T20 Match Records : सर्वाधिक मॅन ऑफ द मॅच 'या' परदेशी खेळाडूच्या नावावर; दुसऱ्या नंबरवर कोहली, पहिल्यावर कोण?
India vs South Africa: भारत आणि दक्षिण आफ्रीका यांच्यात दुसरा टी20 सामना कटक येथे खेळवला जाणार असून या सामन्याआधी टी20 सामन्यांसंबधी एक खास रेकॉर्डवर नजर टाकूया.
Virat Kohli Records : भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात सध्या 5 टी20 सामन्यांची मालिका सुरु असून पहिल्या सामन्यातही चुरशीचा खेळ दोन्ही संघाकडून पाहायला मिळाला. आफ्रिकेने 7 विकेट्सनी सामना जिंकला, दरम्यान आता दुसरा सामना कटक येथे रविवारी 12 जून रोजी खेळवला जाणार आहे. तर या सामन्यापूर्वी टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यातील एक खास रेकॉर्ड आपण पाहूया...
भारतीय संघातील रेकॉर्डचा किंग विराट सध्या विश्रांतीवर असून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात तो संघात नाही. पण टी20 क्रिकेटमध्ये विराटच्या नावावर एक खास रेकॉर्ड आहे. हा म्हणजे आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात सर्वाधिक मॅन ऑफ द मॅच अर्थात सामनावीर मिळवण्यात विराट (Virat Kohli) दुसऱ्या स्थानावर असून टॉप 10 मध्ये तो एकमेव भारतीय आहे. त्यामुळे त्याला मागे टाकणं कोणत्याही भारतीयासाठी सध्या अवघड आहे. कोहलीच्या टी20 इंटरनॅशनल सामन्यातील कामगिरीचा विचार करता त्याने तब्बल 12 वेळा हा खिताब मिळवला आहे. पण पहिल्या स्थानावर मात्र एक परदेशी खेळाडू आहे.
मोहम्मद नबी अव्वल
कोहली दुसऱ्या स्थानावर असून पहिल्या स्थानावर मात्र अफगाणिस्तान संघाचा दिग्गज खेळाडू मोहम्मद नबी (Mohammad Nabi) हा आहे. त्याने तब्बल 13 वेळा हा खिताब मिळवला आहे दरम्यान कोहली त्याच्यापेक्षा केवळ एक सामनावीर पुरस्कराने मागे असून लवकरच कोहली अव्वल स्थानी पोहचू शकतो. या यादीत पाकिस्तानाचा खेळाडू हफीज आणि अफरीदी संयुक्त रूपाने तिसऱ्या स्थानावर आहे. दोघांनीही 11-11 वेळा हा पुरस्कार मिळवला आहे. यानंतर प्रत्येकी 10 मॅन ऑफ द मॅच अवार्ड्स मिळवत संयुक्त रुपाने न्यूझीलंडचाॉ मार्टिन गप्टिल आणि डेव्हीड वॉर्नर पाचव्या स्थानावर आहे.
हे देखील वाचा-
- IPL Media Rights Auction : आयपीएल प्रसारण हक्कांच्या शर्यतीतून ॲमेझॉनची माघार, आता 'या' चार कंपन्यांमध्ये तगडी टक्कर
- IND vs SA: मॅच बघायला जाताय की हाणामारी करायला? सामनादरम्यानचा फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडिओ एकदा बघाच!
- कसोटीत 500 विकेट्स घेणारा जगातील पहिला गोलंदाज कोण? फक्त सात जणांनाचं गाठता आलाय विक्रमी टप्पा