टीम इंडियाचा सलग पाचव्यांदा फाईव्ह स्टार काऊंटर अटॅक! ऑस्ट्रेलिया, पाकिस्ताननंतर आता न्यूझीलंडचेही लोटांगण
भारतीय गोलंदाजांनी एकजीव कामगिरी करत प्रतिस्पर्धी संघांना धडकी भरवली आहे. भारताच्या गोलंदाजीविरोधात आतापर्यंत एकाही संघाला 237 धाव संख्या पार करता आलेली नाही.
IND Vs NZ, Innings Highlights : धरमशालामध्ये टीम इंडियाने पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक करत न्यूझीलंडला 273 धावांत रोखले आहे. आतापर्यंत विश्वचषकात भारतीय संघाने भेदक मारा करत प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना संधी दिली नाही. पाच सामन्यात भारतीय संघाच्या गोलंदाजांनी जबरदस्त कमबॅक केले आहे. कधी सिराज, कधी कुलदीप तर कधी शामी अन् कधी बुमराह... भारतीय गोलंदाजांनी एकजीव कामगिरी करत प्रतिस्पर्धी संघांना धडकी भरवली आहे. भारताच्या गोलंदाजीविरोधात आतापर्यंत एकाही संघाला 237 धाव संख्या पार करता आलेली नाही.
एकीकडे या विश्वचषकात 400 धावांचा पाऊस पडतोय. तर दुसरीकडे भारताच्या गोलंदाजीसमोर आतापर्यंत एकाही संघाला 300 धावांचा टप्पा पार करता आलेला नाही. वेगवान आणि फिरकी गोलंदाज पद्धशीरपणे प्रतिस्पर्धी संघाचा कार्यक्रम करत आहेत. ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि आता न्यूझीलंडच्या संघांनी भारतापुढे लोटांगण घातलेय. हे तिन्ही संघ भारतीय आक्रमणापुढे ऑलआऊट झालेत. तर अफगाणिस्तान आणि बांगलादेश संघाच्या आठ विकेट गेल्या आहेत.
भारतीय गोलंदाजांनी कमबॅक केसे केले ?
चेन्नईमध्ये झालेल्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला 199 धावांत रोखले. एकवेळ ऑस्ट्रेलिया 27 षटकात दोन बाद 110 अशा सुस्थितीत होता. पण त्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कमबॅक करत 199 धावांत कांगारुंना गुंडाळले.
अफगाणिस्तान संघानेही चांगली सुरुवात केली होती. 34.1 षटकात अफगाणिस्तान संघाने तीन बाद 184 धावा केल्या होत्या. पण अफगाणिस्तान संघाला 127 धावांपर्यंत मजल मारता आली.
पाकिस्तान संघानेही चांगली सुरुवात केली होती. 29.3 षटकात पाकिस्तान संघाने दोन बाद 155 धावा केल्या होत्या. पण पाकिस्तानचा डाव 191 धावात गडगडला.
बांगलादेश संघाने 14.3 षटकात बिनबाद 93 अशी दमदार सुरुवात केली होती. बांगलादेशचा संघ 300 धावसंख्या पार करेल, असेच वाटले होते. पण बांगलादेश संघाला 256 पर्यंत मजल मारता आली.
न्यूझीलंड संघानेही चांगली सुरुवात केली होती. 33.3 षटकात न्यूझीलंड संघाने तीन बाद 178 धावा केल्या होत्या. शतकवीर डॅरेल मिचेल मैदानावर होता. पण न्यूझीलंडचा डाव 273 धावांत संपुष्टात आला.
भारताची गोलंदाजी कशी राहिली -
मोहम्मद शामी याने जबरदस्त कमबॅक केले. यंदाच्या विश्वचषकात पहिलाच सामना खेळणाऱ्या शामीने न्यूझीलंडच्या पाच फलंदाजांना तंबूत धाडले. शामीने दहा षटकात 54 धावा खर्च केल्या. शामीच्या षटकात एक षटकार आणि सहा चौकार गेले.
जसप्रीत बुमराहने न्यूझीलंडविरोधात कंजूष गोलंदाजी केली. बुमराहने 10 षटकात 45 धावा कर्च केल्या. यामध्ये एक षटक निर्धाव टाकले. शामीने एक विकेटही घेतली. बुमराहच्या गोलंदाजीवर न्यूझीलंडच्या एकही षटकार मारता आला नाही.
कुलदीप यादव आज महागडा ठरला. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी कुलदीपच्या गोलंदाजीवर धावांचा पाऊस पाडला. कुलदीपने 10 षटकात 73 धावा खर्च केल्या. त्याच्या षटकात तीन चौकर आणि 4 षटकार मारले गेले. पहिल्या चाप षटकात कुलदीपला प्रति षटक 10 ने धावा चोपल्या. पण अखेरीस कुलदीपने जोरदार कमबॅक केले. कुलदीप यादवने दोन फलंदाजांना तंबूत धाडले.
मोहम्मद सिराजने धरमशालाच्या मैदानावर भेदक मारा केली. सिराजने 10 षटकांमध्ये फक्त 45 धावा खर्च केल्या. यामध्ये एक षटकाही निर्धाव फेकले. सिराजने एक विकेटही घेतली. सिराजच्या षटकात तीन चौकार आणि एक षटकार गेला.
रवींद्र जाडेजाने 10 षटकांचा कोटा पूर्ण केला. रवींद्र जाडेजाला एकही विकेट मिळाली नाही. रवींद्र जाडेजाने 10 षटकात 48 धावा खर्च केल्या. जाडेजाच्या षटकात एक षटकार आणि दोन चौकार गेले.