एक्स्प्लोर

आयसीसीचा दशकातील सर्वश्रेष्ठ संघ जाहीर, कसोटीचा कर्णधार कोहली तर वनडे आणि टी-20 चा कर्णधार धोनी

आयसीसीने (ICC) या दशकातील सर्वश्रेष्ठ क्रिकेट संघाची घोषणा केली असून विराट कोहलीची (Virat Kohli) कसोटीच्या कर्णधारपदी तर महेंद्र सिंह धोनीची (MS Dhoni) एकदिवसीय आणि टी-20 संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे

नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (ICC) ने या दशकातील सर्वश्रेष्ठ संघ जाहीर केला असून कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली तर एकदिवसीय आणि टी 20 संघाचा कर्णधार म्हणून महेंद्र सिंह धोनीची निवड केलीय. यांच्या व्यतिरिक्त आर. अश्विन, रोहित शर्मा आणि जसप्रित बुमराह यांचाही समावेश या संघात करण्यात आला आहे. विराट कोहली असा एकमेव खेळाडू आहे ज्याला क्रिकेटच्या तिन्ही संघात स्थान मिळालंय. रविवारी आयसीसीनं या संघाची घोषणा केलीय.

कसोटीत भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्र सिंह धोनीनं 2014 साली कसोटी सामन्याचं कर्णधार पद सोडल्यानंतर त्या ठिकाणी विराट कोहलीकडं संघाचं नेतृत्व आलं. विराट कोहलीनं 57 कसोटी सामन्यांमध्ये संघाचं नेतृत्व केलंय, त्यामध्ये 33 सामन्यात संघाला विजय मिळालाय. तो भारताचा सर्वाधिक कसोटी सामने जिकणारा कर्णधार आहे.

धोनीचा सन्मान आयसीसीने टी-20 आणि एकदिवसीय अशा दोन्ही संघाच्या कर्णधारपदी महेंद्र सिंह धोनीची निवड केली आहे. टी-20 संघामध्ये धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रित बुमराह या चार भारतीयांचा समावेश आहे. टी-20 संघात आयसीसीने रोहित शर्मा, क्रिस गेल,अॅरोन फिंच, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स आणि ग्‍लेन मॅक्‍सवेल या सहा हिटर्सचा समावेश केलाय.

या भारतीय खेळाडूंना मिळालंय स्थान आयसीसीच्या दशकातील कसोटी संघात विराट कोहली आणि आर. अश्विनला स्थान मिळालंय. तर दशकातील टी-20 संघात विराट कोहली, महेंद्र सिंह धोनी, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह या चार भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. तसेच दशकातील एकदिवसीय संघात विराट कोहली, रोहित शर्मा आणि महेंद्र सिंह धोनीचा समावेश आहे.

आयसीसी दशकातील कसोटी संघ: अॅलिस्टर कुक, डेविड वॉर्नर, केन विलियमसन, विराट कोहली (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, कुमार संगकारा (विकेटकीपर), बेन स्टोक्स, रविचंद्रन अश्विन, डेल स्टेन, स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अॅन्डरसन.

आईसीसी दशकातील एकदिवसीय टीम: रोहित शर्मा, डेविड वॉर्नर, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, शाकिब अल हसन, महेंद्र सिंह धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), बेन स्टोक्स, मिचेल स्टार्क, ट्रेन्ट बोल्ट, इमरान ताहिर, लसिथ मलिंगा.

आईसीसी दशकातील टी- 20 संघ :

रोहित शर्मा, क्रिस गेल, अॅरोन फिंच, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, ग्‍लेन मॅक्‍सवेल, एमएस धोनी, कायरन पोलार्ड, राशिद खान, जसप्रित बुमराह, लसिथ मलिंगा

महत्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  2 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सAaditya Thackeray on Fadnavis : महाराष्ट्रद्वेष्टे फडणवीस मुख्यमंत्री बनू शकत नाही - आदित्य ठाकरेAjit Pawar Interview : लोकसभेतील पराभव ते विरोधकांची खेळी; ए टू झेड, अजितदादांनी सगळंच काढलंDevendra Fadnavis on Uddhav Thackeray : धारावी टेंडरच्या अटी ठाकरेंनीच ठरवल्या - देवेंद्र फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Embed widget