एक्स्प्लोर

सूर्यकुमारने घेतलेल्या 'झेल'वरुन वाद...; पण बाऊंड्री लाईन मागे का घेतलेली?, जाणून घ्या यामागचं कारण!

Suryakumar Yadav David Miller Catch: सूर्यकुमार यादवच्या झेलबाबत सोशल मीडियावर वेगवेगळे दावे केले जात आहेत.

Suryakumar Yadav David Miller Catch: सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) सीमारेषेवर डेव्हिड मिलरची अप्रतिम कॅच पकडली आणि तिथेच सामना भारताने जिंकल्यात जमा झाला. टी-20 विश्वचषकाच्या (T20 World Cup 2024) सामन्यात भारताचने दक्षिण अफ्रिकेविरुद्ध 7 धावांनी विजय मिळवला.  दरम्यान, या सामन्यात सूर्यकुमार यादवने टीपलेल्या एका झेलमुळे भारताचा विजय सोपा झाला. या झेलनंतर सूर्यकुमार यादवचे कौतुक केले जात आहे. मात्र सूर्यकुमारने घेतलेल्या झेलवरुन वाद देखील निर्माण झाला आहे. 

सूर्यकुमार यादवच्या या झेलबाबत सोशल मीडियावर वेगवेगळे दावे केले जात आहेत. यामध्ये सूर्यकुमारने जेव्हा झेल टीपला तेव्हा त्याचा एक पाय सीमारेषेला लागला होता असं सोशल मीडियावर म्हटलं जातंय. तसेच सूर्यकुमार यादवने झेल घेतला त्या ठिकाणची बॉऊंड्री लाईन मागे घेतल्याचा दावाही सोशल मीडियावर केला जात होता. 

बाऊंड्री लाईन मागे का घेतलेली?

सूर्यकुमारने झेल घेतला, तेव्हा बाऊंड्री लाईन मागे घेतल्याचे दिसून येत आहे. यावेळी सफेद रंगाची पट्टी व्हिडीओ आणि फोटोमध्ये दिसतेय. मात्र ही लाईन गेल्या सामन्यातील होती. गेल्या सामन्यात सफेद कलरच्या दिसणाऱ्या लाईनवर बाऊंड्री ठेवण्यात आली होती. त्यावेळी खेळपट्टी देखील वेगळी होती. मात्र अंतिम सामन्याच्या खेळपट्टीनूसार बाऊंड्री लाईन मागे घेण्यात आली होती. 

सूर्यकुमार यादव काय म्हणाला?

सोशल मीडियावर बोलताना सूर्यकुमार यादव म्हणाला की, त्या दिवशी वेगळीच फिल्डिंग लागली होती. कारण रोहित शर्मा कधी लॉन्ग-ऑनवर उभा राहत नाही. परंतु त्यावेळी तो तिथे होता. जेव्हा चेंडू माझ्या दिशेने येत होता तेव्हा तिकडे धावताना मी सर्वांत आधी रोहितकडे पाहिले. मला चेंडू पकडायचा तर होता, परंतु रोहित जवळ असता तर त्याच्याकडेच मी तो फेकला असता. पण तो जवळ नव्हता. यानंतर डोक्यात चक्र फिरले आणि मी मैदानाबाहेर जाऊन परत झेल टिपण्याचा मार्ग निवडला, असं सूर्यकुमार यादवने सांगितले. 

सूर्यकुमार यादवने झेल घेत सामन्याला दिली कलाटणी 

बार्बाडोस येथे खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकण्यापूर्वी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीच्या शानदार 76 धावा आणि अक्षर पटेलच्या शानदार 47 धावांच्या जोरावर टीम इंडियाने निर्धारित 20 षटकात 7 गडी गमावून 176 धावा केल्या. याला प्रत्युत्तर म्हणून लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाची सुरुवात चांगली झाली नाही.संघाला सुरुवातीलाच दोन धक्के बसले. यानंतर हेनरिक क्लासेन आणि डेव्हिड मिलर यांनी शानदार फलंदाजी करत टीम इंडियाकडून सामना जवळपास हिसकावून घेतला होता. हार्दिक पांड्याने शानदार गोलंदाजी करत हेनरिक क्लासेनला झेलबाद केले. पण डेव्हिड मिलर अजूनही क्रीजवर होता. शेवटच्या षटकात दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 16 धावांची गरज होती. डेव्हिड मिलर स्ट्राइकवर होता. यावेळी डेव्हिड मिलरने हार्दिक पांड्याच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारण्याचा प्रयत्न केला. जवळपास मिलर यशस्वी देखील झाला. मात्र सूर्यकुमार यादवने सीमारेषेवर धावत येऊन चेंडू पकडला. पण तो सीमारेषेला स्पर्श करणार होता. त्यामुळे त्याने चेंडू हवेत फेकला आणि नंतर सीमारेषेत प्रवेश केला आणि हा सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला. जर त्याला झेल ऐवजी षटकार मिळाला असता. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ हा सामना जिंकू शकला असता आणि टीम इंडियाचे विजेतेपदाचे स्वप्न भंग झाले असते.

संबंधित बातम्या:

मोठी बातमी: मुंबई पुन्हा एकदा थांबणार?; विश्वविजेत्या टीम इंडियाची ओपन डेकमधून विजयी मिरवणुकीची शक्यता

हार्दिक पांड्याच्या मागची विघ्नं संपता संपेना; पुन्हा संशायाची पाल चुकचुकली, नेमंक काय घडलं?

रोहित-विराटपासून डेव्हिड वॉर्नरपर्यंत; 2024 च्या टी20 विश्वचषकानंतर कोणी-कोणी निवृत्ती घेतली?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Police Recruitment : पोलीस भरती दरम्यान आणखी एका युवकाचा दुर्दैवी अंत; आतापर्यंत राज्यातली तिसरी मृत्यूची घटना
पोलीस भरती दरम्यान आणखी एका युवकाचा दुर्दैवी अंत; आतापर्यंत राज्यातली तिसरी मृत्यूची घटना
बारामतीत पवार कुटुंब एकत्र; राजकारण्यांच्या पंढरीत वारकऱ्यांचं अनोखं स्वागत, राजकीय बॅनर व्हायरल
बारामतीत पवार कुटुंब एकत्र; राजकारण्यांच्या पंढरीत वारकऱ्यांचं अनोखं स्वागत, राजकीय बॅनर व्हायरल
Manoj Jarange Patil : महाराष्ट्र छगन भुजबळची मक्तेदारी नाही, सरकारला इशारा, मराठ्यांच्या नादी लागलं की कार्यक्रम; मनोज जरांगेंच्या भाषणातील 10 मुद्दे
महाराष्ट्र छगन भुजबळची मक्तेदारी नाही, सरकारला इशारा, मराठ्यांच्या नादी लागलं की कार्यक्रम; मनोज जरांगेंच्या भाषणातील 10 मुद्दे
NEET पेपरफुटी प्रकरण, ZP शिक्षकाच्या बँक खात्यात मोठी उलाढाल;  आरोपीला आणखी 2 दिवसांची सीबीआय कोठडी
NEET पेपरफुटी प्रकरण, ZP शिक्षकाच्या बँक खात्यात मोठी उलाढाल; आरोपीला आणखी 2 दिवसांची सीबीआय कोठडी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahadev Jankar On Baramati Loksabha : पुढची लोकसभा निवडणूक बारामतीतून लढवणार : जानकरABP Majha Marathi News Headlines 5pm TOP Headlines 06 July 2024Rani Lanke Ahmednagar : आंदोलनस्थळी चूल पेटवून,स्वयंपाक करत राणी लंकेंकडून सरकारचा निषेधNahsik Ramkund Goda Aarti:रामकुंड परिसरात गोदा आरतीवरून रामतीर्थ सेवा समिती-पुरोहित संघात पुन्हा वाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Police Recruitment : पोलीस भरती दरम्यान आणखी एका युवकाचा दुर्दैवी अंत; आतापर्यंत राज्यातली तिसरी मृत्यूची घटना
पोलीस भरती दरम्यान आणखी एका युवकाचा दुर्दैवी अंत; आतापर्यंत राज्यातली तिसरी मृत्यूची घटना
बारामतीत पवार कुटुंब एकत्र; राजकारण्यांच्या पंढरीत वारकऱ्यांचं अनोखं स्वागत, राजकीय बॅनर व्हायरल
बारामतीत पवार कुटुंब एकत्र; राजकारण्यांच्या पंढरीत वारकऱ्यांचं अनोखं स्वागत, राजकीय बॅनर व्हायरल
Manoj Jarange Patil : महाराष्ट्र छगन भुजबळची मक्तेदारी नाही, सरकारला इशारा, मराठ्यांच्या नादी लागलं की कार्यक्रम; मनोज जरांगेंच्या भाषणातील 10 मुद्दे
महाराष्ट्र छगन भुजबळची मक्तेदारी नाही, सरकारला इशारा, मराठ्यांच्या नादी लागलं की कार्यक्रम; मनोज जरांगेंच्या भाषणातील 10 मुद्दे
NEET पेपरफुटी प्रकरण, ZP शिक्षकाच्या बँक खात्यात मोठी उलाढाल;  आरोपीला आणखी 2 दिवसांची सीबीआय कोठडी
NEET पेपरफुटी प्रकरण, ZP शिक्षकाच्या बँक खात्यात मोठी उलाढाल; आरोपीला आणखी 2 दिवसांची सीबीआय कोठडी
Manoj jarange :
"भुजबळांचे ऐकून मराठ्यांवर अन्याय केला तर 288 पैकी एकही निवडून येऊ देणार नाही"; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
Rohit Pawar : गृहमंत्री झोपले आहेत का? पालकमंत्री  कुठं आहेत? पोलिसांवर हल्ले होऊ लागले; रोहित पवारांचा हल्लाबोल
गृहमंत्री झोपले आहेत का? पालकमंत्री कुठं आहेत? पोलिसांवर हल्ले होऊ लागले; रोहित पवारांचा हल्लाबोल
Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या, एका क्लिकवर
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या, एका क्लिकवर
चंद्रकांत पाटील का संतापले? फोनवरुन समोरच्याला ओरडतानाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद, नेमकं प्रकरण काय?
चंद्रकांत पाटील का संतापले? फोनवरुन समोरच्याला ओरडतानाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद, नेमकं प्रकरण काय?
Embed widget