Venkatesh Iyer : मागील काही काळापासून भारतीय क्रिकेट संघात (Indian Cricket Team) वेगवान गोलंदाजी करणाऱ्या अष्टपैलू खेळाडूंचा दुष्काळ पडला आहे. हार्दिकला गोलंदाजी जमत नसून शार्दूलही कधी इन फॉर्म तर कधी आऊट फॉर्म दिसतो. पण आता भारतीय संघाला वेंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) हा युवा अष्टपैलू संघाला मिळाला आहे. वेंकटेशने आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर त्याला भारतीय संघात स्थान मिळालं, त्यानंतर आता वेस्ट इंडीजविरुद्ध त्याने दमदार कामगिरी केल्याने त्याला आगामी सामन्यात नक्कीच स्थान मिळू शकते. मुख्य कोच राहुल द्रविडने (Rahul Dravid) देखील अय्यरच्या कामगिरीनंतर त्याचं खास कौतुक केलं आहे.


तिसऱ्या सामन्यात भारताने वेस्ट इंडीजला 17 धावांनी मात दिली. ज्यामुळे भारताने 3-0 ने मालिका जिंकली. या सामन्यानंतर पत्रकारांशी बोलताना राहुल द्रविड म्हणाला, ‘‘अय्यर आयपीएलमध्ये सलामीवीर आहे. पण भारतीय संघात त्याला प्रथम तीन स्थानी जागा मिळणार नसणार हे आधीच सांगितलं होतं. त्यानुसार त्याच्यावर सोपवलेली जबाबदारी त्याने योग्यरित्या निभावली आहे. त्याने कामगिरीमध्ये सुधार देखील केला आहे.’’ दरम्यान राहुल द्रविडच्या या वक्तव्यामुळे वेंकटेश अय्यरची भारतीय संघातील जागा जवळपास निश्चित झाली आहे.


वेस्ट इंडीजविरुद्ध वेंकटेशची कामगिरी


टी20 मालिकेत वेंकटेशने तीन सामन्यात 184.00 च्या स्ट्राइक रेटने 92 धावा केल्या. तर गोलंदाजी करताना 13.50 च्या सरासरीने दोन विकेट्सही घेतले. त्याने शेवटच्या सामन्यात 19 चेंडूमध्ये धडाकेबाज फलंदाजी करत नाबाद 35 धावा केल्या. यावेळी 4 चौकार आणि 2 षटकारही त्याने ठोकले. 


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha