Ind vs SL: सूर्यकुमार यादवने 'विजयी ट्रॉफी; कोणाच्या हातात दिली...?; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
India vs Sri Lanka: भारताने तीन सामन्यांची मालिका 3-0 अशी जिंकत श्रीलंकेला क्लीन स्वीप दिला.
Ind vs SL: मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या टी-20 सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेचा (Ind vs SL) थरारक सुपर ओव्हर सामन्यात पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 9 विकेट्सच्या मोबदल्यात 137 धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेने चांगली सुरुवात केल्यावर भारताचा पराभव होईल असे वाटत होते, मात्र शेवटच्या षटकांमध्ये कर्णधार सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) 20 व्या षटकात 2 बळी आणि रिंकू सिंगच्या 19व्या षटकात श्रीलंकेला गुडघे टेकण्यास भाग पाडले. श्रीलंकेने देखील 8 विकेट्स गमावत 137 धावा केल्या. त्यामुळे सामना सुपर ओव्हरपर्यंत पोहचला आणि सुपर ओव्हरमध्ये भारताने बाजी मारली.
भारताने तीन सामन्यांची मालिका 3-0 अशी जिंकत श्रीलंकेला क्लीन स्वीप दिला. यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवकडे विजयाची ट्रॉफी देण्यात आली. सूर्यकुमार यादवने सर्व खेळाडू फोटोसाठी उभे असताना ही ट्रॉफी रिंकू सिंह आणि रियान परागकडे सोपवली. दरम्यान रोहित शर्मा देखील मालिका जिंकल्यानंतर युवा खेळाडूंच्या हातात विजयी ट्रॉफी देतो. याआधी टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनीही अनेकदा युवा खेळाडूंकडे विजयी ट्रॉफी देताना दिसला. सूर्यकुमार यादवने हिच परंपरा सुरु ठेवल्याने सोशल मीडियावर त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव सुरु आहे.
पाहा संपूर्ण व्हिडीओ-
𝐂𝐇𝐀𝐌𝐏𝟏𝐎𝐍𝐒 🇮🇳🏆
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) July 30, 2024
First of many 🙌👏#SonySportsNetwork #SLvIND pic.twitter.com/j8Ebnm2UT9
सूर्यकुमार यादवचे तीन निर्णय गेमचेंजर ठरले-
खलील अहमदनं 18 व्या ओव्हरमध्ये 12 धावा दिल्यानंतर श्रीलंकेला विजयासाठी 9 धावांची गरज होती. सूर्यकुमार यादवनं यावेळी रिंकू सिंगला गोलंदाजी दिली. त्यानं कुशल परेराला 46 धावांवर बाद केलं. यानंतर श्रीलंकेला शेवटच्या ओव्हरमध्ये 6 धावांची गरज होती. त्यावेळी सर्वांना वाटत होतं मोहम्मद सिराजनं गोलंदाजी करावी असं वाटत होतं. मात्र, सूर्यकुमार यादवनं गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सूर्यकुमार यादवनं 5 धावा देत दोन विकेट घेतल्या. यामुळं मॅच सुपर ओव्हरपर्यंत पोहचली. यानंतर सूर्यकुमार यादवनं सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजी वॉशिंग्टन सुंदरला दिली. त्यानं केवळ दोन विकेट घेतल्या आणि भारताचा विजय सोपा झाला. सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल हे दोघे फलंदाजीला आले. यानंतर सूर्यानं विजयी चौकार मारत संघाला विजय मिळवून दिला.
सुपर ओव्हरचा थरार-
फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदर सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी आला. पहिला चेंडू वाईड गेला. त्यानंतर एक धाव श्रीलंकेने काढली. वॉशिंग्टनने पुढी दोन्ही चेंडूत दोन विकेट्स घेतल्या. दुसऱ्या चेंडूवर चेंडूवर कुसल परेरा आणि तिसऱ्या चेंडूवर पथुम निसांकाही बाद झाला. श्रीलंकेने सुपर ओव्हरमध्ये केवळ 2 धावा केल्या. त्यामुळे भारताला विजयासाठी अवघ्या 3 धावा करायच्या होत्या. भारतासाठी सूर्यकुमार यादवने पहिल्याच चेंडूवर चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला.
संबंधित बातमी:
गौतम गंभीर-सूर्यकुमार यादवचे 4 चक्रवणारे निर्णय; श्रीलंकेच्या थिंक टँकने विचारही केला नव्हता!