(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ruturaj Gaikwad : टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, ऋतुराज गायकवाडसाठी चेन्नई सुपर किंग्जची खास पोस्ट, फॅन्स म्हणाले "ऋतु राज करेगा"
Ruturaj Gaikwad : भारतीय संघ आज श्रीलंका दौऱ्यावर रवाना झाला. झिम्बॉब्वेविरुद्धच्या मालिकेत दमदार कामगिरी करुन देखील ऋतुराज गायकवाडला संधी मिळाली नव्हती.
चेन्नई : टी 20 वर्ल्ड कप 2024 (T20 World Cup 2024) चं विजेतेपद मिळवल्यानंतर आणि झिम्बॉब्वेविरुद्ध 4-1 अशी मालिका जिंकून टीम इंडिया (Team India) नव्या मोहिमेसाठी सज्ज झाली आहे. भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यात तीन सामन्यांची टी 20 मालिका आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार आहे. सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्त्वात टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर रवाना झाली आहे. याचवेळी चेन्नई सुपर किंग्जनं ऋतुराज गायकवाडसाठी (Ruturaj Gaikwad) खास ट्विट केलं आहे. चेन्नईनं ऋतुराज गायकवाडसाठी केलेल्या पोस्टवर चाहत्यांनी देखील भन्नाट कमेंट केल्या आहेत.
ऋतुराज गायकवाडला झिम्बॉब्वे दौऱ्यात संधी मिळाली होती. ऋतुराज गायकवाडनं त्या मालिकेत चांगली कामगिरी देखील केली होती. मात्र, काही दिवसांपूर्वी श्रीलंका दौऱ्यासाठी टी 20 आणि एकदिवसीय सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला होता. त्यामध्ये ऋतुराज गायकवाडला संधी देण्यात आली नव्हती. ऋतुराज गायकवाडचा संघात समावेश नसल्यानं अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. आज भारतीय संघ श्रीलंकेला रवाना झाला. चेन्नई सुपर किंग्जनं देखील टायमिंग साधत ऋतुराज गायकवाडसाठी खास पोस्ट केली आहे.
ऋतुराज गायकवाडचा फोटो पोस्ट करत चेन्नईनं खास कॅप्शन लिहिलं आहे. आपण सर्व जण सिंहाची चाल पाहतोय, असं चेन्नईनं म्हटलं आहे. चेन्नई सुपर किंग्जच्या पोस्टवर चाहत्यांनी अनेक कमेंट केल्या आहेत. झिम्बॉब्वे दौऱ्यात पाच पैकी तीन डावात फलंदाजी करुन 133 धावा करणाऱ्या ऋतुराजला श्रीलंका दौऱ्यात संधी मिळेल, अशी आशा त्याच्या चाहत्यांना होती. मात्र, ऋतुराज गायकवाडला संधी मिळालेली नाही. या पार्श्वभूमीवर चाहत्यांनी चेन्नईच्या पोस्टवर कमेंट करताना ऋतु राज करेगा, अशा कमेंट केल्या आहेत.
चेन्नईचं ट्विट
All we see is a lion's walk! 🦁#WhistlePodu pic.twitter.com/OItEpWg8kU
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) July 22, 2024
टीम इंडियाच्या निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी आज पत्रकार परिषद घेतली होती. आजच्या पत्रकार परिषदेत त्यांना ऋतुराज गायकवाडला संघातून का वगळण्यात आलं याबाबत प्रश्न विचारण्यात आले होते. ऋतुराज गायकवाडला डावलल्या गेल्यानं चेन्नईचा माजी क्रिकेटपटू एस. बद्रीनाथनं आगपाखड केली होती.
दरम्यान, टीम इंडिया टी 20 मालिकेसाठी आज श्रीलंकेला रवाना झाली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वात भारतीय संघ 27, 28 जुलै आणि 30 जुलै रोजी तीन टी 20 सामने खेळणार आहेत.
भारताचा टी 20 संघ :
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जायस्वाल, रिंकु सिंह, रियान पराग, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, खलील अहमद, मोहम्मद सिराज
संबंधित बातम्या :
Ravindra Jadeja:रवींद्र जडेजाला श्रीलंका दौऱ्यात का संधी नाही? अजित आगरकरनं सगळं समजावून सांगितलं
रंगेहाथ पकडलं अन्...; हार्दिक पांड्याच्या चुकीची शिक्षा नताशा भोगतेय?, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल