एक्स्प्लोर

T20 World Cup Squad : विश्वचषकासाठी पाकिस्तानच्या संघाची घोषणा, दिग्गज खेळाडूला डच्चू

T20 World Cup Squad : ऑस्ट्रेलियात रंगाणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकासाठी पाकिस्तानच्या संघानं 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे.

Pakistan 2022 T20 World Cup Squad : ऑस्ट्रेलियात रंगाणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकासाठी पाकिस्तानच्या संघानं 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. बाबर आझमच्या नेतृत्वात पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलियात होणाऱ्या विश्वचषकात उतरणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं तीन राखीव खेळाडूंचीही निवड केली आहे. पाकिस्तान संघाने फखर जमानला डच्चू दिला आहे.  फखर जमानला राखीव खेळाडूमध्ये स्थान दिलेय. 

फखर जमानला डच्चू, राखीव खेळाडू म्हणून निवड -
संयुक्त अरब अमीरातमध्ये पार पडलेल्या आशिया चषकात फखर जमानला लौकिकास साजेशी खेळी करता आली नव्हता. त्यामुळेच ऑस्ट्रेलियात होणाऱ्या विश्वचषकात त्याला 15 जणांमध्ये स्थान देण्यात आले नाही. फखर जमानला राखीव खेळाडू म्हणून स्थान देण्यात आले आहे. त्यासोबत मोहम्मद हारिस आणि शाहनवाज दहानी यांनाही राखीव खेळाडू म्हणून निवडण्यात आले आहे. फखर जमान दुखापतग्रस्त असल्यामुळे अंतिम 15 मध्ये स्थान देण्यात आलं नसल्याचं पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं सांगितलं आहे.  

शाहीन अफ्रिदीचं पुनरागमन,  शाम मसदूलाही स्थान -
दुखापतीमुळे आशिया चषक खेळू न शकणाऱ्या शाहीन शाह आफ्रिदीचं पाकिस्तानच्या संघात पुनरागमन झालेय. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 विश्वचषकासाठी शाहीन शाह आफ्रिदीची निवड करण्यात आली आहे. त्याशिवाय इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या शाम मसदूलाही स्थान देण्यात आलेय. आसिफ अली, हैदर अली आणि इफ्तिखार अहमद यांनाही अंतिम 15 जणांच्या संघात स्थान देण्यात आलेय.  

2022 टी20 वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ - 
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उप कर्णधार), आसिफ अली, हैदर अली, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिजवान, मोहम्मद वसीम, नसीम शाह, शाहीन शाह अफरीदी , शान मसूद आणि उस्मान कादिर

राखीव खेळाडू - फखर जमान, मोहम्मद हारिस आणि शाहनवाज दहानी

हे देखील वाचा- 

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार

ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा

काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल

लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !

तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या

तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी

Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Embed widget