एक्स्प्लोर

T20 World Cup 2024, IND vs ENG : रोहित शर्मा सूर्यकुमार यादवनं पाया रचला, अक्षर-कुलदीपनं विजयाचा कळस चढवला, इंग्लंडला लोळवलं, भारत अंतिम फेरीत

T20 World Cup 2024 : रोहित शर्माच्या नेतृत्त्वातील टीम इंडियानं अखेर इंग्लंडचा बदला घेतला आहे. भारतानं दिमाखात फायनलमध्ये प्रवेश केला.

गयाना : टी ट्वेण्टी वर्ल्ड कप 2024 ची (T20  World Cup 2024) दुसरी सेमी फायनल भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यात पार पडली. भारतानं रोहित शर्मा, (Rohit Sharma)  सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर 7 विकेटवर 171 धावा केल्या.  यानंतर अक्षर पटेल, (Axar Patel) कुलदीप यादव, (Kuldeep Yadav) जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतानं  इंग्लंडला पराभूत केलं. भारतानं दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला असून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांची लढत होईल. भारतानं इंग्लंडला 103 धावांवर बाद करत 68 धावांनी विजय मिळवला. अखेर भारतानं 2022 च्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये उपांत्य फेरीत झालेल्या पराभवाचा बदला घेतला.

भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरी सेमी फायनल गयाना येथे पार पडली. पावसामुळे ही मॅच देखील उशिराने सुरु झाली. इंग्लंडचा कॅप्टन जोस बटलर याने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्या दमदार खेळीमुळे भारतानं मोठी धावसंख्या उभारली. भारतानं 20ओव्हरमध्ये 7 विकेटवर 171 धावा केल्या. रोहित शर्मा याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध आक्रमक फलंदाजी केली होती. आज मात्र, गयानातील परिस्थितीशी जुळवून घेत रोहित शर्माने संयमी फलंदाजी केली. 

 रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी भारताच्या डावाची सुरुवात केली. विराट कोहली याने टॉप्ली याला षटकार मारल्या नंतर जोरदार फटका मारण्याच्या प्रयत्नात 9 धावा काढून बाद झाला. रिषभ पंत देखील केवळ 4 धावा करुन बाद झाला.  यानंतर रोहित शर्मा  आणि सूर्यकुमार यादव या दोघांनी महत्त्वाची भागिदारी केली.  रोहित शर्माने कर्णधार  पदाला साजेशी खेळी करत 57 धावा केल्या. सूर्यकुमार यादवने देखील 47 धावांची खेळी केली.  हार्दिक पांड्याने 23 धावा करत  इंग्लंडच्या गोलंदाजांवर दबाव आणला. शिवम दुबे शून्यावर बाद झाला. रवींद्र जडेजाने 17 तर अक्षर पटेलने 10 धावा केल्या. इंग्लंडकडून जॉर्डन याने 3 विकेट घेतल्या. 

भारतानं विजयासाठी इंग्लंडपुढे 172 धावांचे आव्हान ठेवले होते. अक्षर पटेलने जोस बटलरच्या रुपात भारताला पहिली विकेट मिळवून दिली. बटलरने 23 धावा केल्या .जसप्रीत बुमराह याने फिल सॉल्टला बाद करत दुसरा धक्का इंग्लंडला दिला. इंग्लंडच्या डावाच्या सहाव्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर अक्षर पटेल याने जॉनी बेयरस्टोला शून्यावर बाद करून तिसरा धक्का दिला. अक्षर  पटेल याच्या  बॉलिंगवर इंग्लंडने आणखी एक विकेट गमावली. मोईन अली रिषभ पंतच्या सतर्कतेने यष्टीचीत बाद झाला. कुलदीप यादवने सॅम करनची विकेट घेत इंग्लंडला मोठा धक्का दिला. हॅरी ब्रुक याने 25 धावा करत इंग्लंडच्या डावाला सावरण्याचा प्रयत्न केला मात्र एकदा जीवदान मिळून देखील तो कुलदीप यादव पुढे टिकू शकला नाही. कुलदीपने ब्रुकचा त्रिफळा उडवला. कुलदीप यादवने ख्रिस जॉर्डनला 1रनवर बाद करत  इंग्लंडला आणखी एक धक्का दिला. इग्लंडचे दोन खेळाडू धावबाद झाले. जसप्रीत बुमरहानं इंग्लंडची शेवटची विकेट घेत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. 

संबंधित बातम्या : 

IND vs ENG : रोहित शर्माने धुतले, सूर्याने चोपले, भारताचे इंग्लंडपुढे172 धावांचे आव्हान

यापेक्षा वाईट काय असेल... विराट कोहली पहिल्यांदाच उपांत्य सामन्यात फेल, विश्वचषकातही फ्लॉप 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Muddyache Bola : Sangli : पलूसचा बालेकिल्ला काँग्रेस राखणार ? : ABP Majha : Vidhan Sabha ElectionZero Hour : मनोज जरांगेंच्या निर्णयाचे राजकीय अर्थ, राज्यात काय परिणाम?Zero Hour : बंडखोरांमुळे टेन्शन, कोल्हापुरात 'ड्रामा' काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज मागेDevendra Fadnavis : कोल्हापुरातील प्रकार आश्चर्यकारक, उत्तर कोल्हापूरमधून काँग्रेस गायब झालीय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
Maharashtra Politics : सांगली पॅटर्न राबणार, काँग्रेसचे बंडखोर उमेदवार धर्मराज काडादी यांनी शड्डू ठोकला, चिन्ह देखील मिळालं
सांगली पॅटर्न राबणार, काँग्रेसचे बंडखोर उमेदवार धर्मराज काडादी यांनी शड्डू ठोकला, चिन्ह देखील मिळालं
Embed widget