IND vs WI: टीम इंडियाच्या आनंदावर पाणी फेरणारं वृत्त, आयसीसीनं सर्व खेळाडूंना ठोठावला दंड! कारण काय?
India vs West Indies: त्रिनिदादच्या (Trinidad) क्वीन्स पार्क ओव्हल (Queen's Park Oval) स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतानं वेस्ट इंडीजचा दोन विकेट्सनं पराभव केला.
![IND vs WI: टीम इंडियाच्या आनंदावर पाणी फेरणारं वृत्त, आयसीसीनं सर्व खेळाडूंना ठोठावला दंड! कारण काय? Team India Fined For Slow Over-Rate During India vs West Indies 1st ODI IND vs WI: टीम इंडियाच्या आनंदावर पाणी फेरणारं वृत्त, आयसीसीनं सर्व खेळाडूंना ठोठावला दंड! कारण काय?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/25/79ba77cd07e53cfd1d07a81cd0ddcdf91658730074_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
India vs West Indies: त्रिनिदादच्या (Trinidad) क्वीन्स पार्क ओव्हल (Queen's Park Oval) स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतानं वेस्ट इंडीजचा दोन विकेट्सनं पराभव केला. या विजयासह भारतानं तीन सामन्यांच्या मालिकेवर कब्जा केलाय. भारतानं वेस्ट इंडीजविरुद्ध सलग बाराव्यांदा एकदिवसीय मालिका जिंकण्याचा पराक्रम केलाय. मात्र, या विजयाच्या आनंदावर पाणी फेरणारं वृत्त समोर येत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीनं (ICC) भारतीय संघावर षटकांची गती कमी राखण्यासाठी (Slow Over Rate) दंड ठोठावला आहे.
भारतीय संघावर सामना शुल्काच्या 20 टक्के दंड
वेस्ट इंडीजविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतानं निर्धारित वेळेपेक्षा एक षटक कमी टाकल्याचं सांगत दंड ठोठोवला. भारतीय संघावर सामना शुल्काच्या 20 टक्के दंड लावण्यात आहे. आचारसंहितेच्या नियम 2.22 नुसार भारतीय खेळाडूंना निर्धारित वेळेपक्षा एक षटक कमी टाकल्यानं सामना शुल्काच्या २० टक्के दंड लावण्यात येत आहे, अशी माहिती सामना रेफरी रिची रिचर्डसन यांनी दिलीय.
आयसीसीचं ट्वीट-
शिखर धवननं स्वीकारली चूक
पहिल्या एकदिवसीय सामन्यातील पंच जोए विलसन आणि लेसली रीफर, तिसरे पंच ग्रेगरी ब्रेथवेट व चौथे पंच नायजेल डुगुइड यांनी भारतीय संघावर षटकांची गती कमी राखण्याचा आरोप केला. त्यानंतर वेस्ट इंडीजविरुद्ध एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाचं नेतृत्व करणाऱ्या शिखर धवननं आपली चूक मान्य केली. ज्यामुळं कोणताही अधिक कारवाई करण्याची गरज भासली नाही.
वेस्ट इंडीजमध्ये एकदिवसीय मालिका जिंकणारा शिखर पाचवा कर्णधार
वेस्ट इंडिजच्या भूमीवर भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतानं सर्वाधिक दोन वेळा एकदिवसीय मालिका जिंकलीय. भारताचा माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीच्या नेतृत्वात भारतानं पहिल्यांदाच एकदिवसीय मालिकेत वेस्ट इंडीजच्या संघाला त्यांच्याच मायभूमीवर नमवलं होतं. त्यानंतर भारताचा यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं विजयाचा क्रम पुढे नेला. परंतु, धोनीच्या नेतृत्वात भारताला वेस्ट इंडिजमध्ये केवळ एकदाच एकदिवसीय मालिका जिंकलीय. त्यानंतर सुरेश रैनानंही एकदा वेस्ट इंडीजच्या भूमीवर एकदिवसीय मालिकेत भारताल विजय मिळवून दिला होता. या यादीत भारताचा सलामीवीर शिखर धवनंही वेस्ट इंडिजच्या भूमीवर भारताला विजय मिळवून देणाऱ्या कर्णधारांच्या यादीत सामील झालाय.
हे देखील वाचा-
- WI vs IND: त्यांच्याच मायभूमीवर त्यांनाचं नमवलं! वेस्ट इंडीजविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर 'गब्बर'ची खास क्लबमध्ये एन्ट्री
- 1000 धावांचा टप्पाही गाठला नाही, तोच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा; भारतीय महिला विकेटकिपरचा मोठा निर्णय
- IND vs WI: भारतानं पाकिस्तानचा विश्वविक्रम मोडला, वेस्ट इंडीजविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकत रचला इतिहास!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)