Temba Bavuma First Run WTC Final : दक्षिण आफ्रिका बॅकफूटवर, पण टेम्बा बावुमाच्या 'त्या' कृत्याने मैदानात गोंगाट; लॉर्ड्सवर नेमकं काय घडलं? VIDEO
Temba Bavuma WTC Final First Run on 31st Ball : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील अंतिम सामना लॉर्ड्सवर खेळला जात आहे.

Temba Bavuma WTC Final VIDEO : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील अंतिम सामना लॉर्ड्सवर खेळला जात आहे. पहिल्या दिवशी दोन्ही संघांच्या गोलंदाजांनी धुमाकूळ घातला. त्यामुळे ऑस्ट्रेलिया पहिल्या दिवशीच ऑलआऊट झाली, तर दक्षिण आफ्रिकेनेही 4 विकेट गमावल्या. पहिल्या दिवशी दोन्ही संघांच्या गोलंदाजांनी एकूण 14 विकेट घेतल्या. सध्या दक्षिण आफ्रिकेकडून कर्णधार टेम्बा बावुमा आणि डेव्हिड बेडिंगहॅम खेळत आहेत, फलंदाजी करताना बावुमाला त्याच्या पहिल्या धावासाठी बराच वेळ वाट पहावी लागली आणि त्याने पहिला धाव घेताच संपूर्ण स्टेडियममध्ये गोंगाट पाहायला मिळाला.
बावुमाने 31 चेंडूंनंतर उघडले खाते...
सध्या दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लॉर्ड्सवर सुरू असलेल्या या सामन्यात पहिल्या दिवशी गोलंदाजांना भरपूर साथ मिळाली असून 14 विकेट्स पडल्या. अशा कठीण परिस्थितीत बावुमाने मैदानावर उभं राहत दक्षिण आफ्रिकेच्या चाहत्यांना दिलासा दिला आहे. पण कर्णधार टेम्बा बावुमाने त्याचे खाते उघडण्यासाठी 31 चेंडू घेतले. बावुमाच्या पहिल्या धावेवर चाहत्यांची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती. स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या सर्व चाहत्यांनी त्याच्या पहिल्या धावेवर टाळ्या वाजवून त्याचे कौतुक केले.
View this post on Instagram
त्याच वेळी, काही चाहत्यांना टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज चेतेश्वर पुजाराची आठवण झाली. जोश हेझलवूडच्या षटकात बावुमाने आपले खाते उघडले. त्याआधी, वियान मुल्डर देखील खूप बचावात्मक क्रिकेट खेळताना दिसला. ज्यामुळे तो 44 चेंडूत फक्त 6 धावा काढून बाद झाला.
दक्षिण आफ्रिकेचा संघ दबावाखाली...
पहिल्या दिवसाच्या खेळाच्या अखेरीस दक्षिण आफ्रिकेने फक्त 43 धावांमध्ये 4 विकेट गमावल्या होत्या. एडेन मार्करामला त्याचे खातेही उघडता आले नाही आणि मिशेल स्टार्कने त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर, रायन रिकल्टन थोडा लयीत दिसत होता, परंतु तो देखील 16 धावा काढून स्टार्कचा दुसरा बळी ठरला. याशिवाय, ट्रिस्टन स्टब्स देखील जास्त काळ क्रीजवर टिकू शकला नाही आणि तो फक्त 2 धावा काढून आऊट झाला, जोश हेझलवूडने त्याची शिकार केली. सध्या, दक्षिण आफ्रिकेचा संघ थोडा दबावाखाली असल्याचे दिसून येत आहे. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना, मिशेल स्टार्कने 2 आणि पॅट कमिन्स-जोश हेझलवूडने 1-1 विकेट घेतल्या.
ऑस्ट्रेलिया 212 धावांवर ऑल आऊट
त्यापूर्वी, ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या डावात 212 धावांवर ऑल आऊट झाला. ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात वेबस्टरने सर्वाधिक 72 धावा केल्या तर स्टीव्ह स्मिथने 66 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडाने सर्वाधिक 5 तर मार्को जॅनसेनने 3 विकेट घेतल्या.
हे ही वाचा -





















