Indian Team Live Update: जग जिंकलेली टीम इंडिया दिल्लीत दाखल; नरेंद्र मोदींना भेटून मुंबईत दाखल होणार
Indian Cricket Team Live Update: टी-20 विश्वचषक 2024 ची स्पर्धा जिंकून भारतीय क्रिकेट संघ आज मायदेशी परतला.
![Indian Team Live Update: जग जिंकलेली टीम इंडिया दिल्लीत दाखल; नरेंद्र मोदींना भेटून मुंबईत दाखल होणार Team India lands at Delhi airport after winning the T20 World Cup 2024 trophy Indian Team Live Update: जग जिंकलेली टीम इंडिया दिल्लीत दाखल; नरेंद्र मोदींना भेटून मुंबईत दाखल होणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/7e0d13773d0c45061c4d672a933e40ca1720055663116987_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Indian Cricket Team Live Update: टी-20 विश्वचषक 2024 ची स्पर्धा जिंकून भारतीय क्रिकेट संघ आज मायदेशी परतला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने बार्बाडोसहून भारतात आलेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते. फायनल जिंकल्यानंतर टीम इंडिया चक्रीवादळामुळे बार्बाडोसमध्ये अडकली होती. त्यामुळे एअर इंडियाच्या AIC24WC या विशेष विमानाने भारतात परत आणण्यात आले. आज टीम इंडिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. यानंतर टीम इंडिया दुसऱ्या चार्टर्ड फ्लाइटने मुंबईला रवाना होईल. मुंबईत संध्याकाळी 5 च्या सुमारास विश्वविजेत्यांचा शानदार रोड शो होईल.
#WATCH | Delhi: Team India's bus at Terminal 3 of Delhi airport as the Men's Indian Cricket Team has landed at the airport after winning the #T20WorldCup2024 trophy. pic.twitter.com/gqHBbn1357
— ANI (@ANI) July 4, 2024
वानखेडे स्टेडियमवर होणार सन्मान-
भारतीय क्रिकेटमध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडियमचे विशेष स्थान आहे. याच स्टेडियमवर भारताने २०११ सालचा एकदिवसीय सामन्यांचा विश्वचषक उंचावला होता. आता, याच स्टेडियमवर गुरुवारी भारताच्या टी-२० विश्वविजेत्या संघाचाही सन्मान होणार आहे.
टीम इंडियाचे आजचे वेळापत्रक-
सकाळी 6 वाजता: नवी दिल्लीत आगमन
सकाळी 10 ते दुपारी 12 पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदीसोबत भेट.
दुपारी 2 वाजता : मुंबईकडे रवाना.
सायंकाळी 5 वाजता : मरिन ड्राइव्हला आगमन,
सायंकाळी 5 वाजता : वानखेडे स्टेडियमच्या दिशेने बस परेड. सायंकाळी ७ वाजल्यापासून: वानखेडे स्टेडियमवर विजयी सोहळा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)