Dukes Ball Controversy : भारतात घडलं असतं, तर ब्रिटिश मिडियाने आरडाओरड केला असता..., ड्यूक्स बॉलवर गावसकर बोलले अन् वातावरण पेटले
Eng vs Ind 3rd Test Dukes Ball Controversy : भारत आणि इंग्लंड यांच्यातील लॉर्ड्स येथे सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ड्यूक्स बॉल पुन्हा एकदा चर्चेत आला.

Sunil Gavaskar on Dukes Ball Controversy : भारत आणि इंग्लंड यांच्यातील लॉर्ड्स येथे सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ड्यूक्स बॉल पुन्हा एकदा चर्चेत आला. यादरम्यान, भारतीय कर्णधार शुभमन गिल पंचांशी वाद घालताना दिसला, तर मोहम्मद सिराजही नाराज होता. शुक्रवारी दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होऊन काही षटके झालीच होती की भारताने ड्यूक्स बॉलबद्दल तक्रार केली, जो फक्त 10 षटके जुना होता. पंचांनी 'हूप' (मापन रिंग) मधून चेंडू बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण तो त्यातून बाहेर पडला नाही.
त्यानंतर, पण भारतीय कर्णधार शुभमन गिल पंचांशी खूप जोरदार वाद घालताना दिसला, कदाचित तो बदललेल्या चेंडूवर नाराज होता. ड्रिंक्स ब्रेकमध्येही, गिल पंचांशी बोलताना खूप रागावलेला दिसत होता. चेंडूची ही समस्या इथेच संपली नाही. 48 चेंडूंनंतर पुन्हा चेंडू बदलावा लागला. या तिसऱ्या कसोटीपूर्वीही पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये चेंडू बदलण्याची प्रक्रिया स्पष्टपणे दिसून आली. त्याच वेळी, आता भारताचे महान खेळाडू सुनील गावसकर यांनी या संपूर्ण वादावर मोठे विधान केले आहे.
Day 2 at Lord’s had it all — a five-star spell from Jasprit Bumrah, a gritty half-century from KL Rahul, and Siraj turning up the heat with fire and flair. Throw in the Dukes Ball drama, and you’ve got a Test match bubbling with storylines!#ENGvIND 👉 3rd TEST, DAY 3 | SAT,… pic.twitter.com/LdUpglhwv3
— Star Sports (@StarSportsIndia) July 11, 2025
ड्यूक्स बॉलवर सुनील गावसकर काय म्हणाले?
सुनील गावसकर यांनी कमेंट्रीदरम्यान आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले, "इथून पाहिलं तरी स्पष्टपणे दिसतंय की ही चेंडू 10 ओव्हरचा नाही, तर जणू काही 20 ओव्हरचा जुना वाटत आहे. हीच घटना जर भारतात घडली असती, जिथे अशा बदललेल्या चेंडूंसाठी पर्याय मर्यादित असतात, तर ब्रिटिश मिडियाने यावर मोठा गदारोळ केला असता."
लॉर्ड्स कसोटीचा दुसरा दिवस संपला!
लॉर्ड्स कसोटीचा दुसरा दिवस संपला आहे. दिवसअखेर भारतीय संघाने 3 विकेट गमावून 145 धावा केल्या आहेत. केएल राहुल 53 आणि ऋषभ पंत 19 धावा करून खेळत आहे. भारताची सुरुवात चांगली झाली नाही. केएल राहुलसोबत डावाची सुरुवात करण्यासाठी आलेला यशस्वी जैस्वाल वेगवान गतीने धावा काढण्याच्या प्रयत्नात जोफ्रा आर्चरचा शिकार झाला. जैस्वाल फक्त 13 धावा करून लवकरच बाद झाला.
तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या करुण नायरला पुन्हा एकदा चांगली सुरुवात मिळाली, परंतु तरीही तो पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. 62 चेंडूत 4 चौकारांसह 40 धावा करून नायर बाद झाला. नायरने दुसऱ्या विकेटसाठी केएल राहुलसोबत 61 धावांची भागीदारी केली. नायरला इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने आऊट केले. त्याआधी, इंग्लंड दुसऱ्या दिवशी 387 धावा करून ऑलआउट झाला होता.
हे ही वाचा -





















