T20 World Cup 2024: टी-20 विश्वचषक 2024 च्या स्पर्धेत (ICC T20 World Cup 2024) भारत आणि ऑस्ट्रेलियाचा सामना झाला. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 24 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने उपांत्य फेरीत प्रवेश केला. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) डावाच्या सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली. विराट कोहली शून्यावर बाद झाल्यानंतरही रोहित शर्माने फटकेबाजी थांबवली नाही. ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कची रोहित शर्माने चांगलीच धुलाई केली.


मिचेल स्टार्कच्या एका षटकात रोहितने चार षटकार टोलावत 29 धावा केल्या. या सामन्यात रोहितचं थोडक्यात शतक हुकलं. रोहितने 41 चेंडूत 92 धावा केल्या. रोहित शर्माच्या या फलंदाजीवर मिचेल स्टार्कची पत्नी आणि ऑस्ट्रेलियाची क्रिकेटपटू एलिसा हिली देखील चाहती झाली. भारत आणि ऑस्ट्रेलियाचा सामना एलिसा हिलीनेसुद्धा पाहिला. या सामन्यात पती मिचेल स्टार्कला रोहितने धू धू धुतल्यानंतरही एलिसा हिलीने रोहितचं कौतुक केलं. एलिसाने रोहितची बॅटिंग पाहिली. तो चेंडूला क्लीन हिट करतो. एकदा तो सुरु झाल्यानंतर, त्याला रोखणं कठीण आहे. रोहित शॉर्ट बॉलचा मोठा खेळाडू आहे, असं एलिसा हिली एका मुलाखतीत बोलताना म्हणाली. 


टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला पराभूत सेमी फायनल गाठली-


टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला पराभूत करुन विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. ऑस्ट्रेलिया सामन्यात टीम इंडियाने सुपर-8 मध्ये सलग तिसरा विजय मिळवला होता. ऑस्ट्रेलियापूर्वी भारताने सुपर-8 मध्ये अफगाणिस्तान आणि बांगलादेशचा पराभव केला होता. यापूर्वी भारताने ग्रुप स्टेजमधील सर्व सामने जिंकले होते. टीम इंडियाने उपांत्य फेरी गाठताना एकही सामना गमावलेला नाही. आता भारताचा उपांत्य सामना 27 जूनला इंग्लंडविरुद्ध होणार आहे.


रोहित शर्माची फलंदाजी पाहण्यासाठी हॉटस्टावर गर्दी-


ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माला T20 विश्वचषकातील सर्वात जलद शतक झळकवता आले नाही, पण त्याच्या फलंदाजीदरम्यान प्रेक्षकांचा नवा विक्रम रचला गेला. खरंतर, जेव्हा रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात शानदार फलंदाजी करत होता, तेव्हा 3.1 कोटी लोक हॉटस्टारवर लाइव्ह पाहत होते. हा आकडा या विश्वचषकातील दर्शकांच्या दृष्टीने आतापर्यंतचा सर्वाधिक आहे. याआधी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ऋषभ पंत फलंदाजी करत होता तेव्हा जवळपास 2.8 कोटी लोक बघत होते.


संबंधित बातम्या:


T20 World Cup 2024 Semi Final: 'भारत, इंग्लंड नव्हे...हा संघ टी20 विश्वचषक जिंकणार'; दिग्गजाच्या भविष्यवाणीने सर्व आर्श्चयचकीत


T20 World Cup 2024: IND vs ENG: भारत-इंग्लंडचा सामना खेळवल्या जाणाऱ्या गयानामध्ये महिन्याचे 23 दिवस कोसळतो पाऊस; सेमी फायनल रद्द होणार?