Video, SL vs AUS : मुसळधार पाऊस, जोरदार वादळात चक्क मैदानातील स्टँडच उडालं, फोटोसह व्हिडीओही व्हायरल
Galle International Stadium मध्ये श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामन्याचा दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरु होण्यापूर्वीच पावसाने प्रचंड धुमाकूळ घातल्याचा पाहायला मिळाला.
AUS vs SL 2022 : गाले येथे श्रीलंका (Sri Lanka) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात सध्या कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. पण या सामन्यात दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरु होण्यापूर्वीच पावसाने तुफान हजेरी लावल्याचं (Rain) पाहायला मिळालं. यामुळे दुसऱ्या दिवशीचा खेळ तर उशीराच सुरु झाला, पण या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) मैदानातील एक स्टँड (Stand) कोसळल्याचं पाहायला मिळालं.
मुसळधार पावसात पडलं स्टँड
या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसली तरी ज्याप्रकारे मुसळधार आणि तुफानी पाऊस सुरु होता, ते अत्यंत भयंकर होतं. मुसळधार पावसात (Heavy Rain) गाले इंटरनेशनल स्टेडियममधील (Galle International Stadium) स्टँड पडल्याचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे. अनेकांनी हा व्हिडीओ आपआपल्या सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल होत आहे. सामन्चा
पाहा व्हिडीओ -
Situation now at Galle #SLvsAUS pic.twitter.com/4NBbulUEQn
— Anjana Kaluarachchi (@Anjana_CT) June 30, 2022
स्वस्तात आटोपला श्रीलंकेचा पहिला डाव
सामन्यात नाणेफेक जिंकून श्रीलंका (Sri Lanka) संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण श्रीलंकन फलंदाजांना खास कामगिरी करता आली नाही. केवळ 212 धावांवर त्यांचा डाव आटोपला. यावेळी श्रीलंकेकडून डिकवेला याने एकहाती झुंज देत अर्धशतक ठोकलं. त्याने 59 चेंडूत 58 धावांची खेळी केली. ज्यानंतर मात्र फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियाने (Australia) तुफान फलंदाजी करत जबरदस्त धावसंख्या उभारली आहे. दुसऱ्या दिवशीच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाने 313 धावांपर्यंत मजल मारत 101 धावांची आघाडी घेतली आहे. यावेळी उस्मान ख्वाजाने 130 चेंडूत 71 धावा, कॅमेरॉन ग्रीननेही 109 चेंडूत 77 धावांची दमदार खेळी केली आहे. सध्या पॅट कमिन्स आणि नथान लॉयन क्रिजवर आहेत.
हे देखील वाचा-
Rishabh Pant : सेल्फी घ्यायला आले फॅन्स, पण ऋषभ पंतने केलं असं काही की सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
Ind vs Eng, 5th Test : इंग्लिश फोटोग्राफरनं मानले विराट कोहलीसह बीसीसीआयचे आभार, काय आहे नेमकं कारण?