Team India A Squad : न्यूझीलंड 'A' संघाविरुद्ध सामन्यांसाठी भारताचा 'A' संघ जाहीर, प्रियांककडे कर्णधारपद, उमरान-ऋतुही मैदानात
IND A vs NZ A : भारतीय अ संघ न्यूझीलंडच्या अ संघाविरुद्ध तीन चारदिवसीय आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. यावेळी चारदिवसीय सामन्यांसाठी भारताने संघ नुकताच जाहीर केला आहे.

India A vs New Zealand A : भारताचा वरिष्ठ संघ सध्या आशिया कपच्या तयारीत व्यस्त असताना दुसरीकडे 'अ' संघाने न्यूझीलंड 'अ' संघाविरुद्ध आपला संघ जाहीर केला आहे. भारतीय अ संघ न्यूझीलंडच्या अ संघाविरुद्ध तीन चारदिवसीय आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. यावेळी चारदिवसीय सामन्यांसाठी भारताने संघ नुकताच जाहीर केला आहे. यावेळी प्रियांक पांचाळ याला कर्णधारपद देण्यात आलं असून ऋतुराज गायकवाड, सरफराज खान, केएस भरत, उमरान मलिक यासारख्या बऱ्याच अव्वल दर्जाच्या खेळाडूंचा संघात समावेश आहे.
बीसीसीआयने जाहीर केलेल्या या संघात यंदाच्या आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा अधिक समावेश आहे. यामध्ये ऋतुराज गायकवाड, रजत पाटीदार, यश दयाल, सरफराज खान, टिळक वर्मा, केएस भरत यांची नावं येतात. तर वरिष्ठ संघात नसलेले कुलदीप यादव, राहुल चहर, प्रसिद्ध कृष्णा, उमरान मलिक यांनाही संधी मिळाली आहे.
कसा आहे भारतीय 'अ' संघ?
प्रियांक पांचाळ (कर्णधार), अभिमन्यू इश्वरन, ऋतुराज गायकवाड, रजत पाटीदार, सरफराज खान, टिळक वर्मा, केएस भरत (यष्टीरक्षक), उपेंद्र यादव (यष्टीरक्षक), कुलदीप यादव, सौरभ कुमार, राहुल चहर, प्रसिद्ध कृष्णा, उमरान मलिक, मुकेश कुमार, यश दयाल, अरझान नागवासवा
कसं आहे वेळापत्रक?
| सामना | कधी | कधीपर्यंत | सामना | ठिकाण | ||
| भारत 'A' विरुद्ध न्यूझीलंड 'A' | गुरुवार | 1 सप्टेंबर | रविवार | 4 सप्टेंबर | पहिला चारदिवसीय सामना | एम. चिन्नस्वामी स्टेडियम, बंगळुरु |
| गुरुवार | 8 सप्टेंबर | रविवार | 11 सप्टेंबर | दुसरा चारदिवसीय सामना | KSCA राजनगर स्टेडियम, हुबळी | |
| गुरुवार | 15 सप्टेंबर | रविवार | 18 सप्टेंबर | तिसरा चारदिवसीय सामना | एम. चिन्नस्वामी स्टेडियम, बंगळुरु | |
| गुरुवार | 22 सप्टेंबर | - | - | पहिला एकदिवसीय सामना | एम. ए. चिंदबरम स्टेडियम, चेन्नई | |
| रविवार | 25 सप्टेंबर | - | - | दुसरा पहिला एकदिवसीय सामना | एम. ए. चिंदबरम स्टेडियम, चेन्नई | |
| गुरुवार | 27 सप्टेंबर | - | - | तिसरा एकदिवसीय सामना | एम. ए. चिंदबरम स्टेडियम, चेन्नई | |
हे देखील वाचा-




















