Indian Women Cricket Team: भारतीय महिला क्रिकेट संघ उद्या न्यूझीलंडविरुद्ध चौथा एकदिवसीय सामना खेळणार आहे. पाच सामन्याच्या एकदिवसीय मालिकेत भारताला पहिल्या 3 सामन्यात पराभव पत्कारवा लागलाय. तसेच न्यूझीलंडच्या संघानं मालिकेत 3-0 अशी आघाडी घेत मालिकेवर कब्जा केलाय. भारतीय संघानं मागील 12 महिन्यात 4 एकदिवसीय मालिका गमावलीय. भारताला न्यूझीलंडअगोदर दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारवा लागलाय.


न्यूझीलंडविरुद्ध खेळण्यात आलेल्या एकमेव टी-20 सामन्यात भारताला लाजीरवाण्या पराभवाला समोरे जावा लागलं होतं. या सामन्यात भारतीय फलंदाज अपयशी ठरले होते. तर, एकदिवसीय मालिकेत भारतीय संघात खराब क्षेत्ररक्षण केलं. याचाच फायदा घेत न्यूझीलंडच्या संघानं मोठं लक्ष्य सहज गाठलं. विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर मिताली राजच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला चांगली कामगिरी करावी लागणार आहे. 


स्मृती मानधना, मेघना सिंहचं संघात पुनरागमन 
न्यूझीलंडच्या सध्याच्या युगात, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांनी एकदिवसीय सामन्यांमध्ये निराशाजनक कामगिरी केली, जर फलंदाज एकमेव टी-20 मध्ये खेळले नाहीत. यासह न्यूझीलंड संघाने मोठे लक्ष्य सहज गाठले. आता विश्वचषक पुढे असल्याने मिताली राजच्या नेतृत्वाखालील संघाला पुढील दोन सामन्यांमध्ये त्यांच्या कमकुवतपणावर मात करावी लागणार आहे. सलामीवीर स्मृती मानधना आणि वेगवान गोलंदाज मेघना सिंगच्या पुनरागमनामुळे संघ मजबूत झाला आहे.


झूलन गोस्वामीनं चांगलं प्रदर्शन
भारताच्या गोलंदाजांमध्ये फक्त वेगवान गोलंदाज झूलन गोस्वामीनं चांगलं प्रदर्शन करून दाखवलंय. तिनं न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात आक्रमक गोलंदाजी केली. न्यूझीलंडच्या टॉप ऑर्डरच्या फलंदाजाला माघारी धाडून भारताला सामन्यात परत आणलं होतं. मात्र, इतर गोलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. मेघनाच्या पुनरागमनानंतर भारत पुढील दोन सामन्यांमध्ये मजबूत गोलंदाजीसह उतरेल.  पहिल्या तीन सामन्यांमध्ये पूजा वस्त्राकर, सिमरन बहादूर आणि रेणुका सिंग यांना संधी देण्यात आली होती. 


दीप्ती शर्माची उत्कृष्ट गोलंदाजी
फिरकी गोलंदाजांमध्ये दीप्ती शर्मानं चांगलं प्रदर्शन केलंय. न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेत तिला आतापर्यंत सात विकेट्स मिळाले आहेत. पूनम यादव आणि राजेश्वरी गायकवाड यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha