T20 World Cup 2024 ICC चा नवा नियम मदतीला धावला; भारताला फुकटच्या 5 धावा मिळाल्या; काय आहे स्टॉप क्लॉक?
T20 World Cup 2024: सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबेच्या जोडीने संयम बाळगला आणि मोक्याच्या क्षणी आयसीसीचा नियम भारताच्या मदतीला धावून आला.
T20 World Cup 2024: टी-20 विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup 2024) काल नासाऊ काउंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर अमेरिका आणि भारत (India vs USA) यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने अमेरिकेवर 7 विकेट्सने विजय मिळवला. अत्यंत कठीण अशा खेळपट्टीवर एकेरी-दुहेरी धावा काढणंही कठीण होतं. सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबेच्या जोडीने संयम बाळगला आणि मोक्याच्या क्षणी आयसीसीचा नियम भारताच्या मदतीला धावून आला.
15वं षटक संपलं तेव्हा भारताची स्थिती 76/3 अशी होती. 111 धावांचं लक्ष्य अवघडच भासत होतं. मात्र या षटकानंतर पंच पॉल रायफेल यांनी भारतीय संघाला पाच धावा पेनल्टी मिळणार असल्याची घोषणा केली. भारताला विजयासाठी 35 धावांची गरज होती, पण खेळपट्टीवर फलंदाजी करणे कठीण होते. या तणावाच्या काळात अमेरिकेने मोठी चूक केली. पुढील षटक तीनदा सुरू करण्यासाठी त्याला 1 मिनिट किंवा त्याहून अधिक वेळ लागला, त्यामुळे त्याला दंड आकारण्यात आला आणि भारताला पूर्ण 5 धावा मिळाल्या.
USA have been fined 5 penalty runs.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 12, 2024
- They have gone past 60 seconds to start a new over 3 times in the innings. pic.twitter.com/3SODDFqXhn
स्टॉप क्लॉकचा नियम काय सांगतो?
आयसीसीच्या स्टॉप क्लॉकच्या नव्या नियमानुसार दोन षटकांमधील अंतर हे 60 सेकंदाच्या वर असता कामा नये आणि तीनवेळा अशी चूक केल्यास संघाल 5 धावांची पेनल्टी बसते. हा नियम नव्याने लागू करण्यात आला आहे. अमेरिकेने डावात नव्या षटकापूर्वी अतिरिक्त वेळ घेतला आणि तोच त्यांच्या अंगलट आला.
भारतीय संघाची Super 8 मध्ये एन्ट्री
भारतीय संघाने ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत सलग तिसऱ्या विजयाची नोंद करून Super 8 मध्ये एन्ट्री मारली. अमेरिकेच्या 111 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची दमछाक झाली, परंतु भारताने विजय मिळवला. विराट कोहली व रोहित शर्मा यांच्या अपयशानंतर रिषभ पंत, सूर्यकुमार यादव व शिबम दुबे यांनी उल्लेखनीय कामगिरी करून अमेरिकेला पराभूत केले. तत्पूर्वी, अर्शदीप सिंगने ( ARSHDEEP SINGH ) 4 षटकांत 9 धावांत 4 विकेट्स घेऊन विश्वविक्रमी कामगिरी केली. त्याच्या भेदक माऱ्यासमोर अमेरिकेला 8 बाद 110 धावा करता आल्या.
2️⃣ more points in the 💼 🥳 #TeamIndia seal their third win on the bounce in the #T20WorldCup & qualify for the Super Eights! 👏 👏
— BCCI (@BCCI) June 12, 2024
Scorecard ▶️ https://t.co/HTV9sVyS9Y#USAvIND pic.twitter.com/pPDcb3nPmN