श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाचे शिलेदार ठरले, सूर्याकडे टी20 चं तर वनडेमध्ये रोहित कर्णधार, गिल उपकर्णधार
श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या शिलेदारांची निवड करण्यात आली आहे. वनडे संघाची धुरा सूर्यकुमार यादव याच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.
श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या शिलेदारांची निवड करण्यात आली आहे. वनडे संघाची धुरा सूर्यकुमार यादव याच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. तर वनडेचं कर्णधारपद रोहित शर्मा याच्याकडेच असेल. महत्वाचं म्हणजे, वनडे आणि टी20 संघाचं उपकर्णधार शुभमन गिल याच्याकडे सोपवण्यात आले आहे. हार्दिक पांड्या याच्याकडून उपकर्णधारपद काढून घेण्यात आले आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये तीन सामन्याची वनडे आणि तीन सामन्याची टी20 मालिका होणार आहे. 27 जुलै ते 7 ऑगस्ट यादरम्यान टीम इंडिया श्रीलंकाविरोधात वनडे आणि टी20 मालिका खेळणार आहे. टी20 चे सर्व सामने पल्लेकेले येथे होणार आहेत, तर वनडे सामने कोलंबो येथील मैदानात होणार आहेत.
टी20 मालिकेसाठी टीम इंडिया -
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जायस्वाल, रिंकु सिंह, रियान पराग, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, खलील अहमद, मोहम्मद सिराज
T20I Squad: Suryakumar Yadav (C), Ꮪhubman Gill (VC), Yashasvi Jaiswal, Rinku Singh, Riyan Parag, Rishabh Pant (WK), Sanju Samson (WK), Hardik Pandya, Shivam Dube, Axar Patel, Washington Sundar, Ravi Bishnoi, Arshdeep Singh, Khaleel Ahmed, Mohd. Siraj.
वनडे मालिकेसाटी टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर)ऋषभ पंत (विकेटकीपर),श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंगटन सुंदर, अर्शधीप सिंह, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा
ODI Squad: Rohit Sharma (C), Ꮪhubman Gill (VC), Virat Kohli, KL Rahul (WK), Rishabh Pant (WK), Shreyas Iyer, Shivam Dube, Kuldeep Yadav, Mohd. Siraj, Washington Sundar, Arshdeep Singh, Riyan Parag, Axar Patel, Khaleel Ahmed, Harshit Rana.
India vs Sri Lanka series Schedule full details
टी20 मालिकेचं वेळापत्रक, कधी होणार सामने?-
पहिला टी20 सामना - शनिवार, 27 जुलै 2024, रात्री सात वाजता, पल्लेकेले इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियम
दुसरा टी20 सामना - रविवार, 28 जुलै 2024, रात्री सात वाजता, पल्लेकेले इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियम
तिसरा टी20 सामना - मंगळवार, 30 जुलै 2024, रात्री सात वाजता, पल्लेकेले इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियम
वनडे मालिकेचं वेळापत्रक काय ?
पहिला वनडे सामना - शुक्रवार, 2 ऑगस्ट 2024 - दुपारी 2.30 वाजता - आर. प्रेमदासा स्टेडियम - कोलंबो
दुसरा वनडे सामना - रविवार, 4 ऑगस्ट 2024 - दुपारी 2.30 वाजता - आर. प्रेमदासा स्टेडियम - कोलंबो
पहिला वनडे सामना - बुधवार, 7 ऑगस्ट 2024 - दुपारी 2.30 वाजता - आर. प्रेमदासा स्टेडियम - कोलंबो