Team India Clean Sweep : केपटाऊनच्या Newlands मैदानात भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या आणि मालिकेतील शेवटच्या एकदिवसीय सामन्यात भारत पराभूत झाला. हा सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत चुरशीचा झाला होता. पण अवघ्या 4 धावांनी पराभूत झाला. य़ाआधी भारताने पहिले दोन सामने गमावून मालिका गमावलीच होती. पण आता ही मालिका भारताने 3-0 ने गमावली. त्यामुळे भारताला एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत क्लिन स्वीप मिळाली आहे. याआधीही भारतावर चार वेळा अशाप्रकारची नामुष्की ओढवली आहे.
सर्वात आधी म्हणजे 1983 मध्ये भारताला वेस्ट इंडीजविरुद्ध एकदिवसीय सामन्यात लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला होता. भारताला वेस्ट इंडीजविरुद्ध खेळलेल्या पाच एकदिवसीय सामन्यातील एकही सामना जिंकता आला नव्हता. त्यानंतर दुसऱ्यांदा भारताला 1989 मध्ये म्हणजे 6 वर्षानंतर एकदिवसीय मालिकेत व्हाईट वॉश मिळाला होता. यावेळीही वेस्ट इंडीज संघाने भारताला मात दिली होती. त्यानंतर 8 वर्षांनी म्हणजे 1997 मध्ये तिसऱ्यांदा भारताला श्रीलंका संघाने 3 सामन्यांच्या मालिकेत व्हाईट वॉश दिली होती. ज्यानंतर आता अलीकडे म्हणजे 2020 मध्ये न्यूझीलंड संघाने 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारताला 3-0 ने मात दिली होती. ज्यानंतर आता 2022 च्या सुरुवातीलाच भारताला दक्षिण आफ्रिकेकडून 3-0 ने मालिका गमवावी लागली आहे.
अशी गमावली भारताने मालिका
नुकत्याच पार पडलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेत भारताने पहिला सामना 31 धावांनी गमावला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताला 7 विकेट्सने पराभव पत्करावा लागला. तर अखेरचा सामना मात्र अत्यंत चुरशीचा झाला. ज्यात भारत विजयाच्या अगदी जवळ गेला होता. पण अखेर विजयासाठीच्या 4 धावा कमी पडल्याने भारत पराभूत झाला.
हे देखील वाचा-
- ICC Awards 2021 : आयसीसीचे 2021 वर्षांतील सर्व पुरस्कार जाहीर, वाचा संपूर्ण यादी एका क्लिकवर
- Ind vs SA, 3rd ODI: चित्तथरारक सामन्यात भारत चार धावांनी पराभूत, एकदिवसीय मालिका 3-0 ने गमावली
- ICC Mens ODI Cricketer of the Year: पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यंदाचा आयसीसी ODI क्रिकेटर
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha