T20 World Cup 2024 Semi Final: 'भारत, इंग्लंड नव्हे...हा संघ टी20 विश्वचषक जिंकणार'; दिग्गजाच्या भविष्यवाणीने सर्व आर्श्चयचकीत
T20 World Cup 2024 Semi Final: पहिला उपांत्य फेरीचा सामना दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यात होणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारत आणि इंग्लंड आमनेसामने असतील. दक्षिण आफ्रिकन संघ तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषकाचा उपांत्य सामना खेळणार आहे.
याआधी 2009 आणि 2014 च्या विश्वचषकातही हा संघ उपांत्य फेरीत पोहोचला होता. एडन मार्करामच्या नेतृत्वाखाली हा संघ 2024 च्या विश्वचषकात आतापर्यंत अपराजित राहिला आहे.
ऑस्ट्रेलियन दिग्गज ब्रॅड हॉगने टी-20 विश्वचषक 2024 च्या स्पर्धेतील विजेत्याबाबत आश्चर्यकारक भविष्यवाणी केली आहे.
ब्रॅड हॉग काय म्हणाले?-स्टार स्पोर्ट्सशी बोलताना ब्रॅड हॉग म्हणाले, मला वाटतं की यावेळी दक्षिण आफ्रिका विश्वचषक जिंकेल. त्यांच्याकडे खूप मजबूत संघ आहे. मला विश्वास आहे की जर आफ्रिकेने निर्भय राहून उपांत्य फेरीचे आव्हान पेलले, तर हा संघ अंतिम फेरी गाठेल.
दक्षिण अफ्रिकेचा संघ यंदा जगज्जेता होईल. संघात खूप चांगले संयोजन आहे. संयमाने योग्य निर्णय घेणारा कर्णधार म्हणून मला एडन मार्कराम आवडतो. दक्षिण अफ्रिकेला परिस्थितीशी जुळवून घेत क्रिकेट खेळावे लागेल, असंही ब्रॅड हॉग यांनी सांगितले.
अफगाणिस्तानचे आव्हान सोपे नाही- 2024 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तानही अव्वल संघ म्हणून उदयास आला आहे. राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानच्या संघाने न्यूझीलंडला ग्रुप स्टेजमध्ये पहिल्यांदाच पराभूत केले होते.
अफगाणिस्तानने किवी संघाचा 84 धावांनी पराभव केला होता. सुपर-8 टप्प्यात ऑस्ट्रेलियाचा 21 धावांनी पराभव करून उपांत्य फेरी गाठण्याच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या. त्यानंतर दडपण भरलेल्या सामन्यात अफगाणिस्तानने बांगलादेशचा 8 धावांनी पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. हा संघ खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे, त्यामुळे दक्षिण आफ्रिकेसाठी हे आव्हान पेलणे सोपे जाणार नाही.