वानखेडेवर चालताना टी-शर्ट हार्दिक पांड्याच्या हातावर येऊन पडलं; जसप्रीत बुमराह हसून हसून लोटपोट, नेमकं काय घडलं?
Team India Hardik Pandya: आयपीएल 2024 मध्ये हार्दिक पांड्यावर खूप टीका झाली. मात्र, त्याचं हार्दिक पांड्याला आता सर्वांनी डोक्यावर घेतलं आहे.
![वानखेडेवर चालताना टी-शर्ट हार्दिक पांड्याच्या हातावर येऊन पडलं; जसप्रीत बुमराह हसून हसून लोटपोट, नेमकं काय घडलं? Team India Hardik Pandya Fans Thow Tshirt Wankhede Stadium Jasprit Bumrah cant control his laughter see the video वानखेडेवर चालताना टी-शर्ट हार्दिक पांड्याच्या हातावर येऊन पडलं; जसप्रीत बुमराह हसून हसून लोटपोट, नेमकं काय घडलं?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/06/9c5d358e365b0b2e618059d4a96c93371720243584271987_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Team India Hardik Pandya: 17 वर्षांनंतर भारताने आयसीसी विश्वचषक जिंकला आहे. टीम इंडियाने टी-20 विश्वचषक (T20 World Cup 2024) जिंकण्यासाठी भारतीय फलंदाजांसोबतच गोलंदाजांचं मोलाचं योगदान आहे. शेवटच्या चार षटकांमध्ये भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीचं कंबरडं मोडत विश्वचषक हिसकावून आणला. भारतीय संघाच्या या विजयी कामगिरीत हार्दिक पांड्याचा (Hardik Pandya) मोलाचा वाटा होता. विश्वचषकातील शेवटची ओव्हर हार्दिकने टाकली होती. या षटकात दक्षिण आफ्रिकेा 16 धावांची गरज होती, पण संघाला आठ धावाच काढता आल्या आणि भारताने विश्वचषक जिंकला.
आयपीएल 2024 मध्ये हार्दिक पांड्यावर खूप टीका झाली. मात्र, त्याचं हार्दिक पांड्याला आता सर्वांनी डोक्यावर घेतलं आहे. वानखेडे स्टेडिअमवर हार्दिक पांड्याच्या नावाचाही जोरदार जयघोष सुरु आहे. आयपीएलमध्ये याच वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार असलेल्या हार्दिक पांड्यासाठी छपरी-छपरी अशी घोषणाबाजी करत त्याच्यावर टीका करण्यात आली होती. त्याच मैदानावर आता चाहत्यांनी हार्दिकच्या नावाचा जयघोष केला. याचदरम्यान हार्दिक पांड्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
भारतीय क्रिकेट संघाच्या विजयाच्या रॅलीदरम्यान मुंबईत उत्साह शिगेला पोहोचला होता. परेडनंतर टीम इंडिया वानखेडे स्टेडियमवर एका छोट्या सोहळ्यात सहभागी झाली होती. वानखेडेवर आतमध्ये जातानाच खेळाडू डान्स करत जात होते. यानंतर कर्णधार आणि काही वरिष्ठ खेळाडूंनी संवाद साधला. यावेळेस व्हिक्ट्री लॅपमध्ये टीम इंडियातील खेळाडू वंदे मातरम् गाणं गात होते, ज्याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. बीसीसीआयनेही या गाण्याचा व्हिडीओ शेअर केला. यादरम्यान हार्दिक पंड्यासोबत एक असा काही किस्सा घडला की जे पाहून जसप्रीत बुमराह हसून हसून लोटपोट झाला.
hardik caught someone’s tshirt and the way bumrah is dying of laughter 😭😭😭 pic.twitter.com/EgJm80tQBd
— Kashish (@whatkashish) July 4, 2024
नेमकं काय घडलं?
भारतीय क्रिकेट संघ स्टँडजवळ होता आणि सर्वच खेळाडू चाहत्यांना अभिवादन करत या व्हिक्ट्री लॅपदरम्यान वंदे मातरम् गाणं गात होते. अचानक चाहत्यांमधून आलेला टी-शर्ट अनावधानाने हार्दिक पांड्याने पकडला जो मैदानात फेकला गेला होता. तो शर्टही अगदी हार्दिकच्या हातावरचं येऊन पडला. हे पाहून जसप्रीत बुमराहला हसू आवरता आले नाही. इतर खेळाडूंकडे पाहत तो हसताना दिसला. यानंतर हार्दिक पांड्याने तो टी-शर्ट लगेच जमिनीवर टाकला.
संबंधित बातम्या:
घरी गेल्यानंतर हार्दिक पांड्याने मेडल कोणाला दिले?; अखेर फोटो आला समोर, सोशल मीडियावर कमेंटचा पाऊस
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)