एक्स्प्लोर

IND vs NZ Semifinal: वानखेडेवर टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड द्वंव्द; रोहितसेना विल्यमसनच्या टोळीचं चक्रव्यूह भेदणार?

ICC World Cup 2023 Semi Final: विश्वचषक 2023 चा पहिला सेमीफायनचा सामना टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत.

IND vs NZ, Wankhede Stadium Pitch Report: विश्वचषकातील सेमीफायनलच्या (World Cup 2023 Semi Final) सामन्यांना आजपासून सुरुवात होणार आहे. आज मुंबईतील (Mumbai) ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) टीम इंडिया (Team India) विरुद्ध न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात सामना रंगणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. तसेच, हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरू होईल. वानखेडे मैदानावर नाणेफेक महत्त्वाची भूमिका बजावू शकते, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. दरम्यान, वानखेडे स्टेडियमच्या खेळपट्टीवर फलंदाजी करणं सोपं आहे. या खेळपट्टीवर फलंदाज मोठे फटके सहज मारतात. मात्र गोलंदाजांसाठी आव्हान सोपं नसेल. 

वानखेडेवर फलंदाजांची आतषबाजी... 

वानखेडेवरील नवा चेंडू वेगवान गोलंदाजांना मदत करतो, मात्र यानंतर गोलंदाजांचं आव्हान वाढतं. विशेषत: वानखेडेच्या छोट्या बाउंड्रीमुळे आजच्या सामन्यात स्पिनरसमोर मोठं आव्हान असणार आहे. या मैदानावर, आतापर्यंत अनेक आयपीएलचे सामने रंगले आहेत. आयपीएल सामन्यांमध्ये, बहुतेक कर्णधार नाणेफेक जिंकल्यानंतर सर्वात आधी गोलंदाजी निवडतात. म्हणजेच, संघांना धावांचा पाठलाग करायचा असतो, परंतु वनडे फॉरमॅटमध्ये फलंदाजांव्यतिरिक्त, गोलंदाजांकडे विकेट घेण्याची संधी असते, जर गोलंदाजानं चांगल्या लाईन आणि लेन्थवर गोलंदाजी केली तर मात्र फलंदाजांचा धुव्वा उडवण्यापासून त्यांना कोणीच अडवू शकत नाही. 

सेमीफायनलमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्माचे आकडे धडकी भरवणारे 

विश्वचषकातील आजच्या मोठ्या सामन्यात भारतीय चाहत्यांच्या नजरा विराट कोहली आणि रोहित शर्मासारख्या खेळाडूंवर असतील. मात्र विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये विराट कोहलीचे आकडे चाहत्यांसाठी चांगले संकेत नाहीत. खरंतर, विराट कोहली चौथ्यांदा वनडे सेमीफायनलमध्ये खेळणार आहे, म्हणजेच आतापर्यंत विराट कोहली 3 वेळा वनडे सेमीफायनलमध्ये खेळला आहे, पण हा अनुभवी बॅट्समन आतापर्यंत केवळ 11 धावाच करू शकला आहे. रोहित शर्मा पहिल्यांदा 2015 विश्वचषक उपांत्य फेरीत खेळला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यात रोहित शर्मानं 48 चेंडूत 34 धावांची खेळी केली. यानंतर रोहित शर्मा विश्वचषक 2019 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध सेमीफायनल खेळण्यासाठी आला होता. त्या सामन्यात रोहित शर्मा फक्त एक धावा काढून बाहेर पडला. अशाप्रकारे, विश्वचषकाच्या सेमीफायनमधील रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा विक्रम खूपच खराब झाल्याचं आकडेवारीवरून दिसून येते. मात्र, हे पाहणं रंजक ठरणार आहे की, हे दोन्ही दिग्गज खेळाडू स्वतःचाच रेकॉर्ड मोडण्यास सक्षम आहेत की नाही? 

विश्वचषकाच्या सेमीफायनलसाठी वानखेडे सज्ज 

मुंबईचं ऐतिहासिक वानखेडे स्टेडियम सज्ज झालंय विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य फेरीसाठी. या सामन्यात यजमान भारताचा मुकाबला न्यूझीलंडशी होणार आहे. विश्वचषकाच्या साखळीत धर्मशालामध्ये झालेल्या सामन्यात भारतानं न्यूझीलंडला चार विकेट्सनी हरवलंय. पण म्हणून न्यूझीलंडच्या आव्हानाला कमी लेखता येणार नाही. कारण केन विल्यमसनच्या न्यूझीलंड संघात कमालीची गुणवत्ता आहे. याच न्यूझीलंडनं 2019 सालच्या विश्वचषकात भारताला हरवून अंतिम फेरीत धडक मारली होती. त्यामुळं त्या पराभवाची परतफेड करण्याची संधी रोहित शर्माच्या भारतीय संघाला आज वानखेडे स्टेडियमवर मिळणार आहे. भारतानं विश्वचषकाच्या साखळीत नऊपैकी नऊ सामने जिंकून फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यांवर आपली ताकद दाखवून दिली आहे. न्यूझीलंडच्या खात्यात  नऊपैकी पाच सामन्यांमध्ये विजय आणि चार सामन्यांमध्ये पराभव अशी कामगिरी आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर उभय संघ वानखेडेच्या मैदानात आमनेसामने येत आहेत.   

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 7 AM : 18 Jan 2025 : ABP MajhaTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : Maharashtra News : ABP MajhaABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6.30 AM : 18 Jan 2025 : ABP Majha : MaharashtraMajha Gaon Majha Jilha : 6 AM : माझं गाव माझा जिल्हा : 18 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget