एक्स्प्लोर

Abhishek Sharma T20 World Cup 2026: अभिषेक शर्माचा खराब फॉर्म, संघातून डच्चू मिळण्याची चर्चा, पण सूर्यकुमार यादवचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाला, आजपर्यंत त्याने आम्हाला..

Abhishek Sharma T20 World Cup 2026: सलामीवीर अभिषेक शर्माचा विश्वचषक स्पर्धेतील फॉर्म भारताच्या चिंतेचा विषय आहे. अभिषेक शर्माला तिन्ही सामन्यांमध्ये एकदाही भोपळा फोडता आलेला नाही.

Abhishek Sharma T20 World Cup 2026: भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर अभिषेक शर्मा याला सध्या सुरु असलेल्या ट्वेन्टी-20 विश्वचषक स्पर्धेत अद्याप लय गवसलेली नाही. भारताने आतापर्यंत खेळलेल्या तिन्ही सामन्यांमध्ये अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) हा शून्यावर बाद झाला आहे. अभिषेक शर्मा हा त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. मात्र, विश्वचषक स्पर्धेत अद्याप त्याने एकही धाव न काढल्याने अभिषेक शर्मा याला संघात ठेवावे की ठेवू नये, याची चर्चा सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने पत्रकार परिषदेत बोलताना अभिषेक शर्माचे संघातील स्थान अजूनही भक्कम असल्याचे सांगितले. 

अनेकजण अभिषेकच्या फॉर्मबाबत चिंता व्यक्त करत आहेत. पण मी अभिषेक शर्मा इथून पुढे ज्या संघांविरुद्ध खेळणार आहे, त्यांच्याबाबत चिंता करत आहे. आतापर्यंत अभिषेकच्या धावा झालेल्या नाहीत. पण एकदा तो त्याच्या फॉममध्ये येऊन खेळायला लागला तर काय होतं, ते तुम्हाला माहिती आहे. शेवटी क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. कधीतरी धावा होत नाहीत. अभिषेक शर्माकडून सर्वजण त्याच्या नेहमीच्या शैलीत खेळण्याची अपेक्षा करत आहेत. अभिषेकही नेहमीप्रमाणे खेळण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्याकडून ते झालं तर ठीक आहे, नाही झालं तर आम्ही सगळे त्याला सांभाळून घ्यायला आहोत. गेल्या वर्षभरात त्याने आम्हा सर्वांना सांभाळून घेतले आहे. यावेळी आम्ही त्याला कव्हर करु, असे सूर्यकुमार यादवने सांगितले.

भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही अभिषेक शर्माच्या कामगिरीबाबत फारशी चिंता करण्याची गरज नाही, असे मत व्यक्त केले. अभिषेक शर्मा तीन सामन्यांमध्ये शून्यावर बाद झाला आहे. ही एकप्रकारे सकारात्मक बाब आहे. कारण आता तो योग्यवेळी चांगली कामगिरी करेल. भारतीय संघाच्या आतापर्यंतच्या खेळात काही उणीवा आहेत. अद्याप भारतीय संघाची सर्वोच्च कामागिरी होणे बाकी आहे, असे रवी शास्त्री यांनी म्हटले होते.

IND vs SA: आज सुपर-8 मध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिकेचा मुकाबला

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आत सुपर-8 फेरीतील सामना होणार आहे. ट्वेन्टी-20 विश्वचषक स्पर्धेत दोन्ही संघ अद्यापपर्यंत एकही सामना हरलेले नाहीत. भारतीय संघ अ गटातून पहिल्या स्थानावर होता. तर दक्षिण आफ्रिका ड गटातून पहिल्या स्थानावर होता. यापूर्वी 2024 च्या विश्वचषक स्पर्धेत हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. त्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला होता. आज संध्याकाळी 7 वाजता अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना सुरु होईल.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ICC Hindi (@icchindiofficial)

आणखी वाचा

सलग तीन मॅचमध्ये अपयश, अभिषेक शर्माला संघाबाहेर ठेवणार असल्याच्या चर्चा, अखेर टीम इंडियाचा कोच समोर आला अन् म्हणाला...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pakistan : पाकिस्तानच्या सलमान आगावर आयसीसीची कारवाई, विचित्र पद्धतीनं धावबाद झाल्यानंतर हेल्मेट फेकणं महागात पडलं....
पाकिस्तानच्या सलमान आगावर आयसीसीची कारवाई, धावबाद झाल्यानंतर हेल्मेट फेकणं महागात पडलं....
IPL 2026 Mumbai Indians : हार्दिक पांड्यानं रोहित शर्माला थेट इशारा दिल्याचा कांगावा... सोशल मीडियावर खळबळ; मुंबई इंडियन्सने फोडला फुगा, दोन शब्दात स्पष्ट उत्तर
हार्दिक पांड्यानं रोहित शर्माला थेट इशारा दिल्याचा कांगावा... सोशल मीडियावर खळबळ; मुंबई इंडियन्सने फोडला फुगा, दोन शब्दात स्पष्ट उत्तर
BCCI Naman Awards : BCCIची मोठी घोषणा! अवॉर्ड्समध्ये नवीन चेहरे चमकले, कोणत्या खेळाडूंना मिळाला पुरस्कार?
BCCIची मोठी घोषणा! अवॉर्ड्समध्ये नवीन चेहरे चमकले, कोणत्या खेळाडूंना मिळाला पुरस्कार?
Shubman Gill News : टीम इंडियाने टी-20 वर्ल्डकप जिंकला, पण सेलिब्रेशनमध्ये फोटोवरून वाद पेटला, कर्णधार शुभमन गिलवर आरोप, नेमकं काय घडलं?
टीम इंडियाने टी-20 वर्ल्डकप जिंकला, पण सेलिब्रेशनमध्ये फोटोवरून वाद पेटला, कर्णधार शुभमन गिलवर आरोप, नेमकं काय घडलं?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCL Pune labrotary : पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचं मोठं संशोधन, एलपीजीला पर्यायी इंधन शोधलं
Sangli News : IPS झालेल्या आटपाडीच्या सुपुत्राची हत्तीवरून वाजतगाजत मिरवणूक, पडळकरांनी वाटली साखर
Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
वातावरण फिरलंय... उन्हामुळे कुठं घामाच्या धारा, पण कोल्हापुरात वादळी वारा, पाऊस अन् गारवा
वातावरण फिरलंय... उन्हामुळे कुठं घामाच्या धारा, पण कोल्हापुरात वादळी वारा, पाऊस अन् गारवा
Pakistan : पाकिस्तानच्या सलमान आगावर आयसीसीची कारवाई, विचित्र पद्धतीनं धावबाद झाल्यानंतर हेल्मेट फेकणं महागात पडलं....
पाकिस्तानच्या सलमान आगावर आयसीसीची कारवाई, धावबाद झाल्यानंतर हेल्मेट फेकणं महागात पडलं....
कागलमध्ये ₹357.99 कोटींचा सर्व्हिस रोडसह 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा; सीएम फडणवीस म्हणाले, कोल्हापूरच्या विकासाला नवे पंख
कागलमध्ये ₹357.99 कोटींचा सर्व्हिस रोडसह 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा; सीएम फडणवीस म्हणाले, कोल्हापूरच्या विकासाला नवे पंख
200 रुपये द्या, सिलेंडर देतो; बीडमधील गॅसटंचाईत ग्राहकांकडून पैशांची लूट, एबीपी माझाचं स्टिंग ऑपरेशन
200 रुपये द्या, सिलेंडर देतो; बीडमधील गॅसटंचाईत ग्राहकांकडून पैशांची लूट, एबीपी माझाचं स्टिंग ऑपरेशन
विश्वचषक ट्रॉफीसह गौतम गंभीर अन् सूर्या सिद्धिविनायक मंदिरात, कर्णधाराने उंदीरमामाच्या कानात काय मागितलं?
विश्वचषक ट्रॉफीसह गौतम गंभीर अन् सूर्या सिद्धिविनायक मंदिरात, कर्णधाराने उंदीरमामाच्या कानात काय मागितलं?
Iran : अमेरिकेनं रशियन तेलाची आयात नको यासाठी महिने घालवले, आता रशियाचं तेल घ्या म्हणून भारतासह जगाला विनवण्या, इराणच्या विदेश मंत्र्यांचं ट्रम्प यांच्या वर्मावर बोट
अमेरिका भारतासह जगाला रशियन तेल खरेदीसाठी विनवण्या करतेय, इराणच्या विदेश मंत्र्यांचा हल्लाबोल
Embed widget