ICC Mens ODI ODI Cricketer of the Year: आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात आयसीसीने सर्व क्रिकेट प्रकारातील 2021 वर्षात सर्वोत्कृष्ट खेळी करणाऱ्या खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. यामध्ये आयसीसी टी20 प्लेयर ऑफ इयर (ICC T20 Player Of Year) पुरस्कार पाकचा सलामीवीर मोहम्मद रिझवानला मिळाला असताना आता आयसीसीचा पुरुष गटातील सर्वोत्कृष्ट एकदिवसीय खेळाडू (ICC Mens ODI ODI Cricketer of the Year) हा पुरस्कारही पाकिस्तानचा दुसरा सलामीवीर आणि कर्णधार बाबर आझमला मिळाला आहे.
या पुरस्कारासाठीच्या यादीमध्ये बाबरसोबत बांग्लादेशचा शाकिब अल् हसन, दक्षिण आफ्रिकेचा जनेमन मलान आणि आयर्लंडचा पॉल स्टर्लिंग यांचा समावेश होता. तर इतर तिघांना पछाडत बाबरने या पुरस्कारावर नाव कोरलं आहे. बाबरने यंदाच्या वर्षभरात संघाला अनेक महत्त्वाचे विजय मिळवून दिले. शिवाय टी20 विश्वचषकातही पाकिस्तानने उल्लेखणीय कामगिरी केली होती. यावेळी बाबरची धावसंख्या कमाल होती.
2021 आणि बाबर आझम
बाबर आझमने 2021 मध्ये सहा सामन्यात दोन शतकं ठोकत 405 धावा केल्या आहेत. या धावा त्याने 67.50 च्या सरासरीने केल्या आहेत. केवळ सहा एकदिवसीय सामने खेळतही त्याने अप्रतिम खेळ दाखवला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे सीरीजमध्ये बाबरने सर्वाधिक 228 धावा केल्या आहेत. यावेळी त्याने पहिल्या वनडेमध्ये एक शतकही झळकावलं आहे. त्यानंतर शेवटच्या वनडेमध्ये त्याने 94 धावाही केल्या आहेत.
हे देखील वाचा-
- ICC T20I Player of Year: पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानचं मोठं यश, आयसीसी टी20 प्लेयर ऑफ द इयर म्हणून जाहीर
- INDvsPAK : 23 ऑक्टोबरला मौका, मौका... क्रिकेटच्या मैदानावर हायव्होल्टेज सामना, टी-20 विश्वचषकात भारत-पाकिस्तान भिडणार
- ICC T20 World Cup 2022 : आयसीसीकडून टी20 विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर; टीम इंडियाचं शेड्यूल पाहा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha