(Source: ECI/ABP News/ABP Majha)
T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषकासाठी झिम्बाब्वेचा संघ जाहीर; 'या' खेळाडूवर कर्णधारपदाची जबाबदारी
Zimbabwe 15 Man Squad For T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषकात क्रेग एर्विन (Craig Ervine) झिम्बाब्वेच्या संघाचं नेतृत्व करणार आहे.
Zimbabwe 15 Man Squad For T20 World Cup 2022: ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकासाठी झिम्ब्बावेनं 15 सदस्यीय संघाची घोषणा केलीय. टी-20 विश्वचषकात क्रेग एर्विन (Craig Ervine) झिम्बाब्वेच्या संघाचं नेतृत्व करणार आहे. याशिवाय बर्ल रायन, चकाब्वा रेगीस, चतारा तेंडाई, इव्हान्स ब्रॅडली हे खेळाडू झिम्बाब्वेच्या संघाचा भाग असतील. भारताविरुद्धच्या मालिकेत चमकदार कामगिरी करणारा अष्टपैलू रझा सिकंदरलाही (Sikandar Raza) संघात संधी मिळालीय.
सराव सामन्यात श्रीलंका, नामिबियाशी भिडणार
झिम्बाब्वेचा संघ मुख्य स्पर्धेअगोदर सराव सामन्यात 10 आणि 13 ऑक्टोबरला अनुक्रमे श्रीलंका आणि नामिबियाशी भिडणार आहे. या सामन्यांत तेंदई चतरा, वेलिंग्टन मसाकदजा आणि मिल्टन शुम्बा यांसारख्या अनुभवी खेळाडूं आपला दम दाखवतील. तर, ब्लेसिंग मुजरबानी हा वेगवान गोलंदाजीची जबाबदारी संभाळेल.
16 संघामध्ये रंगणार टी-20 विश्वचषक स्पर्धा
टी-20 विश्वचषकात एकूण 16 संघामध्ये स्पर्धा रंगणार आहे. ज्यात अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, नामिबिया, स्कॉटलँड, श्रीलंका, वेस्ट इंडीज, आयर्लंड, यूएई, नेदरलँड्स आणि झिम्बाब्वेच्या संघाचा समावेश आहे. भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश आणि न्यूझीलंडच्या या आठ संघांनी सुपर 12 साठी पात्रता मिळवली आहे.
टी-20 विश्वचषक 2022 साठी झिम्बाब्वे संघ-
एर्विन क्रेग (कर्णधार), बुर्ले रायन, चकाब्वा रेगीस, चतारा तेंडाई, इव्हान्स ब्रॅडली, जोन्गवे ल्यूक, मदांडे क्लाइव्ह, माधवेरे वेस्ली, मसाकादझा वेलिंग्टन, मुन्योंगा टोनी, मुजरबानी ब्लेसिंग, नागरवा रिचर्ड, रझा अलेक्झांडर, शुम्बा मिल्टन, विल्यम सर्ब.
आस्ट्रेलियाच्या या प्रमुख शहरात रंगणार आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धा
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 मध्ये 16 ऑक्टोबरपासून 13 नोव्हेंबर पर्यंत एकूण 46 सामने खेळले जाणार आहेत. हे सर्व सामने ऑस्ट्रेलियाच्या सात शहरांमध्ये म्हणजेच अॅडलेड, ब्रिस्बेन, जिलॉन्ग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी येथे खेळले जाणार आहे. उपांत्य फेरीचे सामने 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी सिडनी क्रिकेट मैदान आणि अॅडलेड येथे खेळवले जातील. तर, अंतिम सामना 13 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये खेळला जाईल.
हे देखील वाचा-