एक्स्प्लोर

मैच

AUS vs SL: तब्बल सहा वर्षानंतर श्रीलंकेनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामना जिंकला!

AUS vs SL: ऑस्ट्रिलियाविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेच्या संघानं (Sri Lanka vs Australia) 26 धावांनी विजय मिळवला.

AUS vs SL: ऑस्ट्रिलियाविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेच्या संघानं (Sri Lanka vs Australia) 26 धावांनी विजय मिळवला. या विजयासह श्रीलंकेच्या संघानं मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधलीय. पल्लेकेले येथे गुरुवारी झालेल्या सामन्यात श्रीलंकेनं 43 षटकात ऑस्ट्रेलियासमोर 216 धावांचं लक्ष्य ठेवलं. त्यानंतर भेदक गोलंदाजी करत श्रीलंकेच्या संघानं ऑस्ट्रेलियाला 37.1 षटकात 189 धावांवर ऑलआऊट केलं. महत्वाचं म्हणजे, श्रीलंकेनं तब्बल सहा वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामना जिंकला आहे. यापूर्वी 24 ऑगस्ट 2016 रोजी कोलंबो येथे झालेल्या सामन्यात श्रीलंकेनं ऑस्ट्रेलियावर मात केली होती. 

पावसामुळं सामन्यात व्यत्यय
नाणेफेक जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, पावसाच्या व्यत्ययामुळं सामन्यातील षटक कमी करण्यात आली. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेची धावसंख्या 47.4 षटकांत 9 बाद 220 अशी होती, तेव्हा पावसाला सुरुवात झाली. यानंतर श्रीलंकेला उर्वरित षटक खेळण्याची संधी मिळाली नाही. श्रीलंकेचा यष्टीरक्षक कुशल मेंडिसनं सर्वाधिक 36 धावांची खेळी केली.याशिवाय धनंजय डी सिल्वा आणि कर्णधार दासून शनाका यांनी 34-34 धावांचं योगदान दिलं. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सनं 8.4 षटकांत 35 धावांत चार विकेट्स घेतल्या. पहिला सामना खेळताना मॅथ्यू कुहनमन आणि ग्लेन मॅक्सवेल यांना प्रत्येकी दोन विकेट्स मिळवल्या. 

श्रीलंकेची भेदक गोलंदाजी
श्रीलंकेनं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिच्या 170 धावांवर पाच फलंदाज माघारी परतले. त्यांनी अखेरच्या 19 धावांत पाच विकेट्स गमावले. स्ट्रेलियाकडून सलामीवीर डेव्हिड वॉर्नरनं सर्वाधिक 37 धावांची खेळी केली. तर, ग्लेन मॅक्सवेलनं 30 आणि स्टीव्ह स्मिथनं 28 धावा केल्या. सामनावीर चमिका करुणारत्नेनं ऑस्ट्रेलियाच्या तीन फलंदाजांना माघारी धाडलं. तर, धनंजय डी सिल्वा, दुनिथ वेलेझ आणि दुष्मंता चमिरा यांना प्रत्येकी दोन- दोन विकेट्स मिळाल्या.

श्रीलंका ऑस्ट्रेलिया याच्यातील पुढील सामना कधी?
श्रीलंका आणि ऑस्टेलिया यांच्यातील तिसरा सामना 19 जून रोजी आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जाणार आहे. श्रीलंका- ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेपूर्वी दोन्ही देशात टी-20 मालिका खेळण्यात आली होती. या मालिकेत ऑस्टेलियाच्या संघानं 2-1 नं जिंकली. एकदिवसीय मालिका संपल्यानंत दोन्ही देशांत दोन सामन्याची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. 

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kareena Kapoor Karishma Kapoor : करिष्मा आणि करिना कपूर राजकारणाच्या आखाड्यात? दोन्ही अभिनेत्री वर्षा बंगल्यावर दाखल, चर्चांना उधाण
करिष्मा आणि करिना कपूर राजकारणाच्या आखाड्यात? दोन्ही अभिनेत्री वर्षा बंगल्यावर दाखल, चर्चांना उधाण
Shiv Sena : निगेटिव्ह सर्व्हेच्या नावावर शिंदेंच्या जागा भाजपकडून बळकण्याचं सत्र, मग विधानसभेचं काय? शिवसेनेचे आमदार नाराज
निगेटिव्ह सर्व्हेच्या नावावर शिंदेंच्या जागा भाजपकडून बळकण्याचं सत्र, मग विधानसभेचं काय? शिवसेनेचे आमदार नाराज
Kavya Maran: हसताना, रागवताना काव्या मारनला तुम्ही पाहिलं...पण तिचा डान्स बघितला का?, पाहा Video
हसताना, रागवताना काव्या मारनला तुम्ही पाहिलं...; पण तिचा डान्स बघितला का?, पाहा Video
Nashik Lok Sabha : उमेदवारी न मिळाल्याने विजय करंजकर नाराज, राजाभाऊ वाजेंनी उद्धव ठाकरेंशी चर्चा करत घेतला मोठा निर्णय
उमेदवारी न मिळाल्याने विजय करंजकर नाराज, राजाभाऊ वाजेंनी उद्धव ठाकरेंशी चर्चा करत घेतला मोठा निर्णय
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  04 PM : 28 March 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सGovinda Ahuja to Join CM Eknath Shinde Shiv Sena : अभिनेता गोविंदा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणारShinde Group Loksabha Election 2024 : शिंदे गटाच्या 13 पैकी 12 खासदारांना पुन्हा संधी मिळणारSanjay Shirsat on Lok Sabha : शिंदेंच्या 12 खासदारांना पुन्हा संधी मिळणार? कुणाकुणाची नावं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kareena Kapoor Karishma Kapoor : करिष्मा आणि करिना कपूर राजकारणाच्या आखाड्यात? दोन्ही अभिनेत्री वर्षा बंगल्यावर दाखल, चर्चांना उधाण
करिष्मा आणि करिना कपूर राजकारणाच्या आखाड्यात? दोन्ही अभिनेत्री वर्षा बंगल्यावर दाखल, चर्चांना उधाण
Shiv Sena : निगेटिव्ह सर्व्हेच्या नावावर शिंदेंच्या जागा भाजपकडून बळकण्याचं सत्र, मग विधानसभेचं काय? शिवसेनेचे आमदार नाराज
निगेटिव्ह सर्व्हेच्या नावावर शिंदेंच्या जागा भाजपकडून बळकण्याचं सत्र, मग विधानसभेचं काय? शिवसेनेचे आमदार नाराज
Kavya Maran: हसताना, रागवताना काव्या मारनला तुम्ही पाहिलं...पण तिचा डान्स बघितला का?, पाहा Video
हसताना, रागवताना काव्या मारनला तुम्ही पाहिलं...; पण तिचा डान्स बघितला का?, पाहा Video
Nashik Lok Sabha : उमेदवारी न मिळाल्याने विजय करंजकर नाराज, राजाभाऊ वाजेंनी उद्धव ठाकरेंशी चर्चा करत घेतला मोठा निर्णय
उमेदवारी न मिळाल्याने विजय करंजकर नाराज, राजाभाऊ वाजेंनी उद्धव ठाकरेंशी चर्चा करत घेतला मोठा निर्णय
Sanjay Shirsat on Lok Sabha : शिंदेंच्या 12 खासदारांना पुन्हा संधी मिळणार? कुणाकुणाची नावं?
शिंदेंच्या 12 खासदारांना पुन्हा संधी मिळणार? यादीत कुणाकुणाची नावं?
'पैसे घेऊन नाना पटोलेंकडून उमेदवारी दिली जातेय'; काँग्रेसच्या माजी आमदाराचा गंभीर आरोप
'पैसे घेऊन नाना पटोलेंकडून उमेदवारी दिली जातेय'; काँग्रेसच्या माजी आमदाराचा गंभीर आरोप
Arvind Kejriwal on ED : 'आप'ला ठेचणे, खंडणी रॅकेट तयार करणे हा ईडीचा हेतू; अरविंद फार्माने 55 कोटींचे निवडणूक रोखे भाजपला दिले; केजरीवालांचा गौप्यस्फोट
'आप'ला ठेचणे, खंडणी रॅकेट तयार करणे हा ईडीचा हेतू; अरविंद केजरीवालांचा ईडीवर गंभीर आरोप
RR Vs DC Dream11 prediction: जैस्वाल, बटलर, वॉर्नर, कोणाला बनवाल कर्णधार?; 11 खेळाडूंची परफेक्ट टीम, तुम्हाला करेल मालामाल
जैस्वाल, बटलर, वॉर्नर, कोणाला बनवाल कर्णधार?; 11 खेळाडूंची परफेक्ट टीम, तुम्हाला करेल मालामाल
Embed widget