(Source: Poll of Polls)
CAN vs IRE: कॅनडाचा पलटवार, आयरलँडवर 12 धावांनी विजय, टी-20 वर्ल्ड कपमध्ये इतिहास रचला
CAN vs IRE: कॅनडानं पहिल्यांदा बॅटिंग करताना 7 विकेटवर 137 धावा केल्या. आयरलँडला भारताकडून तर कॅनडाला यापूर्वी अमेरिकेकडून पराभव स्वीकारावा लागला होता.
CAN vs IRE न्यूयॉर्क : टी20 वर्ल्ड कपमध्ये आज कॅनडा आणि आयरलँड आमने सामने आले. कॅनडानं पहिल्यांदा फलंदाजी करताना 7 विकेटवर 137 धावा केल्या. निकोलस किर्टन आणि श्रेयस मोवा यांनी केलेल्या 75 धावांच्या भागिदारी मुळं कॅनडानं 137 धावांपर्यंत मजल मारली. आयरलँडकडून जॉर्ज डॉकरेल आणि मार्क अडायर यांनी केलेल्या दमदार कामगिरीच्या जोरावर मॅचमध्ये रंगत निर्माण झाली. मार्क अडायरनं 34 धावा केल्या. आयरलँडच्या संघानं अखेरच्या ओव्हरपर्यंत लढत दिली. अखेर कॅनडानं 12 धावांनी आयरलँडला पराभूत करत टी-20 वर्ल्ड कपमधील पहिला विजय मिळवला आहे. आयरलँडनं 20 ओव्हरमध्ये 7 विकेटवर 125 धावा केल्या.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या कॅनडाच्या डावाची सुरुवात खराब झाली. मात्र, निकोलस किर्टन आणि श्रेयस मोवा या दोघांनी 75 धावांची भागिदारी केल्यानं कॅनडाला सन्मानजनक धावसंख्या उभारण्यात आली. निकोलसनं 35 बॉलमध्ये 49 धावांची खेळी केली. यामध्ये त्यानं 3 चौकार आणि 2 षटकार मारले. दुसरीकडे श्रेयसनं 36 बॉलमध्ये 37 धावा केल्या. आयरलँडच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. बैरी मॅक्कार्थी आणि क्रेग यंगनं दोन दोन विकेट घेतल्या. क्रेग यंग टी20 वर्ल्ड कपमधील पहिली मॅच खेळत होता.
आयरलँडनं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या कॅनडाच्या डावाची सुरुवात खराब झाली. पहिल्या पाच ओव्हरमध्ये कॅनडानं 2 विकेटमध्ये 26 धावा केल्या होत्या. नवनीत ढालीवाल 6 धावा आणि अरोन जोन्स 14 धावा करुन बाद झाला. सहा ओव्हरमध्ये कॅनडानं 2 विकेटवर 37 धावा केल्या होत्या. परगत सिंह 18 धावा करुन बाद झाला होता. यानंतर दिलप्रीत बाजवा 7 धावा करुन बाद झाला. 10 ओव्हरमध्ये कॅनडानं 3 विकेट गमावून 63 धावा केल्या होत्या.
पुढच्या 5 ओव्हरमध्ये कॅनडानं एकही विकेट गमावली नाही. त्या 5 ओव्हरमध्ये कॅनडानं 29 धावा केल्या. कॅनडानं 53 धावांमध्ये 4 विकेट गमावल्या होत्या. तेव्हा कॅनडाचा संघ 100 धावा करु शकेल की नाही अशी स्थिती होती. निकोलस किर्टन आणि श्रेयस मोवा यांनी 75 धावांची भागिदारी केली. यामुळं कॅनडानं 7 विकेटवर 138 धावा केल्या.
टी-20 वर्ल्ड कप अ गटातील चित्र काय?
टी-20 वर्ल्ड कपमध्ये एकूण 20 संघ सहभागी झाले आहेत. गट अमध्ये भारत, पाकिस्तान, अमेरिका, कॅनडा आणि आयरलँडचा समावेश आहे. अमेरिकेनं दोन सामन्यातील विजयासह 4 गुण मिळवले आहेत. भारतानं एका मॅचमधील विजयासह 2 गुण मिळवत दुसरं स्थान मिळवलं आहे. पाकिस्तानचा एका मॅचमध्ये पराभव झाला आहे. आयरलँडला पराभूत करत कॅनडानं विजयाचं खात उघडलं आहे.
संबंधित बातम्या :