India Tour Of New Zealand: सूर्या, युजवेंद्र आणि ऋषक्ष पंत चक्क एअरपोर्टवरच झोपले; न्यूझीलंड दौऱ्यातील फोटो समोर
India Tour Of New Zealand: टी-20 विश्वचषकातील दुसऱ्या सेमीफायनलमध्ये भारतीय संघाला इंग्लंडकडून 10 विकेट्सनं (IND vs ENG) पराभव स्वीकारावा लागला.
India Tour Of New Zealand: टी-20 विश्वचषकातील दुसऱ्या सेमीफायनलमध्ये भारतीय संघाला इंग्लंडकडून 10 विकेट्सनं (IND vs ENG) पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर भारतीय विश्वचषकाच्या शर्यतीतून बाहेर पडली. आयसीसीच्या इव्हेंटमध्ये पुन्हा एकदा भारताच्या पदरात निराशा पडली. मात्र, त्यानंतर भारतीय संघ त्यांच्या पुढच्या आव्हानांसाठी सज्ज आहे. हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. येत्या 18 नोव्हेंबरला भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला टी-20 सामना खेळला जाणार आहे. यापूर्वी भारताचा स्टार फलंदाज सूर्याकुमार यादव (Suryakumar Yadav), युवा यष्टीरक्षक ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि अनुभवी गोलंदाज युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) यांचा न्यूझीलंडच्या एका विमानतळावर झोपल्याचा फोटो समोर आलाय.
युजवेंद्र चहलनं त्याच्या अकाऊंटवरून एक इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे, ज्यामध्ये त्यानं पत्नी धनश्री वर्माच्या इन्स्टाग्राम स्टोरीचा स्क्रीनशॉट शेअर केलाय. ज्यात सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत आणि युजवेंद्र चहल विमानतळावर झोपल्याचं पाहायला मिळत आहे. या फोटोमध्ये चहल ऋषभ पंत सूर्यकुमारच्या पायावर डोकं ठेवून झोपलाय. तर, युजवेंद्र चहल ऋषभ पंतच्या पायावर डोकं ठेवून झोपल्याचं दिसत आहे.
फोटो-
बीसीसीआयच्या सूत्रानं पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, "लक्ष्मणच्या नेतृत्वाखालील एनसीए संघ न्यूझीलंडला जाणाऱ्या संघात सामील होईल. ज्यात हृषिकेश कानिटकर हे फलंदाजी प्रशिक्षक आणि साईराज बहुतुले हे गोलंदाजी म्हणून जबाबदारी पार पाडतील." यापूर्वीही लक्ष्मणवर भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आलीय. लक्ष्मणनं झिम्बाब्वे, आयर्लंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नुकतीच झालेल्या एकदिवसीय मालिकेदरम्यान संघाचे प्रशिक्षकपद भूषवले होतं. महत्वाचं म्हणजे, भारताचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या टी-20 मालिकेत संघाचं नेतृत्व करेल. तर, अनुभवी सलामीवीर शिखर धवन एकदिवसीय संघात भारतीय संघाचं कर्णधारपद संभाळणार आहे.
टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ:
हार्दिक पांड्या (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), शुभमन गिल, ईशान किशन, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.
एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ:
शिखर धवन (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), शुभमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकुर, शहबाज अहमद, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, दीपक चाहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.
हे देखील वाचा-