(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सूर्या चमकला, आफ्रिकेला धुतले, विराटला मागे टाकले, टी 20 रचला विक्रम
Most Sixes For India In T20 Format: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात सूर्यकुमार यादवने वादळी खेळी केली.
Most Sixes For India In T20 Format: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात सूर्यकुमार यादवने वादळी खेळी केली. सूर्यकुमार यादवने आफ्रिकेच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. त्याने टी 20 मध्ये विराट कोहलीला मागे टाकत भारतासाठी मोठा विक्रम केलाय. सूर्यकुमार यादव भारतासाठी टी-20 फॉरमॅटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. सूर्यकुमार यादवने विराट कोहलीला मागे टाकले आहे. या यादीत रोहित शर्मा पहिल्या स्थानावर विराजमान आहे. टीम इंडियासाठी रोहित शर्माने सर्वाधिक षटकार ठोकले आहेत.
6,4,6,6 by Suryakumar Yadav. 🔥pic.twitter.com/fMhyqK3qc2
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 14, 2023
आत्तापर्यंत सूर्यकुमार यादवने आंतरराष्ट्रीय T20 सामन्यात 123 षटकार मारले आहेत. त्याचबरोबर या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या विराट कोहलीच्या नावावर 117 षटकार आहेत. रोहित शर्माने 182 षटकार ठोकले आहेत.
6,4,6,6 to bring up his fifty.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 14, 2023
Suryakumar Yadav in supreme form! pic.twitter.com/xBHaK8uwhg
सूर्याचा शतकी तडाखा -
दोन विकेट झटपट पडल्यानंतर सूर्यकुमार यादव याने सर्व सुत्रे आपल्या हातात घेतली. सूर्यकुमार यादवने चौफेर फटकेबाजी करत शतकी खेळी केली. सूर्यकुमार यादवने 8 षटकार आणि सात चौकारांच्या मदतीने टी 20 क्रिकेटमधील दुसरे शतक ठोकले. सूर्याने यशस्वी जायस्वाल याच्यासोबत शतकी भागिदारी केली. त्यानंतर रिंकूसोबत 47 धावांची भागिदरी केली. सूर्याने चौफेर फटकेबाजी करत भारताची धावसंख्या 200 पार नेली.
केशव महाराजने लागोपाठ दोन धक्के दिले..
टीम इंडियाने 'करो या मरो'च्या सामन्यात वेगवान सुरुवात केली. यशस्वी जायस्वाल आणि शुभमन गिल यांनी पहिल्या दोन षटकात 29 धावांचा पाऊस पाडला. त्यानंतर आफ्रिकेचा कर्णधार केशव महाराज याने चेंडू केशव महाराज याच्याकडे सोपवाला. केशव महाराजने येताच लागोपाठ दोन विकेट घेतल्या. पहिल्या चेंडूवर त्याने शुभमन गिल याला तंबूत धाडले, तर त्यानंतर शून्यावर तिलक वर्माला तंबूचा रस्ता दाखवला. शुभमन गिलने महाराजचा चेंडूवर स्वीप शॉट मारण्याचा प्रयत्न केला अन् एलबीडब्ल्यू बाद झाला. शुभमन गिल याने सहा चेंडूत 12 धावांची खेळी केली. तिलक वर्माला खातेही उघडता आले नाही.
यशस्वी जायस्वालचं अर्धशतक -
यशस्वी जायस्वाल याने आज शानदार खेळी केली. यशस्वीच्या बॅटमधून चौकार आणि षटकांराचा पाऊस पडला. यशस्वीने 41 चेंडूत 60 धावांची खेळी केली. यामध्ये तीन षटकार आणि सहा चौकारांचा समावेस आहे. यशस्वी जायस्वाल याने सूर्यकुमार यादव याच्यासोबत 29 धावांची सलामी दिली. त्यानंतर तिसऱ्या विकेटसाठी कर्णधार सूर्यकुमार यादव याच्यासोबत शतकी भागिदारी केली. लागोपाठ दोन विकेट पडल्यानंतर यशस्वी जायस्वाल आणि सूर्याने मोर्चा संभाळला. दोघांनी चौफेर फटकेबाजी करत आफ्रिकेची गोलंदाजी फोडली. तिसऱ्या विकेटसाठी सूर्या आणि यशस्वी यांनी 70 चेंडूत 112 धावांची भागिदारी केली.