Team India squad For T20 World Cup 2026 : 2024 च्या संघातून 7 जणांचा पत्ता कट; चॅम्पियन टीम इंडियाचा चेहरा मोहरा बदलला, भारताला 2026 चा वर्ल्डकप 'हे' 15 धुरंधर जिंकवणार?, पाहा संपूर्ण Squad
Team India squad For T20 World Cup 2026 Marathi News : निवडकर्ता अजित आगरकर यांनी 2026 च्या टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची अधिकृत घोषणा केली आहे.

BCCI Announced Team India squad For T20 World Cup 2026 : मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी 2026 च्या टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची अधिकृत घोषणा केली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली 15 सदस्यीय संघ निवडण्यात आला असून, या संघात नव्या दमाच्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. टी-20 विश्वचषक 2024 जिंकणाऱ्या संघातील अनेक महत्त्वाचे खेळाडू यावेळी 2026 च्या मेगा स्पर्धेत टीम इंडियाचा भाग नाही. विशेष म्हणजे, विजेत्या संघातील जवळपास निम्मे सदस्य आगामी विश्वचषकात मैदानात उतरणार नाहीत. 2024 च्या टी-20 विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या अंतिम 15 जणांच्या संघातील तब्बल 7 खेळाडूंना यावेळी डावलण्यात आले आहे. त्यामुळे भारतीय संघात पिढी बदलाचा स्पष्ट संकेत मिळत असून, नव्या चेहऱ्यांसह टीम इंडिया 2026 च्या विश्वचषकात नवे पर्व लिहिण्याच्या तयारीत आहे.
3 खेळाडूंची निवृत्ती, तर 4 विश्वविजेत्यांचा संघातून पत्ता कट....
यामध्ये सर्वात पहिले नाव माजी कर्णधार रोहित शर्माचे आहे. रोहितने आधीच टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याचबरोबर स्टार फलंदाज विराट कोहली आणि अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा यांनीही या फॉरमॅटला अलविदा केला आहे. या तिघांनी टी-20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यानंतर निवृत्तीची घोषणा केली होती. या तीन दिग्गजांव्यतिरिक्त यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत, वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज, लेगस्पिनर युजवेंद्र चहल आणि युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल यांनाही बाहेर ठेवण्यात आले आहे. एकूणच पाहता, टी-20 विश्वचषक 2026 साठी भारताचा संघ मोठ्या प्रमाणात नव्या चेहऱ्यांनी सजलेला आहे. विजेत्या संघातील जवळपास अर्धा संघ बदललेला आहे, त्यामुळे नव्या दमाच्या खेळाडूंवरच यावेळी देशाच्या अपेक्षा असणार आहेत.
🚨India’s squad for ICC Men’s T20 World Cup 2026 announced 🚨
— BCCI (@BCCI) December 20, 2025
Let's cheer for the defending champions 💪#TeamIndia | #MenInBlue | #T20WorldCup pic.twitter.com/7CpjGh60vk
शुभमन गिल बाहेर, इशान किशनची एन्ट्री
शुभमन गिलला संघातून वगळण्यात आले आहे. आशिया कपमध्ये संघात परतल्यापासून त्याची फलंदाजी अपयशी ठरत आहे. त्याच्या जागी अक्षर पटेलला उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. जितेश शर्मालाही संघातून वगळण्यात आले आहे, तो इशान किशनची जागा घेईल. इशानच्या नेतृत्वाखाली झारखंडने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकली. त्याला बऱ्याच काळानंतर संघात स्थान देण्यात आले आहे. त्याने स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शतकही ठोकले. वॉशिंग्टन सुंदर अक्षर पटेलसोबत फिरकी गोलंदाजीची जबाबदारी सोपवतील. कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती फिरकी गोलंदाजीची जबाबदारी सांभाळतील. जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा हे वेगवान गोलंदाज आहेत.
टी-20 विश्वचषक 2026 साठी टीम इंडिया (Team India squad For T20 World Cup 2026) -
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अक्षर पटेल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, ति लक वर्मा, रिंकू सिंग, इशान किशन, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, शिवम दुबे. वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती. जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, हर्षित राणा.
हे ही वाचा -





















