एक्स्प्लोर

भारताची श्रीलंकेविरुद्ध एका रननं विजयाची संधी हुकली, मुंबईकर खेळाडूनं इंग्लंडमध्ये धावांचा पाऊस पाडला, VIDEO

Prithvi Shaw : भारताचा युवा खेळाडू पृथ्वी शॉ इंग्लंडमध्ये धावांचा पाऊस पाडतोय. इंग्लंडमध्ये तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये सहभागी झाला आहे.

नवी दिल्ली : भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील पहिली एकदिवसीय मॅच ड्रॉ झाली. भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरी मॅच उद्या होणार आहे. भारताचे काही खेळाडू इंग्लंडमधील देशांतर्गत क्रिकेट मालिकेत खेळत आहेत. काही दिवसांपूर्वी अजिंक्य रहाणे यानं दमदार फलंदाजी केल्याची बातमी समोर आली होती.दुसरीकडे भारताचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. पृथ्वी शॉ  इंग्लंडमध्ये वनडे कप मध्ये नॉर्थहॅम्पटनशायर संघाकडून क्रिकेट खेळतोय. या मालिकेत सलग दुसऱ्या सामन्यात पृथ्वी शॉनं दमदार फलंदाजी केली. 

पृथ्वी शॉनं एकीकडे आक्रमक फलंदाजी केली मात्र, संघातील इतर फलंदाज मोठी धावसंख्या उभारण्यात अयशस्वी ठरले. पृथ्वी शॉनं 97  धावांची वादळी खेळी केली. मात्र, तो  3 धावांनी शतकापासून वंचित राहिला. 

पृथ्वी शॉनं फलंदाजीसाठी अवघड असलेल्या खेळपट्टीवर दमदार फलंदाजी केली. पृथ्वी शॉनं केलेल्या फटकेबाजीच्या आधारे नॉर्थहॅम्पटनशायर संघानं 10 ओव्हरमध्ये 81 धावा केल्या होत्या. पृथ्वी शॉचा सलामीचा दुसरा जोडीदार रिकार्डो वास्कोनलसेलोस 9 बॉलमध्ये 16 धावा करुन बाद झाला. त्यावेळी संघाची धावसंख्या 53  धावा होत्या. 

पृथ्वी शॉनं 31  बॉलमध्ये अर्धशतक केलं. पृथ्वी शॉनं 71 बॉलमध्ये 97  धावांची खेळी केली. त्यामध्ये 16  चौकार आणि एक षटकार पृथ्वी शॉ यानं मारले.  पृथ्वी शॉ जेव्हा बाद झाला तेव्हा त्याच्या संघाच्या धावा 148 धावा झाल्या होत्या. पृथ्वी शॉ बाद झाल्यानंतर त्यांचा संघ 260 धावांवर बाद झाला. एकीकडे पृथ्वी शॉनं 16  चौकार मारले मात्र इतर 10  फलंदाजांनी मिळून 10 चौकार मारले. 

पृथ्वीची वादळी खेळी, मात्र संघाचा पराभव

पृथ्वी शॉच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर नॉर्थहॅम्पटनशायरनं 260 धावांची खेळी केली. मात्र, डरहम संघानं या मॅचमध्ये 4 विकेटनं मॅच जिंकली. डरहमच्या कॉलिन एकरमॅन यानं 106  बॉलमध्ये 108  धावांची खेळी केली. कॅप्टन एलेक्स लीसनं 55 बॉलमध्ये 55  धावा केल्या. स्कॉट वॉर्थविक यानं 42 धावा केल्या. यामुळं डरहम संघानं 4 विकेटनं विजय मिळवला. 

संबंधित बातम्या :

Team India: मुसळधार पाऊस सुरु असला तरी क्रिकेट खेळता येणार, नव्या नॅशनल क्रिकेट अकादमीत जागतिक दर्जाच्या सोयी,जय शाहांकडून फोटो शेअर

