोटी सामने खेळले गेले आहेत. यामध्ये टीम इंडियाने दोन सामने जिंकले आहेत. यासह न्यूझीलंड संघाने 1 सामना जिंकला आहे. एवढेच नाही तर भारतीय भूमीवर दोन्ही संघांमध्ये 38 कसोटी सामने खेळले गेले आहेत. यामध्ये भारताने 17 कसोटी जिंकल्या आहेत. तर न्यूझीलंडने केवळ 4 सामने जिंकले आहेत. तसेच 17 कसोटी अनिर्णित राहिल्या आहेत.