Team India T20I Ranking : नुकत्याच झालेल्या टी 20 मालिकेत भारतीय संघाने वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप केले होते. वेस्ट इंडिजचा 3-0 च्या फराकाने पराभव केल्यानंतर भारतीय संघ आंतरराष्ट्रीय टी20 क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहचला. जवळपास चार ते पाच वर्षानंतर भारतीय संघ टी 20 क्रमवारीमध्ये पहिल्या स्थानावर पोहचला आहे. पण पहिल्या स्थानावर कायम राहणे भारतीय संघासाठी आव्हानात्मक आहे. भारतीय संघाला टी20 मध्ये अव्वल स्थानावर राहायचे असल्यास श्रीलंका संघाला क्लीन स्वीप द्यावा लागेल. एकाही सामन्यात भारताचा पराभव झाल्यास भारताचे अव्वल स्थान जाऊ शकते. 


श्रीलंकाविरोधात सुरु असलेल्या टी20 मालिकेत भारतीय संघाचा एकाही सामन्यात पराभव झाल्यास क्रमवारीत घसरण होईल. भारतीय संघाला अव्वल स्थानावर राहायचे असल्यास श्रीलंका संघाला क्लीन स्वीप द्यावा लागेल. भारतीय संघ टी 20 क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे, पण दुसऱ्या क्रमावर असणाऱ्या इंग्लंड आणि भारतीय संघाचे गुण सारखेच आहेत. दोन्ही संघाचे 269 गुण आहेत. अशात भारतीय संघाला श्रीलंकाविरोधात प्रत्येक सामना जिंकावाच लागेल. 


आयसीसी क्रमवारी - 
1- भारत- 269 गुण
2- इंग्लंड- 269 गुण
3- पाकिस्तान- 266 गुण
4- न्यूझीलंड- 255 गुण
5- दक्षिण अफ्रिका- 253 गुण
6- ऑस्ट्रेलिया- 249 गुण
7- वेस्टविंडिज- 235 गुण
8- अफगानिस्तान- 232 गुण
9- बांगलादेश - 231 गुण
10- श्रीलंका- 230 गुण


भारत- श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेचं वेळापत्रक
पहिला टी-20 सामना- 24 फेब्रुवारी - भारताचा विजय
दुसरा टी-20 सामना- 26 फेब्रुवारी
तिसरा टी-20 सामना- 27 फेब्रुवारी


भारत- श्रीलंका यांच्यातील टी-20 सामने कुठे खेळले जाणार?
भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्याची टी-20 मालिका सुरु आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला टी-20 सामना भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर झाला. तर, दुसरा आणि तिसरा टी-20 सामना धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडिअमवर खेळण्यात येणार आहे. 


कोणाचं पारड जड?
भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या टी-20 मालिकेत भारतानं सर्वाधिक विजय मिळवले आहेत. तर, श्रीलंकेच्या संघानं भारताविरुद्ध निराशाजनक कामगिरी केलीय. भारत आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत एकूण 22 टी-20 सामने खेळण्यात आले. यापैकी 14 सामन्यात भारतानं विजय मिळवलाय. तर, सात सामन्यात पराभावाची धुळ चाखली आहे. भारताची विजयाची टक्केवारी 66.66 इतकी आहे. तर, श्रीलंकेच्या संघाची विजयाची टक्केवारी 33.33 इतकी आहे. 


हे देखील वाचा-