Team India : दुसऱ्या मॅचमध्ये विजयासाठी रोहित शर्मा डाव टाकणार, हुकमी एक्का मैदानात उतरवणार? श्रीलंकेची कोंडी करण्यासाठी विशेष प्लॅन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिंदेंकडील 8 आमदार 1 मंत्री परत येणार, आदित्य ठाकरेंच्या दाव्यावर श्रीकांत शिंदेंचा पलटवार; दिलं चॅलेंज
शिंदेंकडील 8 आमदार 1 मंत्री परत येणार, आदित्य ठाकरेंच्या दाव्यावर श्रीकांत शिंदेंचा पलटवार; दिलं चॅलेंज
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंची दुसऱ्यांदा बॅग तपासली; दरवेळेला मीच पहिला गिऱ्हाईक म्हणत ठाकरेंकडून पुन्हा व्हिडीओ शूट
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंची दुसऱ्यांदा बॅग तपासली; दरवेळेला मीच पहिला गिऱ्हाईक म्हणत ठाकरेंकडून पुन्हा व्हिडीओ शूट
Ajit Pawar : अजितदादांची श्रीरामपूरमध्ये मोठी खेळी! जेलमध्ये असणाऱ्या माजी आमदाराच्या कुटुंबियांची घेतली अचानक भेट, पक्षाची ताकद वाढणार?
अजितदादांची श्रीरामपूरमध्ये मोठी खेळी! जेलमध्ये असणाऱ्या माजी आमदाराच्या कुटुंबियांची घेतली अचानक भेट, पक्षाची ताकद वाढणार?
Maharashtra Assembly Elections 2024 : नाशिक पूर्वमध्ये राजकारण तापलं! 'माझ्याकडे निवडणुकीचा अजेंडा' राहुल ढिकलेंच्या वक्तव्यावर गणेश गीतेंचा हल्लाबोल, म्हणाले 'तुमचा अजेंडा...'
नाशिक पूर्वमध्ये राजकारण तापलं! 'माझ्याकडे निवडणुकीचा अजेंडा' राहुल ढिकलेंच्या वक्तव्यावर गणेश गीतेंचा हल्लाबोल, म्हणाले 'तुमचा अजेंडा...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Speech Dahanu : शेतकऱ्यांच्या खात्यात 15 हजार जमा करणार ,देवेंद्र फडणवीसांची घोषणाNarendra Modi Speech Chimur|मराठीतून भाषणाला सुरुवात, मविआ म्हणजे भ्रष्टाचाराची खिलाडी, मोदींची टीकाAaditya Thackeray Speech Georai | गद्दारांचा समाचार, राज्यातील प्रकल्पावरून मोदी-शाहांना सुनावलंEknath Shinde Amravati : त्यांना कायमचे बाहेर पाठवून द्या; शिंदेंची राणा दाम्पत्यावर जहरी टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिंदेंकडील 8 आमदार 1 मंत्री परत येणार, आदित्य ठाकरेंच्या दाव्यावर श्रीकांत शिंदेंचा पलटवार; दिलं चॅलेंज
शिंदेंकडील 8 आमदार 1 मंत्री परत येणार, आदित्य ठाकरेंच्या दाव्यावर श्रीकांत शिंदेंचा पलटवार; दिलं चॅलेंज
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंची दुसऱ्यांदा बॅग तपासली; दरवेळेला मीच पहिला गिऱ्हाईक म्हणत ठाकरेंकडून पुन्हा व्हिडीओ शूट
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंची दुसऱ्यांदा बॅग तपासली; दरवेळेला मीच पहिला गिऱ्हाईक म्हणत ठाकरेंकडून पुन्हा व्हिडीओ शूट
Ajit Pawar : अजितदादांची श्रीरामपूरमध्ये मोठी खेळी! जेलमध्ये असणाऱ्या माजी आमदाराच्या कुटुंबियांची घेतली अचानक भेट, पक्षाची ताकद वाढणार?
अजितदादांची श्रीरामपूरमध्ये मोठी खेळी! जेलमध्ये असणाऱ्या माजी आमदाराच्या कुटुंबियांची घेतली अचानक भेट, पक्षाची ताकद वाढणार?
Maharashtra Assembly Elections 2024 : नाशिक पूर्वमध्ये राजकारण तापलं! 'माझ्याकडे निवडणुकीचा अजेंडा' राहुल ढिकलेंच्या वक्तव्यावर गणेश गीतेंचा हल्लाबोल, म्हणाले 'तुमचा अजेंडा...'
नाशिक पूर्वमध्ये राजकारण तापलं! 'माझ्याकडे निवडणुकीचा अजेंडा' राहुल ढिकलेंच्या वक्तव्यावर गणेश गीतेंचा हल्लाबोल, म्हणाले 'तुमचा अजेंडा...'
Maharashtra Election 2024: हरियाणात जे घडलं ते टाळायचं असेल तर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करा, केजरीवालांच्या 'आप'ची मोठी मागणी
उद्धव ठाकरेंना आत्ताच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा, अन्यथा... केजरीवालांच्या 'आप'ची मोठी मागणी
नक्षलवादाला लगाम घालत या भागात आम्ही उद्योग आणले; चंद्रपुरात मोदींचं भाषण, काँग्रेस, मविआवर हल्लाबोल
नक्षलवादाला लगाम घालत या भागात आम्ही उद्योग आणले; चंद्रपुरात मोदींचं भाषण, काँग्रेस, मविआवर हल्लाबोल
Sharad Pawar: पंढरपूर विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाचा काँग्रेस अन् भाजपला दणका! अमोल कोल्हेंच्या उपस्थितीत 10 नगरसेवकांनी फुंकली तुतारी
पंढरपूर विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाचा काँग्रेस अन् भाजपला दणका! अमोल कोल्हेंच्या उपस्थितीत 10 नगरसेवकांनी फुंकली तुतारी
Rohit Pawar : उद्धव ठाकरेंची बॅग तपासल्यानंतर रोहित पवार कडाडले; म्हणाले, महायुतीकडून जे चाललंय....
उद्धव ठाकरेंची बॅग तपासल्यानंतर रोहित पवार कडाडले; म्हणाले, महायुतीकडून जे चाललंय....
Embed widget