Wriddhiman Saha : भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांच्या विरोधात बोलल्याने विकेटकीपर रिद्धिमान साहाच्या  (Wriddhiman Saha) अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या वक्तव्याबाबात बीसीसीआय साहाकडे स्पष्टीकरण मागण्याची शक्यता आहे. केंद्रीय करारातील खेळाडू असल्याने त्याने नियमांचे उल्लंघन केले आहे, असे बीसीसीआयचे मत आहे.  


श्रीलंकेविसोबत होणाऱ्या कसोटी मालिकेतून वगळण्यात आल्यानंतर प्रशिक्षक राहुल द्रविड, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि निवड समितीचे प्रमुख चेतन शर्मा यांच्यासोबत झालेली चर्चा साहाने सार्वजनिक केली होती. त्यामुळे केंद्रीय करारातील ब गटात असलेल्या साहाने नियम 6.3 चे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे. 


 6.3 या नियमानुसार कोणताही खेळाडू खेळ, अधिकारी, खेळातील घडामोडी, तंत्रज्ञानाचा वापर, निवडीच्या बाबी किंवा बीसीसीआयच्या मतानुसार खेळाशी संबंधित इतर कोणत्याही विषयाबाबत कोणत्याही प्रकारच्या मीडियामध्ये कोणतीही टिप्पणी करू शकत नाही. परंतु, साहाने या नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्याची चौकशी होऊ शकते. 
 
 बीसीसीआयचे खजिनदार अरून धूमल यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीती म्हटले आहे की, "बीसीसीआयने रिद्धिमानला विचारावे की, तो केंद्रीय करारबद्ध क्रिकेटपटू असूनही निवड प्रक्रियेवर का बोलला? भारतीय संघातून वगळल्यानंतर साहाने निवड न झाल्यामुळे राहुल द्रविड, चेतत शर्मा आणि सौरभ गांगुली यांच्यामध्ये झालेले खासगी संभाषण सार्वजनिक केले आहे. " 
 
श्रीलंकेसोबत होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतून रिद्धिमान साहाला वगळण्यात आले आहे. त्याच्या जागी निवड समितीने आंध्र प्रदेशच्या खेळाडून के. एस. याला राखीव विकेटकीपर म्हणून संघात स्थान दिले आहे. 


काय म्हणाला होता रिद्धिमान? 
 ''संघ व्यवस्थापनाने फार पूर्वीच सांगितले होते की आता मला संघात स्थान दिले जाणार नाही. मी आजपर्यंत हे सांगितले नाही, कारण मी टीम सेट अपचा भाग होतो. प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही मला आधीच निवृत्तीचा विचार करण्याचा सल्ला दिला होता. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये जेव्हा मी न्यूझीलंडविरुद्ध नाबाद 61 धावा केल्या होत्या, तेव्हा सौरव गांगुली यांनी व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज करत माझे अभिनंदन केले होते. जोपर्यंत ते बीसीसीआयचे सर्वेसर्वा आहेत, तोपर्यंत मला भारतीय संघात निवडीची काळजी करण्याची गरज नाही, असेही ते मला म्हणाले होते. बोर्डाच्या अध्यक्षांनी असा मेसेज केल्याने माझा आत्मविश्वास खूप वाढला होता. मात्र, असं सर्व असताना हे सारं अचानक इतक्या लवकर कसे बदलले, हे मला समजत नाही आहे.''


महत्वाच्या बातम्या


India Test Team : कसोटी संघातून डच्चू मिळाल्यानंतर रिद्धिमान साहाचा संताप; गांगुली, द्रविडवर केले गंभीर आरोप


Wriddhiman Saha : वृद्धिमानला मिळालेल्या धमकीवर BCCI चं हस्तक्षेप, लेखी तक्रारीवर होणार कायदेशीर कारवाई?


Wriddhiman Saha : वृद्धीमान साहाला रवी शास्त्रींचा पाठिंबा, म्हणाले...