एक्स्प्लोर

Pimpri Chinchwad Election 2026: पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपला अतिआत्मविश्वास नडणार, 125 जागा जिंकल्या तर राजकारण कायमचं सोडून देईन, अजित पवार गटाच्या नेत्याचं ओपन चॅलेंज

Pimpri Chinchwad Election 2026: पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस वेगळे निवडणूक लढणार आहेत. भाजपने राष्ट्रवादीतील अनेक नेते फोडले आहेत.

Pimpri Chinchwad Election 2026: पिंपरी चिंचवडमध्ये महानगरपालिकेत भाजपला त्यांचा अतिआत्मविश्वास आणि घमेंड नडेल. याठिकाणी भाजपचे नेते 125 जागा जिंकण्याची भाषा करत आहेत. पण त्यांनी 125 जागा जिंकल्या तर मी राजकारण कायमचं सोडून देईन, असे वक्तव्य अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते योगेश बहल यांनी केले. भाजपकडून 'अबकी बार 125 पार' नारा दिला जात आहे. पिंपरी चिंचवडमध्ये विरोधकांच्या फक्त तीन जागा निवडून येतील, असे भाजपकडून सांगितले आहे. मात्र, प्रत्यक्षात पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपला 100 जागा निवडून आणणेही अवघड आहे, असे योगेश बहल यांनी म्हटले. ते शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी योगेश बहल यांनी भाजपवर गंभीर आरोपही केले. भाजपने ईव्हीएम मशीन सेट केल्या आहेत की नाही, ते मला माहिती नाही. पण भाजपकडून पिंपरी चिंचवडमध्ये फोडाफोडीचे राजकारण सुरु आहे. ते अन्य पक्षातील नेत्यांना सांगत आहेत की, आमच्याकडे या. ईव्हीएम मशीनमध्ये तुम्हाला दोन ते अडीच हजार मतं आपोआप मिळतील. बाकी मदतही आम्ही करु, असे भाजपकडून लोकांना सांगितले जात आहे. जे लोक आम्हाला सोडून गेले आहेत, त्यांना स्वत:वर विश्वास नाही. अजित पवार यांच्यासारखा उमदा नेता उभ्या महाराष्ट्रात मिळणार नाही. अशा नेत्याला सोडून गेल्यास काय मिळणार हे मला समजत नाही. अजित पवार हे पिंपरी चिंचवड शहराचे शिल्पकार आहेत, त्यांनी या शहराचे नंदनवन केले आहे. आंधळ्या व्यक्तीला विचारलं तरी तो अजित पवारांनी या शहरासाठी काय केलंय, हे सांगेल. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचीच सत्ता येईल, असा विश्वास योगेश बहल यांनी व्यक्त केला. 

आमच्याकडील जी सात-आठ लोकं भाजपमध्ये गेली आहेत, त्यांना स्वत:वर विश्वास नाही. भाजपला पिंपरी-चिंचवडध्ये ब्लाईंड फेथ आणि ब्लाईंड कॉन्फिडन्स आहे. आगामी काळात ते दिसून येईल. भाजपला त्या घमेंडीत राहू द्या. पिंपरी चिंचवडची जनता भाजपला त्यांची जागा दाखवून देईल, असे योगेश बहल यांनी म्हटले. या टीकेला आता भाजपकडून काय प्रत्युत्तर दिले जाणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

आणखी वाचा

भाजपने उमेदवारी नाकारल्याच्या चर्चेनं धक्का बसला, सांगलीच्या माजी नगरसेविकेने रक्ताने पत्र लिहलं, म्हणाली....

एबीपी माझा सोबत 7 वर्षांपासून, 13 वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?
मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?
Maharashtra Live News Updates: मुंबईतील मोकळ्या जागा आणि क्रीडांगणं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेचं आज आंदोलन
Maharashtra Live News Updates: मुंबईतील मोकळ्या जागा आणि क्रीडांगणं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेचं आज आंदोलन
Baramati News: इमारतीच्या टेरेसवर कडी लावलेली; एक चप्पल वरती पडलेली; रोहित पवारांच्या पीएच्या मुलीच्या पोस्टमार्टम रिपोर्टची प्रतिक्षा, रात्री नेमकं काय घडलं?
इमारतीच्या टेरेसवर कडी लावलेली; एक चप्पल वरती पडलेली; रोहित पवारांच्या पीएच्या मुलीच्या पोस्टमार्टम रिपोर्टची प्रतिक्षा, रात्री नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
Baramati News: रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?
मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?
पत्नीने घरातील सीसीटीव्ही बंद केला, भावांना बोलून घेतलं, सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीला बेदम मारहाण, दवाखान्यात जीव सोडला, चार महिन्यांपूर्वीच जुळ्यांना जन्म, मुलांना औषध लावण्याच्या वादात कुटुंब उद्ध्वस्त
पत्नीने घरातील सीसीटीव्ही बंद केला, भावांना बोलून घेतलं, सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीला बेदम मारहाण, दवाखान्यात जीव सोडला, चार महिन्यांपूर्वीच जुळ्यांना जन्म, मुलांना औषध लावण्याच्या वादात कुटुंब उद्ध्वस्त
रामटेकमध्ये दुर्मिळ नानेटी अल्बिनो सापाचे दर्शन, पाहायला गर्दी; सर्पमित्रांकडून नैसर्गिक अधिवासात रेस्क्यू
रामटेकमध्ये दुर्मिळ नानेटी अल्बिनो सापाचे दर्शन, पाहायला गर्दी; सर्पमित्रांकडून नैसर्गिक अधिवासात रेस्क्यू
Bhuleshwarcha Raja Marathi News: नागरिक म्हणाले, खड्ड्यांमुळे भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; आता अग्निशमन दलाने सांगितलं नेमकं कारण!
नागरिक म्हणाले, खड्ड्यांमुळे भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; आता अग्निशमन दलाने सांगितलं नेमकं कारण!
Embed widget