(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gautam Gambhir: स्वत:च्या जाळ्यात अडकला गौतम गंभीर, जुन्या वक्तव्यामुळं गोत्यात, नेटकऱ्यांकडून ट्रोल
Gautam Gambhir Support Staff: भारताचा मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरचा कार्यकाळ श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेनं सुरु होणार आहे. त्यापूर्वीच गौतम गंभीरला जुन्या वक्तव्यामुळं ट्रोलिंगचा सामना करावा लागतो आहे.
Gautam Gambhir Support Staff मुंबई: टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर पुन्हा चर्चेत आहे. गौतम गंभीरचा भारताचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ श्रीलंका दौऱ्यापासून सुरु होणार आहे. गौतम गंभीरच्या मदतीसाठी सपोर्ट स्टाफ म्हणून ज्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे त्यावरुन चर्चा सुरु झाल्या आहेत. अभिषेक नायर (Abhishek Nayar) आणि रियान टेन डोइशे (Ryan Ten Doeschate) यांना सहायक प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. याशिवाय मोर्ने मॉर्केलला (Morne Morkel) बॉलिंग कोच केलं जाणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.
बीसीसीआयनं मोर्ने मॉर्केलच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यास गंभीरच्या सपोर्ट स्टाफमध्ये 2 विदेशी कोच असतील. मात्र,याचवेळी गौतम गंभीरचा जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. गौतम गंभीरनं त्यामध्ये विदेशी प्रशिक्षकांबाबत आक्रमक भूमिका घेत जोरदार हल्लाबोल केला होता.
विदेशी प्रशिक्षकांना पैशाशी मतलब, गंभीरचा आरोप
माध्यमांसोबत चर्चा करताना दोन वर्षांपूर्वी गौतम गंभीरनं विदेशी प्रशिक्षकांविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. "गेल्या सहा-सात वर्षांमध्ये भारतीय क्रिकेटमध्ये एक चांगली गोष्ट झाली ती म्हणजे भारतीय लोक टीम इंडियाचे हेड कोच बनले आहेत. या गोष्टीचा सन्मान करतो. टीम इंडियाला भारतीय प्रशिक्षक मिळाले पाहिजेत. आपण ज्या विदेशी प्रशिक्षकांना अधिक महत्त्व देतो ते केवळ पैसा कमावण्यासाठी येतात आणि गायब होतात", असं गौतम गंभीर म्हणाला होता.
लोक गौतम गंभीरला ट्रोल का करत आहेत?
गौतम गंभीर एकेकाळी विदेशी प्रशिक्षकांच्या नियुक्तीबाबत प्रश्न उपस्थित करत होता. मात्र, स्वत:कडे मुख्य प्रशिक्षक पद आल्यानंतर गंभीर विदेशी प्रशिक्षकांना सोबत घेण्याचा विचार करत आहे, असं काही लोकांनी म्हटलं. नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर गंभीरचे व्हिडीओ शेअर करत सवाल विचारले आहेत. या सर्व प्रकरणावर बोलताना काही लोकांनी जेव्हा भारतानं 2011 मध्ये वर्ल्ड कप जिंकला होता त्यावेळी टीम इंडियाचे प्रशिक्षक दक्षिण आफ्रिकेचे गॅरी कर्स्टन हे भारताचे प्रशिक्षक होते अशी आठवण करुन दिली आहे.
गौतम गंभीरच्या नेतृत्त्वात पहिली मालिका
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरची नियुक्ती करण्यात आली आहे. गौतम गंभीरनं आयपीएलमध्ये लखनौ सुपर जाएंटस आणि कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटॉर म्हणून काम केलं आहे. 2024 चं आयपीएल देखील गंभीरच्या मार्गदर्शनात केकेआरनं मिळवलं. राहुल द्रविडनं मुदतवाढीस नकार दिल्यानंतर गौतम गंभीरच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याचा निर्णय बीसीसीआयनं केला.
@GautamGambhir on Indian coach vs foreign coach... Now what happened 🧐🧐#ICC #BCCI #Gambhir #IndianCricket pic.twitter.com/1jRnbBKWll
— masti entertainment (@Karthidesikan1) July 21, 2024
संबंधित बातम्या :