एक्स्प्लोर

T20 World Cup 2024: तुमच्या संघात किती सुपरस्टार, हे महत्वाचे नाही; ब्रायन लाराने टीम इंडियाला सांगितला विश्वचषक जिंकण्याचा मार्ग

T20 World Cup 2024: भारतीय संघाने शेवटची आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2013 जिंकली होती, परंतु त्यानंतर आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात अपयश आले आहे.

T20 World Cup 2024: आयसीसी टी-20 विश्वचषक (T20 World Cup 2024) स्पर्धा 2 जूनपासून सुरू होत आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिजच्या भूमीवर ही स्पर्धा होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टी-20 वर्ल्डकपसाठी खेळाडूंनी अमेरिकेत सराव सुरु केला आहे. पण टीम इंडिया 10 वर्षांचा दुष्काळ संपवू शकणार का, हा प्रश्न आहे. वास्तविक, भारतीय संघाने शेवटची आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2013 जिंकली होती, परंतु त्यानंतर आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात अपयश आले आहे. 10 वर्षांचा दुष्काळ भारतीय संघ कसा संपवणार?, याबाबत वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचा माजी दिग्गज खेळाडू ब्रायन लाराने (Brian Lara) प्रतिक्रिया दिली आहे.

...तर टीम इंडिया 10 वर्षे ICC ट्रॉफी जिंकू शकणार नाही-

ब्रायन लारा म्हणाला की रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ अनुभवी खेळाडूंनी भरलेला आहे यात शंका नाही, पण टी-२० विश्वचषकात त्याचा फायदा होईल का?, असा सवाल ब्रायन लारा यांनी उपस्थित केला. तसेच भारतीय संघात मोठी नावे असली तरी विश्वचषक जिंकण्यासाठी योग्य आणि अचूक रणनीती असणे अत्यंत गरजेचे आहे.,  असे झाल्यास भारतीय संघ विश्वचषक जिंकेल आणि 10 वर्षे आयसीसी ट्रॉफी न जिंकण्याचा दुष्काळ संपुष्टात येईल. वनडे विश्वचषक असो की टी-20 विश्वचषक... टीम इंडियाचे खेळाडू जबरदस्त फॉर्ममध्ये दिसतात, पण शेवटच्या क्षणी भारतीय संघ चूक करतो, असं ब्रायन लाराने सांगितले.

तुमच्या संघात किती सुपरस्टार, हे महत्वाचे नाही-

ब्रायन लारा पुढे म्हणाला की, तुमच्या संघात किती सुपरस्टार आहेत हे महत्त्वाचे नाही, तुम्ही विश्वचषक कसा जिंकणार आहात हे महत्त्वाचे आहे. तुमची रणनीती काय आहे... मला विश्वास आहे की भारतीय संघाचे प्रशिक्षक खेळाडूंना एकत्र आणण्यात यशस्वी होतील आणि टीम इंडिया टी-20 विश्वचषक जिंकण्यात यशस्वी होईल. नुकतेच भारतीय संघ एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला होता, परंतु ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. भारतीय संघ जवळपास 10 वर्षांपासून आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात अपयशी ठरला आहे.

टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल , कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

राखीव: शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद आणि आवेश खान

टी-20 विश्वचषक 2024 चा फॉरमॅट असा असेल-

आगामी टी-20 विश्वचषक 1 जून ते 29 जून दरम्यान वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये खेळवला जाणार आहे. 20 संघांची ही स्पर्धा बाद फेरीसह एकूण 3 टप्प्यात खेळवली जाईल. सर्व 20 संघ प्रत्येकी 5 च्या 4 गटात विभागले जातील. प्रत्येक गटातील टॉप-2 संघ सुपर-8 मध्ये प्रवेश करतील. यानंतर, सर्व 8 संघ प्रत्येकी 4 च्या 2 गटात विभागले जातील. सुपर-8 टप्प्यात दोन्ही गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. दोन संघ उपांत्य फेरीच्या दोन सामन्यांद्वारे अंतिम फेरीत प्रवेश करतील.

संबंधित बातमी:

ICC T-20 World Cup 2024: यंदाच्या टी-20 विश्वचषकाच्या स्पर्धेत अव्वल 4 संघ कोणते असतील?; पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स, पाहा Video

ICC T20 WC 2024: टी 20 विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये कोणते 4 संघ पोहचणार?; युवराज सिंहने नावं जाहीर करुन टाकली!

वेस्ट इंडीज अन् अमेरिकेत रंगणार टी-20 विश्वचषकाचा थरार; सामना कधी सुरु होणार, कुठे फ्रीमध्ये पाहता येणार?, जाणून घ्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad Surrender: वाल्मिक कराडांनी पुण्यात सरेंडर करताच मुंबईत हालचालींना वेग; सुरेश धस-संदीप क्षीरसागर फडणवीसांच्या भेटीला
वाल्मिक कराडांनी पुण्यात सरेंडर करताच मुंबईत हालचालींना वेग; सुरेश धस-संदीप क्षीरसागर फडणवीसांच्या भेटीला
वाल्मिक कराड पिच्चरटाईप गाडीतून आला अन् पोलिसांना शरण गेला; पुण्यात आलेली ती गाडी कोणाची?
वाल्मिक कराड पिच्चरटाईप गाडीतून आला अन् पोलिसांना शरण गेला; पुण्यात आलेली ती गाडी कोणाची?
सुषमा अंधारे म्हणाल्या, वाल्मिक अण्णा शरण आला, पोलिसांचा नाकर्तेपणा अधोरेखित झाला, अंजली दमानिया म्हणतात...
सुषमा अंधारे म्हणाल्या, वाल्मिक अण्णा शरण आला, पोलिसांचा नाकर्तेपणा अधोरेखित झाला, अंजली दमानिया म्हणतात...
Walmik Karad Surrender : काल फडणवीस-धनंजय मुंडेंची भेट, आज वाल्मिक कराड शरण, भास्कर जाधवांच्या नव्या दाव्याने भुवया उंचावल्या!
काल फडणवीस-धनंजय मुंडेंची भेट, आज वाल्मिक कराड शरण, भास्कर जाधवांच्या नव्या दाव्याने भुवया उंचावल्या!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Surrender Pune CID : गाडी आली, वाल्मिक कराड उतरला, CID कार्यालयातील Uncut VIDEOWalmik Karad Surrender to Pune CID :  वाल्मिक कराडने पुण्यात सीआडीसमोर केलं आत्मसमर्पणWalmik Karad EXCLUSIVE : शरण जाण्यापूर्वी वाल्मिक कराड काय म्हणाला? शब्द अन् शब्द जसाच्या तसा!Pune CID : Walmik Karad पुण्यात CID ला शरण येणार, सीआयडी ऑफिसबाहेर बंदोबस्त वाढवला!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad Surrender: वाल्मिक कराडांनी पुण्यात सरेंडर करताच मुंबईत हालचालींना वेग; सुरेश धस-संदीप क्षीरसागर फडणवीसांच्या भेटीला
वाल्मिक कराडांनी पुण्यात सरेंडर करताच मुंबईत हालचालींना वेग; सुरेश धस-संदीप क्षीरसागर फडणवीसांच्या भेटीला
वाल्मिक कराड पिच्चरटाईप गाडीतून आला अन् पोलिसांना शरण गेला; पुण्यात आलेली ती गाडी कोणाची?
वाल्मिक कराड पिच्चरटाईप गाडीतून आला अन् पोलिसांना शरण गेला; पुण्यात आलेली ती गाडी कोणाची?
सुषमा अंधारे म्हणाल्या, वाल्मिक अण्णा शरण आला, पोलिसांचा नाकर्तेपणा अधोरेखित झाला, अंजली दमानिया म्हणतात...
सुषमा अंधारे म्हणाल्या, वाल्मिक अण्णा शरण आला, पोलिसांचा नाकर्तेपणा अधोरेखित झाला, अंजली दमानिया म्हणतात...
Walmik Karad Surrender : काल फडणवीस-धनंजय मुंडेंची भेट, आज वाल्मिक कराड शरण, भास्कर जाधवांच्या नव्या दाव्याने भुवया उंचावल्या!
काल फडणवीस-धनंजय मुंडेंची भेट, आज वाल्मिक कराड शरण, भास्कर जाधवांच्या नव्या दाव्याने भुवया उंचावल्या!
Walmik Karad: 23 दिवस पोलिसांना गुंगारा, शरण येण्याची वेळ आणि स्थळ स्वत:च ठरवलं; वाल्मिक कराडांच्या शरणागतीनंतर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
वाल्मिक कराडांनी शरण येण्याची वेळ आणि स्थळ स्वत:च ठरवलं; पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
Walmik Karad Surrender : वाल्मिक कराड सीआयडीसमोर शरण, पुण्यातील कार्यालयाबाहेर येताच नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड सीआयडीसमोर शरण, पुण्यातील कार्यालयाबाहेर येताच नेमकं काय घडलं?
प्राजक्ता माळी प्रकरणावरून अभिनेता गश्मीर महाजनी म्हणाला, 'मी चित्रपट बनवण्यात व्यस्त, पण मला एवढंच माहितीय की, प्राजक्ता..
प्राजक्ता माळी प्रकरणावरून अभिनेता गश्मीर महाजनी म्हणाला, 'मी चित्रपट बनवण्यात व्यस्त, पण मला एवढंच माहितीय की, प्राजक्ता..
Walmik Karad: आधी पुण्यातच मुक्काम, आठ दिवसांपूर्वी राज्याबाहेर निसटला; 23 दिवस वाल्मिक कराड नेमका कुठे होता?
आधी पुण्यातच मुक्काम, आठ दिवसांपूर्वी राज्याबाहेर निसटला; 23 दिवस वाल्मिक कराड नेमका कुठे होता?
Embed widget