IPL 2022 Update : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 चं बिगुल वाजले आहे. 26 मार्च रोजी आयपीएलचा पहिला सामना खेळला जाणार आहे. तर 29 मे रोजी अंतिम सामना होणार आहे. दोन संघ वाढल्यामुळे यंदापासून आयपीएलमध्ये दहा संघामध्ये रणसंग्राम होणार आहे. यावेळी स्पर्धा दोन टप्प्यात खेळवण्यात येणार आहे. दहा संघांना दोन ग्रुपमध्ये विभागण्यात येणार आहे. प्रत्येक संघाचे 14 सामने होणार आहेत. मुंबई इंडियन्स अ ग्रुपमध्ये आहे. मुंबई इंडियन्स संघाने ट्विट करत आपले सामने कुणाबरोबर होणार आहेत, याची माहिती दिली आहे.


लीग स्पर्धेत मुंबईचे प्रत्येकी दोन सामने कोलकाता, राजस्थान, दिल्ली, लखनौ आणि चेन्नई या संघाविरोधात  होणार आहेत. तर हैदराबाद, आरसीबी, पंजाब आणि गुजरात यांच्याविरोधात एक एक सामना होणार आहे. मुंबई इंडियन्सने ट्विट करत स्पर्धेत आपले सामने कुणाबरोबर होणार आहेत, याची माहिती दिली आहे. लीग स्पर्धेत प्रत्येक सघाचे 14 सामने होणार आहेत. लीग स्पर्धेतून चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. मुंबई इंडियन्स संघाची कमान रोहित शर्माच्या खांद्यावर आहे. पण मेगा लिलावामुळे संघात अनेक बदल झाले आहेत. त्यामुळे यंदाच्या आयपीएल स्पर्धेत बरेच बदल पाहायला मिळणार आहेत. 


ग्रुप अ - 
मुंबई
कोलकाता 
राजस्थान
दिल्ली
लखनौ


ग्रुप ब 
चेन्नई
हैदराबाद
बंगळुरु
पंजाब
गुजरात


 






मुंबई इंडियन्स संघाने रोहित शर्मा, कायरन पोलार्ड, सुर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांना रिटेन केले आहे. तर इशान किशन याला 15 कोटी रुपये मोजून पुन्हा एकदा आपल्या संघात घेतले आहे. मेगा लिलावात मुंबईने अनेक खेळाडूंवर बोली लावल्या आहेत. पाहूयात कसा आहे मुंबईचा संघ.... 


मुंबई इंडियन्स संघ - 
रोहित शर्मा (16 कोटी), जसप्रीत बुमरा (12 कोटी), सूर्यकुमार यादव (8 कोटी), कायरन पोलार्ड (6 कोटी), ईशान किशन (15.25 कोटी), डेवाल्ड ब्रेविस (3 कोटी), बसिल थम्पी (30 लाख), मुरुगन आश्विन (1.6 कोटी), जयदेव उनाडकट (1.30 कोटी), मयांक मार्कंडे (65 लाख), तिलक वर्मा (1.70 कोटी), संजय यादव (50 लाख), जोफ्रा आर्चर (8 कोटी), डॅनियल सॅम्स (2.60 कोटी), टिमल मिल्स (1.5 कोटी), टीम डेव्हिड (8.25 कोटी), रिले मरेडिथ (1 कोटी), मोहम्मद अर्शद खान (20 लाख), अर्जून तेंडुलकर (30 लाख)