विराट कोहली पुन्हा फ्लॉप, ऑस्ट्रेलियाविरोधात खातेही उघडता आले नाही
Virat Kohli : रनमशीन विराट कोहलीला पुन्हा एकदा मोठी खेळी करता आली नाही. टी20 विश्वचषकात विराट कोहलीची बॅट शांतच आहे. ऑस्ट्रेलियाविरोधात विराट कोहलीला भोपळाही फोडता आला नाही.
Virat Kohli : रनमशीन विराट कोहलीला पुन्हा एकदा मोठी खेळी करता आली नाही. टी20 विश्वचषकात विराट कोहलीची बॅट शांतच आहे. साखळी आणि सुपर 8 मधील सामन्यात विराट कोहलीला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. ऑस्ट्रेलियाविरोधात विराट कोहलीला भोपळाही फोडता आला नाही. जोश हेजलवूडच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादार विराट कोहली झेलबाद झाला..
हेजलूडने विराटचा अडथळा दूर केला
नाणेफेक गमावल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी डावाची सुरुवात केली. दोघांनीही सावध सुरुवात केली, रोहित शर्मा दुसऱ्या बाजूला एकेरी दुहेरी धावसंख्या घेत होता. पण दुसऱ्या बाजूला विराट कोहलीच्या बॅटला चेंडू लागत नव्हता. चार चेंडूमध्ये विराट कोहलीला एकही धाव काढता आली नाही, दबावात आलेल्या कोहलीने जोश हेजलवूड याला पूल शॉट मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू हवेत गेला... टीम डेविड यानं विराट कोहलीचा झेल घेतला. विराट कोहलीला पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयश आले. दुसऱ्याच षटकात भारताला मोठा धक्का बसला.
विराट कोहली बाद झाल्यानंतर सोशल मीडियावर क्रिकेटप्रेमींनी ट्रोलिंग केले. विराट कोहलीला अनेकांनी ट्रोल केले. मिम्सही व्हायरल झाले आहेत..
Five ball duck for Virat Kohli. pic.twitter.com/HdcwPgCjLN
— Johns. (@CricCrazyJohns) June 24, 2024
Virat kohli's incredible form continues😀 pic.twitter.com/Zn9MIHGxwJ
— Tushar Lahare (@TusharLahare18) June 24, 2024
Virat Kohli was dismissed for a duck after facing just five balls.#INDvAUS pic.twitter.com/o550U19fxI
— TimesOfCasino (@TimeofCasino) June 24, 2024
Sources said Virat Kohli thought it was Chinnaswami Stadium and he missed his well deserved century by just only 100 runs.
— Ahsan Shah 💙 (@parh_ly_ahsan) June 24, 2024
Kholi ka "Level Hi Aur Hai" 🫡#AUSvIND #INDvsAUS pic.twitter.com/HsKDIOzHgo
विराट कोहली विश्वचषकात फ्लॉप -
विराट कोहलीला अद्याप एकही अर्धशतक ठोकता आलेले नाही. टी20 विश्वचषकातील 6 सामन्यानंतरही विराटच्या बॅटमधून एकही शतक निघाले नाही. विराट कोहलीची सर्वोच्च धावसंख्या 37 इतकी आहे, अफगाणिस्तानविरोधात खेळला होता. बांगलादेशविरोधात 24 धावा काढता आल्या होत्या. साखळी सामन्यात विराट कोहलीला दुहेरी धावसंख्या गाठता आली नव्हती. पाकिस्तानविरोधात विराट कोहलीला फक्त चार धावाच काढता आल्या होत्या. तर अमेरिकाविरोधात त्याला खातेही उघडता आले नव्हते. आजही ऑस्ट्रेलियाविरोधात विराट कोहली फेल ठरलाय.
भारतीय संघाची प्लेईंग 11
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह
ऑस्ट्रेलियाच्या प्लेईंग 11 मध्ये कोण कोण ?
ट्रेव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेश मार्श (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, टीम डेव्हिड, मॅथ्यू वेड, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा, जॉश हॅजलवूड