Wriddhiman Saha : टीम इंडियाचा (Team India) यष्टिरक्षक फलंदाज वृद्धीमान साहाला देण्यात आलेले धमकीचे प्रकरण निवळण्याची चिन्हं नाहीत. या प्रकरणी वृद्धीमान साहाने ट्विटरवर व्हॉट्सअॅपचे स्क्रीनशॉट शेअर केले. त्यात एक पत्रकार साहाला धमकावल्याचं समोर आलं. पत्रकाराला मुलाखत न दिल्याने साहाला ही धमकी मिळाली होती. त्याच्या या ट्विटनंतर आकाश चोप्रा (Akash chopra), हरभजन सिंगपासून (Harbhajan Sngh) माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi shahtri) सुद्धा साहाच्या समर्थनार्थ समोर आले.



काय आहे संपूर्ण प्रकरण?
दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी मालिके दरम्यान अशा बातम्या येत होत्या की, संघ व्यवस्थापनाने वृद्धीमान साहाला पुन्हा संधी न देण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर साहाने रणजी संघातूनही आपले नाव मागे घेतले. दरम्यान या प्रकरणावर एका पत्रकाराला या विषयावर वृद्धीमानची मुलाखत घ्यायची होती. पत्रकाराने त्याला मेसेजही केला आणि फोन केला पण साहाने त्याला प्रतिसाद दिला नाही. यानंतर पत्रकाराने साहा यांना व्हॉट्सअॅपवरच धमकी दिली.



पत्रकाराकडून मिळाली धमकी?
रिद्धीमानने ट्विटरवर शेअर केलेल्या स्क्रिनशॉटमध्ये असे दिसते की, पत्रकाराने त्यांना मुलाखतीसाठी सर्वप्रथम मेसेज केला होता. त्यावर लिहिले होते, 'मला तुमची एक मुलाखत द्या. जर तुम्हाला लोकशाही पद्धतीने मुलाखत घ्यायची असेल तर मी तुमच्यावर जबरदस्ती करणार नाही. बीसीसीआय व्यवस्थापनाने एक सर्वोत्तम यष्टिरक्षक निवडला. तुम्ही 11 पत्रकारांना निवडले जे माझ्या मते सर्वोत्तम नव्हते. याउलट अशांना निवडा जे सर्वात जास्त मदत करू शकतात. यानंतर दुसऱ्या दिवशी पत्रकाराने त्यांना व्हॉट्सअॅप कॉल केला. साहाने त्या कॉलला प्रतिसाद दिला नाही. तेव्हा पत्रकाराने रात्री उशिरा मेसेजमध्ये लिहिले, 'तुम्ही फोन केला नाही. मी यापुढे तुमची मुलाखत घेणार नाही. असा अपमान मी सहन करू शकत नाही. आणि मी ते लक्षात ठेवीन. तुम्ही असं करायला नको हवं होतं.



काय होती वृद्धीमानची प्रतिक्रिया?
यावर रिद्धिमानने त्याच्या ट्विटमध्ये एक स्क्रीनशॉट शेअर करताना  लिहिले की, 'भारतीय क्रिकेटमध्ये माझ्या योगदानानंतर आता मी एका तथाकथित पत्रकाराकडून या गोष्टींचा सामना करत आहे. पत्रकारिता आता या दिशेने चालली आहे.


 







क्रिकेट कम्युनिटी समर्थनार्थ पुढे
साहाच्या या ट्विटनंतर माजी क्रिकेटपटू प्रज्ञान ओझा, आकाश चोप्रा ते रुद्रप्रताप सिंग आणि रवी शास्त्री यांसारख्या दिग्गजांनी त्याच्या समर्थनार्थ ट्विट केले. सर्वांनी रिद्धीमान साहा यांना त्या पत्रकाराचे नाव सांगण्याची विनंती केली. या प्रकरणी बीसीसीआयने हस्तक्षेप करण्याची मागणीही या क्रिकेटपटूंनी केली होती.