IND vs SA Test : रहाणे आणि पुजारा विश्वासावर खरे उतरले, सुनील गावस्कर यांचं दोघांना समर्थन
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या डावात पुजारा आणि रहाणे या दोघांनी शानदार खेळीचं दर्शन घडवलं.
Sunil Gavaskar on Ajinkya Rahana and Cheteswar Pujara: भारतीय संघातील अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा मागील बऱ्याच काळापासून खराब फॉर्मशी झगडत आहेत. पण जोहान्सबर्ग येथील दुसऱ्या कसोटीत दोघांनीही अर्धशतकं झळकावतं एका दमदार पुनरागमनाचे संकतेच जणू दिले आहेत. दरम्यान या खेळीच्या आधी पहिल्या डावादरम्यान सुनील गावस्कर यांनी रहाणे आणि पुजारा यांच्याकडे या सामन्यात स्वत:ला सिद्ध करायची शेवटची संधी आहे असं म्हणाले होते.
जोहान्सबर्ग कसोटीत टीम इंडिया सात विकेट्सनी पराभूत झाली. या पराभवानंतर माजी दिग्गज खेळाडू गावस्कर यांनी रहाणे आणि पुजारा यांची पाठराखण करत या दोघांवरही जो विश्वास दाखवण्यात आला त्यावर दोघेही खरे उतरले आहेत, असं म्हणाले. गावस्कर म्हणाले, युवा खेळाडूंच्या खेळीने उत्साहित होणं सोपं असतं पण संघातील वरीष्ठ खेळाडूंवर भरोसा ठेवणं तितकचं महत्तवाचं असतं. गावस्कर यांनी 'स्टार स्पोर्ट्स' शी बोलताना हे वक्तव्य केलं. ते म्हणाले, 'रहाणे आणि पुजारा दोघंही अनुभवी आहेत आणि त्यांनी संघासाठी जे काही केलं आहे त्यासाठी संघाने त्यांना समर्थन दाखवलं असून मूळात त्या दोघांनाही स्वत:वर विश्वास होता आणि त्यांनी त्यानुसारच कामगिरी केली.'
'कधी कधी कठोर व्हावं लागतं'
पुजारा आणि रहाणे यांनी अर्धशतकं झळकावण्यापूर्वी गावस्कर यांनी दोघांसाठी हा सामना शेवटची संधी असल्याचं म्हटलं होतं. त्याबाबत बोलताना गावस्कर म्हणाले, 'कधी कधी सीनियर खेळडूंचा चांगला खेळ पाहण्यासाठी त्यांच्याप्रति कठोर व्हावं लागतं. तसंच एकदाका ते चांगलं खेळू लागले की त्यांच्यावर भरोसा दाखवणं तितकचं गरजेचं आहे.'
हे देखील वाचा-
- Ind vs SA, 2nd Test, 4th Day Highlights: एल्गरच्या नाबाद 96 धावांच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेचा विजय, 7 विकेट्सनी सामना खिशात, मालिकेत 1-1 ची बरोबरी
- ICC Test Ranking : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतकाचा राहुलला फायदा, कसोटी क्रमवारीत 58 क्रमाकांची उडी
- ICC Womens World Cup 2022: विश्वचषकासाठी भारतीय महिला संघाची घोषणा, स्टार गोलंदाज शिखा पांडेला संघात स्थान नाही
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha