एक्स्प्लोर

 PAK vs AUS : पाकिस्तानला मोठा धक्का, शोएब मलिकसह रिझवान आजारी, कोरोना चाचणीही झाली

PAK vs AUS, T20 World Cup 2021 : पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये आज विश्वचषकातील दुसरा उपांत्य सामना होणार आहे. या सामन्यापूर्वीच पाकिस्तानची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.

PAK vs AUS, T20 World Cup 2021 : पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये आज विश्वचषकातील दुसरा उपांत्य सामना होणार आहे. या सामन्यापूर्वीच पाकिस्तानची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. विश्वचषकात दमदार कामगिरी करणारा मोहम्मद रिझवान आणि अनुभवी शोएब मलिक आजारी असल्याचं वृत्त समोर आलं आहे. रिझवान यानं विश्वचषकात बाबरला चांगली साथ दिली होती. बाबर-रिझवान यांनी पाकिस्तान संघाच्या विजयात मोलाची भूमिका पार पाडली होती. शोएब मलिक याच्यामुळे पाकिस्तान संघाच्या मधल्या फळीला ताकद मिळाली होती. मोहम्मद रिझवान आणि शोएब मलिक यांना बुधवारी सकाळी ताप आला होता. त्यामुळे त्यांनी ट्रेनिंगमध्येही सहभाग घेतला नाही. सुत्रांच्या माहितीनुसार,  दोघांची कोरोना चाचणीही झाली. पाकिस्तानच्या सुदैवानं ही चाचणी निगेटिव्ह आली. पाकिस्तान संघ व्यवस्थापनाला दोघांच्याही खेळण्याची आपेक्षा आहे. मात्र, सामन्यापूर्वी त्यांच्या पुन्हा एकदा तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर दोघांच्या खेळण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.

कोण घेणार जागा?
यूएई येथे सुरु असलेल्या विश्वचषकात पाकिस्तान संघानं दमदार कामगिरी केली आहे. साखळी फेरीतील पाचही सामन्यात विजय मिळवत पाकिस्तान संघानं एकहाती उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. साखळी सामन्यात रिझवान आणि मलिक यांनी संघासाठी मोलाची कामगिरी केली. जर उपांत्य सामन्यात खेळू शकले नाहीत, तर पाकिस्तानच्या संघाला त्यांची उणीव नक्कीच जाणवेल. प्रसार माध्यमांच्या वृत्तानुसार, पाकिस्तान संघ व्यवस्थापनानं माजी कर्णधार सर्फराज अहमद आणि हैदर अली यांना तयार राहण्यास सांगितलं आहे. रिझवान आणि मलिक यांची तब्येत ठीक न झाल्यास हे दोन्ही खेळाडू आज खेळताना दिसू शकतात.

पाकिस्तानचा विजयरथ ऑस्ट्रेलिया रोखणार का?
आज, गुरुवारी टी20 विश्वचषकातील दुसरा उपांत्य सामना होणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यामध्ये उपांत्य सामन्यात लढाई होणार आहे. अजेय पाकिस्तान संघासमोर उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचं कडवं आव्हान असणार आहे. साखळी फेरीत पाकिस्तान संघानं एकही पराभव स्विकारला नाही. 2016 मध्ये साखळी फेरीत गारद होणाऱ्या पाकिस्तान संघानं यूएईत सुरु असलेल्या स्पर्धेत दमदार कामगिरी करत सर्वांनाच चकीत केलं आहे. विशेष म्हणजे, यंदाच्या स्पर्धेत पराभव न स्वीकारणारा पाकिस्तान एकमेव संघ आहे. दुसरीकडे 2010 प्रमाणे ऑस्ट्रेलियाचा संघ उपांत्य फेरीत पाकिस्तानवर मात करणार का? भारताचा 10 गड्यांनी पराभव करत पाकिस्तान संघानं दिमाखात विश्वचषकाची सुरुवात केली होती. त्यानंतर न्यूझीलंड, अफगाणिस्तान, नामिबिया आणि स्कॉटलँड यांच्यावर विजय मिळवत उपांत्य फेरीत स्थान पटकावलं. ऑस्ट्रेलियाला साखळी फेरीत परंपरागत प्रतिस्पर्धी इंग्लंडकडून हार पत्करावी लागली. पण दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश आणि वेस्ट इंडिजला हरवून नेट रनरेटच्या आधारावर उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. 2010 मध्ये ऑस्ट्रेलियानं टी20 विश्वचषकावर नाव कोरलं होतं, याची पुनारवृत्तीसाठी ऑस्ट्रेलियाही सज्ज आहे. मात्र, त्यांच्यासमोर पाकिस्तानचं आव्हान आहे. 

आकडे काय सांगतात?
ऑस्ट्रलिया आणि पाकसितान आतापर्यंत 23 टी20 सामन्यात आमनेसामने आले आहेत. यापैकी 13 सामन्यात पाकिस्तान संघानं बाजी मारली आहे. तर फक्त 9 सामन्यात ऑस्ट्रेलियाला विजय मिळवता आलेला आहे. एका सामन्यात निकाल लागला नव्हता. आकडे पाकिस्तान संघाच्या बाजूनं असले तरी उपांत्य सामन्यात विजय कसा मिळवयचा हे ऑस्ट्रेलियाला चांगलेच माहित आहेत. यंदा पाकिस्तानचा संघही फॉर्ममध्ये आहे.  त्यामुळे उपांत्य सामना रोमांचक होईल.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Shefali Bagga On Dating Rumors With Yuzvendra Chahal: युझवेंद्र चहलसोबत रिलेशनशिपच्या चर्चा; पण 'बिग बॉस' फेम अभिनेत्री म्हणतेय, 'मला विराट कोहलीसारखाच पार्टनर हवा...'
युझवेंद्र चहलसोबत रिलेशनशिपच्या चर्चा; पण 'बिग बॉस' फेम अभिनेत्री म्हणतेय, 'मला विराट कोहलीसारखाच पार्टनर हवा...'
SRH vs DC IPL 2026 : अभिषेकचं शतक अन् मलिंगाच्या जादूने काव्या मारनच्या हैदराबादचं दिवस बदलले, पॉइंट्स टेबलमध्ये उलथापालथ
अभिषेकचं शतक अन् मलिंगाच्या जादूने काव्या मारनच्या हैदराबादचं दिवस बदलले, पॉइंट्स टेबलमध्ये उलथापालथ
SRH vs DC Live Score : अभिषेकनंतर हैदराबादच्या गोलंदाजांचा तांडव! सनरायझर्सने दिल्लीला 47 धावांनी केले पराभूत
SRH vs DC Live Updates IPL 2026 : अभिषेकनंतर हैदराबादच्या गोलंदाजांचा तांडव! सनरायझर्सने दिल्लीला 47 धावांनी केले पराभूत
Abhishek Sharma Century : 10 चौकार, 10 षटकार अन् मैदानावर अभिषेकचा राडा! शतकानंतर असं काय केलं की अख्खा स्टेडिअम पाहतच राहिलं? सेलिब्रेशनमागचं कारण सांगून टाकलं
10 चौकार, 10 षटकार अन् मैदानावर अभिषेकचा राडा! शतकानंतर असं काय केलं की अख्खा स्टेडिअम पाहतच राहिलं? सेलिब्रेशनमागचं कारण सांगून टाकलं

व्हिडीओ

Amol Mitkari On Murlidhar Mohol :ब्लॅक बॉक्स कुठे? विमानाचा CCTV कुठे? मोहोळांनी माफी मागावी-मिटकरी
Nashik TCS Case : निर्लज्जपणाचा कहर नराधमांच्या हाती पदर Special Report
Sanjay Dutt Movie : काँग्रेसच्या भुमिकेमुळे संजय दत्तच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह Special Report
Vidhan Parishad Election 2026: विधानपरिषद निवडणुकीत भाजपच्या वाट्याला 6 जागा, इच्छूकांची फिल्डिंग, ही 12 नावं रेसमध्ये, कोणाला उमेदवारी मिळणार
US- Iran Ceasefire: अमेरिका आणि इराणच्या युद्धविरामात वाढ; पुन्हा पाकिस्तानची मध्यस्थी; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video:आयपीएलमध्ये 'स्मोकिंग बॉम्ब'चा स्फोट; रबाडा धूर काढत असल्याचा व्हिडिओ व्हायरल? गुजरात टायटन्सवर प्रश्नचिन्ह
Video:आयपीएलमध्ये 'स्मोकिंग बॉम्ब'चा स्फोट; रबाडा धूर काढत असल्याचा व्हिडिओ व्हायरल? गुजरात टायटन्सवर प्रश्नचिन्ह
हिरे, दागिने, प्रायव्हेट जेट, 52 लाखांचा अरबी घोडा ते आलिशान गिफ्ट दिल्या त्याच जॅकलिन फर्नांडिसचा आता सुकेशविरोधात एल्गार! कोर्टात अर्ज देताच सुकेशच्या चिट्टीतील फक्त 7 शब्दांनी लक्ष वेधलं!
हिरे, दागिने, प्रायव्हेट जेट, 52 लाखांचा अरबी घोडा ते आलिशान गिफ्ट दिल्या त्याच जॅकलिन फर्नांडिसचा आता सुकेशविरोधात एल्गार! कोर्टात अर्ज देताच सुकेशच्या चिट्टीतील फक्त 7 शब्दांनी लक्ष वेधलं!
करुणा शर्मांनी पतीराजाला विचारुन फॉर्म भरला, ही भानगड काय? बारामती पोटनिवडणुकीवरुन बजरंग सोनवणेंचा सवाल
करुणा शर्मांनी पतीराजाला विचारुन फॉर्म भरला, ही भानगड काय? बारामती पोटनिवडणुकीवरुन बजरंग सोनवणेंचा सवाल
नेपाळचे माजी गृहमंत्री जेलमध्ये असतानाच थेट विद्यमान गृहमंत्र्यांचा राजीनामा पडला! असं नेमकं घडलं तरी काय? अवघ्या 25 दिवसांपूर्वीच नव्या सरकारमध्ये शपथविधी
नेपाळचे माजी गृहमंत्री जेलमध्ये असतानाच थेट विद्यमान गृहमंत्र्यांचा राजीनामा पडला! असं नेमकं घडलं तरी काय? अवघ्या 25 दिवसांपूर्वीच नव्या सरकारमध्ये शपथविधी
IRGC seized vessel : मोठी बातमी, भारताकडे येणारं जहाज होर्मुझच्या सामुद्रधुनीत जप्त, IRGC ची कारवाई, जहाज इराणकडे घेऊन गेले  
मोठी बातमी, भारताकडे येणारं जहाज होर्मुझच्या सामुद्रधुनीत जप्त, IRGC ची कारवाई 
RBI : ऑटो डेबिटपूर्वी खातेदारांना माहिती देणं आवश्यक, बँकांच्या मनमानीवर आरबीआयच्या नव्या नियमानं चाप, 24 तासांअगोदर माहिती द्यावी लागणार
ऑटो डेबिटपूर्वी खातेदारांना माहिती देणं आवश्यक, बँकांच्या मनमानीवर आरबीआयच्या नव्या नियमानं चाप
Chhatrapati Sambhajinagar: घरात घुसली, आतून कडी लावली; महिलेचा सासू सुनेला संपवण्याचा प्रयत्न, डोक्यावर पिस्तुल रोखलं अन्... घटनेनं संभाजीनगर हादरलं
घरात घुसली, आतून कडी लावली; महिलेचा सासू सुनेला संपवण्याचा प्रयत्न, डोक्यावर पिस्तुल रोखलं अन्... घटनेनं संभाजीनगर हादरलं
बाई नाही, तर लेकराची आई कडाडली; वाहतूक कोंडीने एवढं का संतापली महिला, मंत्र्यांनाही सुनावलं, नेमकं कारण काय?
बाई नाही, तर लेकराची आई कडाडली; वाहतूक कोंडीने एवढं का संतापली महिला, मंत्र्यांनाही सुनावलं, नेमकं कारण काय?
Embed widget