T20 World Cup : मौका... मौका... 24 ऑक्टोबरला भिडणार भारत-पाकिस्तान; टीम इंडियाचं संपूर्ण शेड्यूल
ICC T20 World Cup : 24 ऑक्टोबरला टीम इंडिया आणि पाकिस्तान एकमेकांविरोधा भिडणार आहेत. विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात टीम इंडिया आणि पाकिस्तान आमने-सामने येणार आहेत.
ICC T20 World Cup : आयपीएल (IPL) संपलं असून आता टी20 विश्वचषकाचा महासंग्राम सुरु झाला आहे. या स्पर्धेत 16 संघ विश्वचषकावर आपलं नाव कोरण्यासाठी आपापसांत भिडताना दिसणार आहेत. भारत (India) 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान (Pakistan) विरोधात या स्पर्धेतील आपला पहिला सामना खेळणार आहे. सर्व संघांनी कंबर कसली आहे. टीम इंडिया (Team India) आधीपासूनच युएईमध्ये उपस्थित असून स्पर्धेची सुरुवात सराव सामन्यांपासून होणार आहे. T20 World Cup 2021 ची सुरुवात 17 ऑक्टोबरपासून झाली असून 14 नोव्हेंबर रोजी स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. आयसीसीनं संघांचं विभाजन चार ग्रुप्समध्ये केलं आहे. त्यांच्यात एकूण 45 सामने खेळवण्यात येणार आहेत. जाणून घेऊया भारताचं विश्वचषक स्पर्धेतील संपूर्ण शेड्यूल...
भारताच्या सराव सामन्यांचं संपूर्ण शेड्यूल :
- 18 ऑक्टोबर, भारत विरुद्ध ,इंग्लंड पहिला वॉर्म-अप सामना
20 ऑक्टोबर, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, दुसरा वॉर्म-अप सामना
Team India Coach Update: प्रशिक्षक पदासाठी राहुल द्रविडला मिळणार घसघशीत मानधन, 2023 पर्यंत असणार कोच
सुपर 12 सामने :
- 24 ऑक्टोबर (रविवार) : भारत विरुद्ध पाकिस्तान : दुबई : संध्याकाळी 07.30 वाजता
- 31 ऑक्टोबर (रविवार) : भारत विरुद्ध न्यूझिलंड : दुबई : संध्याकाळी 07.30 वाजता
- 03 नोव्हेंबर (बुधवार) : भारत विरुद्ध अफगाणिस्तान : अबु धाबी : संध्याकाळी 07.30 वाजता
- 05 नोव्हेंबर (शुक्रवार) : भारत विरुद्ध B1 (क्वॉलिफायर) : संध्याकाळी 07.30 वाजता
- 06 नोव्हेंबर (सोमवार) : भारत विरुद्ध A2 (क्वॉलिफायर) : संध्याकाळी 07.30 वाजता
सेमीफायनल्स आणि फायनलचा कार्यक्रम
- 10 नोव्हेंबर : पहिली सेमीफायनल
- 11 नोव्हेंबर : दुसरी सेमीफायनल
- 14 नोव्हेंबर : फायनल
- 15 नोव्हेंबर : फायनलसाठी रिझर्व्ह डे
दरम्यान, टीम इंडिया या स्पर्धेची सुरुवात 24 ऑक्टोबरपासून करणार आहे. या स्पर्धेचा पहिल्याच सामन्यात टीम इंडिया पाकिस्तानसोबत भिडणार आहे. यापूर्वी भारत दोन वॉर्म अप सामने खेळणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :