T20 Rankings: आयसीसी टी-20 रँकिंगमध्ये अर्शदीपची मोठी झेप; टी-20 विश्वचषकातील दमदार कामगिरीचा फायदा
T20 Rankings: नुकताच ऑस्ट्रेलियामध्ये पार पडलेल्या टी-20 विश्वचषकात (T20 World Cup 2022) भारताचा युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंहनं (Arshdeep Singh) जबरदस्त गोलंदाजी केली.
T20 Rankings: नुकताच ऑस्ट्रेलियामध्ये पार पडलेल्या टी-20 विश्वचषकात (T20 World Cup 2022) भारताचा युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंहनं (Arshdeep Singh) जबरदस्त गोलंदाजी केली. या स्पर्धेतील सहा सामन्यात त्यानं 10 विकेट्स घेतल्या. ज्याचा फायदा अर्शदीपला टी-20 गोलंदाजी क्रमवारीत (T20 Rankings) झालाय. आयसीसीनं जाहीर केलेल्या ताज्या क्रमावारीनुसार, अर्शदीप सिंहनं मोठी झेप घेतली असून तो 22 व्या स्थानावर पोहचलाय. याशिवाय, इंग्लंडचा स्टार युवा गोलंदाज सॅम करन (Sam Curran) आणि बेन स्टोक्सलाही (Ben Stokes) टी-20 क्रमवारीत मोठा फायदा झाल्याचं पाहायला मिळतंय.
ट्वीट-
🏆 Alex Hales and Jos Buttler move up
— ICC (@ICC) November 18, 2022
🌟 Shaheen Afridi and Naseem Shah shine bright
📈 The rise of Arshdeep Singh
Latest movement in the @MRFWorldwide Power Rankings following the completion of #T20WorldCup 2022 ⬇️https://t.co/JAoCeuL5cM
वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीलाही आयसीसी रँकिंगमध्ये मोठा फायदा
टी-20 विश्वचषकात उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर प्लेयर ऑफ द टूर्नामेंटचा पुरस्कार जिंकलेल्या सॅम करनला आयसीसी टी-20 रँकिंगमध्ये मोठा फायदा झालाय. याशिवाय, पाकिस्तानविरुद्धच्या फायनल सामन्यातही त्याला प्लेअर ऑफ द मॅच म्हणून निवडण्यात आलं. या उत्कृष्ट कामागिरीमुळं सॅम करनला 11 क्रमांकाचा फायदा झालाय. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीलाही आयसीसी रँकिंगमध्ये मोठा फायदा झालाय. आयसीसी टी-20 रँकिंगमध्ये शाहीन आफ्रिदी 18 व्या स्थानावर आलाय, जो 38 व्या स्थानावर होता. त्याचबरोबर धनंजय डी सिल्वा आणि बेन स्टोक्स यांना अष्टपैलूंच्या क्रमवारीत फायदा झाला आहे.
इंग्लंडच्या विजयाचा हिरो बेन स्टोक्सची मोठी झेप
या स्पर्धेत श्रीलंकेचा अष्टपैलू धनंजय डी सिल्वानं 177 धावा आणि 6 विकेट्सही आपल्या नावावर केल्या. या शानदार कामगिरीनंतर श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू क्रमवारीत 30व्या क्रमांकावर आला. तर पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात इंग्लंडच्या विजयाचा हिरो ठरलेला बेन स्टोक्स 41व्या स्थानावर पोहोचला आहे. विशेष म्हणजे, बेन स्टोक्सनं टी-20 विश्वचषक 2022 फायनलमध्ये पाकिस्तानविरुद्ध नाबाद 52 धावांची खेळी केली होती. याशिवाय त्यानं एक विकेट्स घेतली होती.
हे देखील वाचा-