(Source: ECI/ABP News/ABP Majha)
India vs Leicestershire : पहिल्या वॉर्मअप सामन्यासाठी भारत सज्ज, रोहित कर्णधार तर विराटही सज्ज, पाहा कशी आहे अंतिम 11
India vs Leicestershire : भारत आणि इंग्लंड यांच्यात 1 जुलै रोजी कसोटी सामना खेळवला जाणार असून त्यापूर्वी भारतीय संघ लीसेस्टरशायर या काऊंटी संघाविरुद्ध वॉर्मअप मॅच खेळणार आहे.
India Playing 11 : भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यांना (india vs england) 1 जुलैपासून सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी भारत सराव म्हणून वॉर्म अप मॅच लीसेस्टरशायर (Leicestershire) या काऊंटी संघाविरुद्ध, खेळणार आहे. तर भारत विरुद्ध लीसेस्टरशायर (India vs Leicestershire) ही वॉर्म अप मॅच आज भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता खेळवली जाणार आहे. या सामन्यासाठी भारतासह लीसेस्टरशायर संघानेही आपली अंतिम 11 जाहीर केली आहे. यावेळी भारताचे काही खेळाडू लीसेस्टरशायर संघातून खेळताना दिसणार आहेत. तर नेमके संघ कसे आहेत पाहूया...
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, केएस भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जाडेजा, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि उमेश यादव
लीसेस्टरशायर : सॅम इवान्स (कर्णधार), रेहान अहमद, सॅम बेट्स (यष्टीरक्षक, नॅट बोवली, विल डेविस, जोई एविसन, लुविस किंबर, अबी सकांडे, रोमन वॉल्कर, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि प्रसिध कृष्णा
भारतीय खेळाडू लीसेस्टरशायर संघात का?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामने 1 जुलैपासून सुरु होणार आहेत. ही केवळ एक वॉर्मअप मॅच असून खेळाडूंना योग्य सराव व्हावा यासाठी खेळवली जात असल्याने इंग्लंड, भारत तसंच लीसेस्टरशायर या तिनही संघातील खेळाडू एकत्र खेळतील. त्यामुळे भारताचे दिग्गज खेळाडू जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत, चेतेश्वर पुजारा आणि प्रसिध कृष्णा हे लीसेस्टरशायर संघातून खेळणार आहेत.
हे देखील वाचा-
- ICC Test All Rounder Ranking : अश्विन-होल्डरला मागे टाकत शाकिबची दुसऱ्यास्थानी झेप; जाडेजा अव्वलस्थानी कायम
- ENG vs NZ : तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडचा संघ जाहीर, अँडरसनच्या जागी नवा खेळाडू करणार डेब्यू
- ENG vs IND : इंग्लंडविरुद्ध कसोटीत भारतासमोर 'ही' दोन आव्हानं सर्वात अवघड, फलंदाजीत रुट तर गोलंदाजीत ऑली, पाहा आकडेवारी