T20 Ind vs NZ : राहुल द्रविड 'इन अॅक्शन', सामना सुरु होण्यापूर्वी केली खेळपट्टीची पाहणी
भारत आणि न्यूझीलंड या दोन संघादरम्यान आजपासून टी 20 मालिकेला सुरुवात होत आहे. आजचा सामना सुरु होण्यापूर्वी भारतीय संघाचा नवा प्रशिक्षक राहुल द्रविडने (Rahul Dravid) खेळपट्टीची पाहणी केली.
मुंबई : भारत आणि न्यूझीलंड या दोन संघांच्या दरम्यान आजपासून टी 20 सामन्याच्या मालिकेला सुरुवात होत आहे. आज या मालिकेतील पहिला सामना आज जयपूरला सुरु आहे. पण हा सामना सुरु होण्यापूर्वी टीम इंडियाचा प्रशिक्षक राहुल द्रविड हा अॅक्शन मोडमध्ये आल्याचं दिसून आलं. सामना सुरु होण्यापूर्वी राहुल द्रविडने सामन्याची खेळपट्टीची स्वत: पाहणी केली असून त्या संबंधीचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
सामना सुरु होण्यापूर्वी राहुल द्रविड हा खेळपट्टीवर आला. त्याने खेळपट्टीची अगदी बारकाईने पाहणी केली. या व्हिडीओकडे पाहिलं असता राहुल द्रविड हा आता सक्रिय झाल्याचं दिसून येतंय. या मालिकेपासूनच राहुल द्रविड भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून आपल्या नव्या इनिंगला सुरुवात करणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध मालिकांपूर्वी द्रविडच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघानं सरावाला सुरुवात केलीय. दरम्यान, राहुल द्रविडनं मैदानात भारतीय खेळाडूंशी संवाद दिसला. तसेच युवा खेळाडूंना मार्गदर्शन करतानाही दिसला.
भारत- न्यूझीलंड यांच्यातील पहिला सामना आज खेळला जात आहे. दुसरा टी-20 सामना 19 नोव्हेंबरला आणि तिसरा टी- 20 सामना 21 नोव्हेंबरला खेळवला जाईल. हे सर्व सामने जयपूरमध्ये खेळवले जाणार आहे.
विश्वचषकाआधी विराट कोहलीनं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर रवी शास्त्री यांचा प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ संपला होता. त्यामुळे टी-20 मध्ये रोहित शर्मा आणि राहुल द्रविड या कर्णधार-प्रशिक्षकाची नवी जोडी आजपासून मैदानात उतरणार आहे. जयपूरमध्ये भारतीय संघ वर्चस्व गाजवण्याची शक्यता आहे.
द्रविडच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 79 वनडे आणि 25 कसोटी सामने खेळले होते. या सामन्यांपैकी 50 टक्के सामने भारताने जिंकले होते.
संबंधित बातम्या :
- Champions Trophy 2025: भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानात जाणार की नाही? क्रीडा मंत्री म्हणाले..
- IND vs NZ : रोहित-राहुल युगाची सुरुवात, जयपूरमध्ये आज पहिला टी-20 सामना
- द्रविडने नकार दिला असता तर 'हा' माजी खेळाडू असता टीम इंडियाचा कोच!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha